- पुण्यातील ‘झूमकार’च्या प्रकल्पासाठी ‘महिंद्रा’तर्फे ‘इटूओ-प्लस’ या मॉडेलच्या 50 गाड्यांचा प्रस्ताव
- ‘झूमकार’च्या ‘झॅप’ सेवेसाठी आणि ‘सेल्फ-ड्राईव्ह’ सुविधेसाठी ‘महिंद्रा इटूओ-प्लस’ उपलब्ध
- म्हैसूर, हैदराबाद, जयपूर, नवी दिल्ली, मुंबई आणि कोलकातानंतर पुणे येथेही या सेवेचे नियोजन
पुणे : महिंद्रा उद्योगसमुहातील महिंद्रा इलेक्ट्रिक आणि शेअरिंग मोबिलिटी क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठी कंपनी झूमकार यांनी विद्युत वाहनांच्या माध्यमातून आपल्या सेवा विस्तारित करण्याची घोषणा संयुक्तपणे केली आहे. या कंपन्या ‘इटूओ-प्लस’ मॉडेलची 50 वाहने पुणेकरांसाठी उपलब्ध करणार आहेत. ‘सेल्फ ड्राईव्ह’ व ‘झॅप’ योजना या दोन्ही पध्दतीने ही वाहने नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. कोणतेही डाऊन पेमेंट, विमा व इतर सेवा यांच्यासाठी पैसे न मोजता महिन्याकाठी केवळ 9,999 रुपये भरून ग्राहकांना ‘इटूओ-प्लस’ ही कार ‘झॅप सबस्क्राईब’ पध्दतीने वापरावयास मिळते.
पुण्याच्या महापौर श्रीमती मुक्ता टिळक आणि पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएससीडीसीएल) चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांच्या उपस्थितीत या मोटारींना हिरवा झेंडा दाखविण्यात आला. केंद्र सरकारच्या नीती आयोगाने 2030 या वर्षीपर्यंत देशात सर्वत्र विद्युत वाहनांच्या प्रसाराचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्या धोरणाच्या अनुषंगाने महिंद्रा व झूमकार यांनी हा उपक्रम राबविला आहे. पुणे हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर असल्याने, तसेच आयटी क्षेत्रातील मोठे केंद्र बनले असल्याने या शहरात योजनेचा शुभारंभ करण्याचे महिंद्रा व झूमकार यांनी ठरविले.
या प्रसंगी बोलताना’ महिंद्रा इलेक्ट्रिक’चे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश बाबू म्हणाले, “अधिकाधिक नागरिकांना विद्युत मोटारींची सेवा मिळावी, या उद्देशाला महिंद्रा इलेक्ट्रीक आणि झूमकार या दोन्ही कंपन्या एकत्रितपणे हातभार लावीत आहेत. पुण्यात ‘झूमकार’च्या ‘शेअर्ड मोबिलिटी’साठी आमच्या विद्युत मोटारी उपलब्ध करून देऊन आम्ही त्या प्रथमच सादर करीत आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे. महाराष्ट्रात विद्युत मोटारींच्या धोरणाची घोषणा झाल्यानंतरचा हा पहिलाच उपक्रम आहे. विद्युत वाहनांचा जलद गतीने प्रसार व्हावा, या महाराष्ट्र राज्याच्या ध्येयात आम्ही सहभागी आहोत.
झूमकारचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग मोरन या प्रसंगी म्हणाले, की ‘महिंद्रा इलेक्ट्रिक’बरोबर पुन्हा एकदा सहभागी होण्यात आणि पुणेकरांना नावीन्यपूर्ण योजनेद्वारे पर्यावरणपूरक अशी सेवा देण्यात आम्हाला आनंद वाटतो. प्रथम आमची पीईडीएल सायकल सेवा आणि आता आमचे विद्युत वाहन स्वीकारून पुणे शहराने मोबिलीटी क्षेत्रातील नव्या योजना राबविण्यात आपण अग्रेसर असल्याचे दाखवून दिले आहे.
झूमकार व लीजप्लॅन या दोन कंपन्यांच्या अर्थसाह्यातून हा पुण्यातील उपक्रम उभा राहात आहे. महिंद्रा फायनान्स या कंपनीद्वारे या उपक्रमाला इतर शहरांमध्ये अर्थसाह्य देण्यात येईल.
‘महिंद्रा इलेक्ट्रिक’विषयी:
20.7 अब्ज डॉलची उलाढाल असणाऱ्या महिंद्रा उद्योगसमुहातील महिंद्रा इलेक्ट्रिक ही कंपनी आहे. विद्युत वाहने विकसीत करून त्यांचे उत्पादन करण्यात सध्या जगात आघाडीवर असलेली महिंद्रा इलेक्ट्रिक ही देशातील अशा स्वरुपाची एकमेव कंपनी आहे. जागतिक दर्जा असलेली विद्युत वाहने या कंपनीद्वारे भारतातच बनविण्यात येतात. ‘इटूओ-प्लस हॅच’, ‘इ-व्हरिटो सेदान’ आणि ‘इ-सुप्रो मिनी व्हॅन’ व ‘पॅनेल व्हॅन’ या श्रेणी सादर करून महिंद्रा समुहाने आपली विद्युत वाहनांप्रती असलेली कटिबध्दता दर्शविली आहे.
तंत्रज्ञान व नावीन्यपूर्ण कल्पना यांचा एकत्रित उपयोग करून महिंद्राने मोबिलिटी क्षेत्रात प्रत्येक टप्प्यावर क्रांती केली आहे. सकारात्मक बदलाच्या इच्छेचा दृष्टीकोन बाळगत, शाश्वत स्वरुपाच्या कल्पनांचे द्रष्टेपण असणाऱ्या महिंद्रा समुहाने पर्यायी तंत्रज्ञानाचीही कास धरली आहे व स्वच्छ, हरीत व स्मार्ट भवितव्याकडे दमदार वाटचाल सुरू केली आहे.
महिंद्रा विषयी:
महिंद्रा उद्योगसमुहाची एकूण उलाढाल 20.7 अब्ज डॉलर इतकी आहे. नावीन्यपूर्ण मोटारी व एसयूव्ही बनविणे, ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून ग्रामीण प्रगतीला चालना देणे, नवीन व्यवसायांची जोपासना करणे, हे या समुहाचा उद्दीष्ट आहे. तसेच युटिलिटी मोटारी, माहिती तंत्रज्ञान, अर्थसेवा आणि पर्यटनविषयक सेवा आदी उद्योगांमध्ये हा समूह कार्यरत आहे. महिंद्रा समुहातर्फे जगात सर्वाधिक संख्येने ट्रॅक्टर बनविले जातात. कृषी उद्योग, हवाई उद्योग, व्यावसायिक वाहनांची निर्मिती, सुट्या भागांचे उत्पादन, संरक्षणविषयक उत्पादने, लॉजिस्टिक्स, रिअल इस्टेट, अपारंपारीक ऊर्जा, स्पीडबोट, पोलाद उत्पादन अशा इतरही अनेक क्षेत्रांमध्ये महिंद्र उद्योगसमूह आपले पाय रोवून आहे. शंभर देशांमध्ये या समुहाच्या विविध कंपन्या आहेत व त्यांमध्ये दोन लाखाहून अधिक कर्मचारी काम करतात.