मुंबई – भारतातील एक आघाडीची दूरसंचार पुरवठादार कंपनी व्होडाफोन इंडियाने आघाडीची मोबाइल फोन हँडसेट निर्मिती करणारी कंपनी सॅमसंगशी व्यूहरचनात्मक भागीदारी करत असल्याचे आज जाहीर केले. यामुळे सॅमसंगचे काही निवडक 4जी स्मार्टफोन आकर्षक रोख परतावा योजनेसह अधिक परवडणा-या दरांत उपलब्ध होतील. व्होडाफोनच्या सध्याच्या आणि नवीन ग्राहकांना गॅलेक्सी जे2 प्रो, गॅलेक्सी जे7 एनएक्सटी किंवा गॅलेक्सी जे7 मॅक्स् या लोकप्रिय सॅमसंग 4जी स्मार्टफोनपैकी कोणताही स्मार्टफोन खरेदी करून 1500 रुपयांचा रोख परतावा मिळवता येईल.
या विशेष योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रीपेड ग्राहकांना 24 महिन्यांसाठी दरमहा 198 रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. यामध्ये त्यांना अमर्याद कॉल आणि 1 जीबी डेटा प्रतिदिन (ग्राहकांना दरमहा एकूण 198 रुपयांचा रिचार्ज होईल, अशा कोणत्याही रिचार्ज योजना वापरता येतील) असे लाभ मिळतील. पोस्टपेड ग्राहकांना या योजनेसाठी व्होडाफोनची कोणतीही आकर्षक रेड योजना घेता येईल. योजनेचे पहिले 12 महिने संपल्यावर ग्राहकांना 600 रुपयांचा रोख परतावा मिळेल, तर पुढच्या आणखी 12 महिन्यांनंतर 900 रुपये रोख परतावा मिळेल. अशा प्रकारे एकूण 1500 रुपयांचा रोख परतावा मिळेल. हा परतावा ग्राहकांच्या एम-पेसा वॉलेटमध्ये जमा करण्यात येईल.
व्होडाफोन इंडियाच्या ग्राहक व्यवसाय विभागाचे सहयोगी संचालक अवनीश खोसला म्हणाले, ‘सॅमसंगच्या सर्वांत लोकप्रिय 4जी स्मार्टफोनवर व्होडाफोन सुपरनेट 4जी डेटा सक्षम नेटवर्कचा वापर करण्याकरता आम्ही आमच्या ग्राहकांना उद्युक्त करत आहोत. या भागीदारीद्वारे आम्ही विविध किमतीतील विविध 4जी स्मार्टफोनवर रोख परतावा योजना देत आहोत. डेटाचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा आणि त्यांना 4जी मिळावे, या आमच्या धोरणाचा हा भाग आहे. आम्ही सॅमसंगबरोबर देत असलेली योजना ग्राहकांना अधिक समृद्ध व्हॉइस आणि डेटा अनुभवासाठी स्मार्टफोन खरेदी करण्यास प्रोत्साहन देईल.’
सॅमसंग इंडियाचे मुख्य विपणन अधिकारी रणजीवजित सिंग म्हणाले, ‘आम्हाला व्होडाफोनबरोबर भागीदारी करण्यास अतिशय आनंद होत असून, आमच्या लोकप्रिय गॅलेक्सी जे मालिकेतील स्मार्टफोनची व्होडाफोनच्या सेवेशी भागीदारी करून, शिवाय ते परवडणा-या किमतीत देऊन ग्राहकांना अधिक समृद्ध अनुभव देण्याची संधी यामुळे आम्हाला मिळाली आहे. सध्या भारतात विकला जाणारा दर तिसरा स्मार्टफोन हा गॅलेक्सी जे मालिकेतील आहे. हे स्मार्टफोन सॅमसंगच्या मेक फॉर इंडिया उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेले आणि अनेक ग्राहककेंद्री सुविधा असलेले आहेत.’