सांगली,: वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (WCE) चा आठवा ग्रॅज्युएशन समारंभ आज साजरा करण्यात आला. समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे उपस्थित होते. WCE च्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष अजित गुलाबचंद यांनी ग्रॅज्युएशन समारंभात यशस्वी इंजिनीअरिंग ग्रॅज्युएटना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 2017-18 मध्ये B.Tech पूर्ण करणाऱ्या 431 विद्यार्थ्यांना व 2016-17 मध्ये M.Tech पूर्ण करणाऱ्या 233 विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन समारंभात गौरवण्यात आले.
WCE ने प्लेसमेंटच्या बाबतीत यंदाही उत्कृष्ट काम केले आणि अंदाजे 74% अंडरग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना व 30% पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटमध्ये नोकऱ्या मिळाल्या आहेत. 416 पैकी 302 अंडरग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना एकूण 458 नोकऱ्यांच्या ऑफर देण्यात आल्या.
या वर्षीच्या प्लेसमेंटचे वैशिष्ट्य म्हणजे, मायक्रोसॉफ्टने WCE मधील कॉम्प्युटर सायन्स शाखेतील दोन विद्यार्थ्यांना प्रत्येकी 37 लाख रुपये पगार देण्याचे ठरवले आहे. या वर्षी, अंदाजे 54 विद्यार्थ्यांना 29 लाख रुपये ते 7 लाख रुपये या दरम्यान पगाराचे पॅकेज मिळाले आहे. गेल्या वर्षीच्या 4 लाख रुपयांच्या तुलनेत यंदा सरासरी पगार 5 लाख रुपये आहेत. तसेच, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात काम करण्यास तयार करण्यासाठी अंदाजे 100 विद्यार्थ्यांना लोकप्रिय कंपन्यांमध्ये इन्टर्नशिप देण्यात आली व त्यांना दरमहा 35,000 रुपये स्टायपेंड मिळत आहे.
भारतातील 22 कॉलोजांमध्ये AICTE ने नॅशनल डॉक्टरल फेलोशिप साठी WCE चा समावेश केला आहे व या साठी स्टायपेंड म्हणून दरमहा 28000 रुपये व HRA देण्यात येणार आहे.
वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगचे संचालक डॉ. जी. व्ही. परिश्वद यांनी सांगितले, “संशोधन व नेतृत्व यासाठी योग्य दृष्टी असलेले सक्षम ग्रॅज्युएट इंजिनीअर घडवण्याच्या आमच्या अनुषंगाने, आमचे विद्यार्थी सर्व क्षेत्रांत उत्कृष्ट ठरत आहेत. 2018 मध्ये, अंदाजे 113 WCE विद्यार्थी GATE साठी पात्र ठरले, तर 5 विद्यार्थ्यांनी आघाडीच्या 500 क्रमांकांमध्ये स्थान मिळवले. आमच्या पाच विद्यार्थ्यांनी CAT मध्ये 96.5 व 99.34 या दरम्यान टक्के मिळवले. तसेच, 2014 व 2015 वर्षातील बॅचमधील 5 माजी विद्यार्थी चांगल्या क्रमवारीने UPSC परीक्षा उत्तीर्ण झाले.”
मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या भारत सरकारच्या नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्क (NIRF)) मध्ये 2018 मध्ये 101-150 च्या रँक बँडमध्ये WCE चा समावेश करण्यात आला. या वर्षी, मुंबईतील 9 संस्था, पुण्यातील 10 व नागपूरमधील 5 संस्थांनी आघाडीच्या 200 इंजिनीअरिंग संस्थांमध्ये स्थान मिळवले. उर्वरित महाराष्ट्रातून या यादीमध्ये स्थान मिळवणारी WCE ही एकमेव संस्था आहे.
वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगविषयी
वालचंद कॉलेज ऑफ इंजिनियरिंगची 1947 साली स्थापना झाली आणि भारतातील सर्वात जुनी अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी एक आहे. विशेषतः 2007 पासून आपल्या दूरदर्शी अध्यक्ष, श्री अजीत गुलाबचंद आणि प्रशासकीय मंडळाच्या इतर प्रतिष्ठित सदस्यांच्या मौल्यवान मार्गदर्शनाखाली स्वायत्त संस्थेची स्थापना झाल्यानंतर महाविद्यालय नव्या रुपाने कार्यंरथ झाले. मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या भारत सरकारच्या नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) मध्ये 2018 मध्ये 101-150 च्या रँक बँडमध्ये WCE विशेष TEQIP च्या तिस–या टप्प्यात वालचंद कॉलेजची निवड करण्यात आली आहे. त्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जबलपूरचे मार्गदर्शन करणार आहे.

