- 9.10% पर्यंत वार्षिक व्याजदरासह 3, 5, 7, 10 वर्षे कालावधीचे पर्याय
- सीरिज 2, सीरिज 3, सीरिज 4 व सीरिज 6 एनसीडींमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कॅटेगरी 3 व कॅटेगरी 4 मधील गुंतवणूकदारांना मुदतपूर्तीच्या वेळी 1.00% पर्यंत अतिरिक्त एकरकमी इन्सेन्टिव्ह दिला जाणार
- ज्येष्ठ नागरिकांना सुरुवातीच्या सबस्क्रिप्शनवर अतिरिक्त 0.10% व्याज
- बदलता व्याजदर असलेल्या एनसीडीसाठी बेंचमार्क ओव्हरनाईट एमआयबीओआर
- ट्रिपल ए रेटिंग : केअरकडून “केअर एएए” (ट्रिपल ए); “बीडब्लूआर एएए” आउटलूक (बीडब्लूआर ट्रिपल ए) : ब्रिकवर्ककडून स्टेबल
- सर्व सीरिजसाठी मिळून किमान अर्जाचे प्रमाण 10,000 रुपये
- प्रथम येणाऱ्यास प्राधान्य यानुसार एनसीडी दिले जाणार[1]
- गुंतवणूकदारांना डीमटेरिअलाइज्ड किंवा भौतिक स्वरूपातील एनसीडींसाठी अर्ज करण्याची सुविधा
- डिमॅट स्वरूपातील एनसीडींवर टीडीएस आकारला जाणार नाही
- एनसीडींची नोंदणी बीएसई व एनएसई येथे करण्याचे प्रस्तावित
पुणे, मे 19, 2018: दीवाण हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (“डीएचएफएल” किंवा “कंपनी”) या नॅशनल हौसिंग बँकेकडे (एनएचबी) नोंदणीकृत असलेल्या भारतातील एका आघाडीच्या खासगी हौसिंग फायनान्स कंपनीने प्रत्येकी 1000 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 3000 कोटी रुपयांच्या (“बेस इश्यू साइझ”) व 9000 कोटी रुपयांपर्यंत ओव्हरसबस्क्राइब करण्याचा पर्याय असलेल्या एकूण 12,000 कोटी रुपयांच्या (“ट्रॅंच 1 इश्यू लिमिट”) (“ट्रॅंच 1 इश्यू”) 12 कोटी सिक्युअर्ड रीडीमेबल नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्सच्या (“एनसीडी”) खुल्या विक्रीला मे 22, 2018 रोजीपासून सुरुवात करण्याचे जाहीर केले आहे आणि ही विक्री मे 14, 2018 रोजीच्या ट्रॅंच 1 प्रॉस्पेक्टसद्वारे केली जाणार असून त्यामध्ये या ट्रॅंच 1 इश्यूच्या (“ट्रॅंच 1 प्रॉस्पेक्टस”) अटी व शर्तींचा समावेश आहे व त्या रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, महाराष्ट्र, मुंबई(“आरओसी”), स्टॉक एक्स्चेंजेस व सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (“सेबी”) यांच्याकडे दाखल केलेल्या मे 14, 2018 रोजीच्या शेल्फ प्रॉस्पेक्टसबरोबर (“शेल्फ प्रॉस्पेक्टस”) विचारात घ्याव्यात. शेल्फ प्रॉस्पेक्टस व ट्रॅंच 1 प्रॉस्पेक्टस यांच्यापासून प्रॉस्पेक्टस(“प्रॉस्पेक्टस”) तयार झाला आहे.
हा इश्यू जून 4, 2018 रोजी बंद होणार असून, कंपनीचे संचालक मंडळ (“बोर्ड”) किंवा एनसीडी पब्लिक इश्यू कमिटीने यांनी घेतलेल्य निर्णयानुसार इश्यू लवकर बंद करण्याचा किंवा त्यास वाढीव मुदत देण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
ट्रिपल एएए रेटिंग
विक्री करण्याचे प्रस्तावित असलेल्या एनसीडींना 15,000 कोटी रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी केअर रेटिंग्ज लिमिटेडकडून (“केअर”) एप्रिल 27, 2018 रोजीच्या पत्राद्वारे ‘केअर एएए; स्टेबल (ट्रिपल ए; आउटलूक: स्टेबल)’ रेटिंग व ब्रिकवर्क रेटिंग्ज इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडून(“ब्रिकवर्क”) एप्रिल 27, 2018 रोजीच्या पत्राद्वारे (15,000 कोटी रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी) ‘बीडब्लूआर एएए” (बीडब्लूआर ट्रिपल ए) आउटलूक: स्टेबल’ आउटलूक मिळाला आहे. केअर एएए रेटिंग; केअर व बीडब्लूआर एएए, आउटलूक: स्टेबल मिळाल्याचे विचारात घेता, असे रेटिंग मिळालेली साधने आर्थिक आश्वासने व जबाबदाऱ्या वेळेवर पूर्ण करण्याच्या बाबतीत अत्यंत सुरक्षित असल्याचे समजले जाते.
डीएचएफएलचे ट्रेझरी हेड भारत पारीक यांनी सांगितले,
“गेल्या काही वर्षांमध्ये, डीएचएफएल अतिशय स्पर्धेच्या स्थितीतही उल्लेखनीय प्रगती करत आहे. भारतात सर्वत्र आर्थिक समावेशकतेला चालना देण्यासाठी आणि 2022 पर्यंत सर्वांना घरे पुरवण्याचे सरकारचे उद्दिष्ट पूर्ण करण्यामध्ये योगदान देण्यासाठी कंपनी सक्रियपणे काम करत आहे. आम्ही प्रगतीच्या पुढील टप्प्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, वाढीच्या या महत्त्वाच्या टप्प्यामध्ये जाहीर केली जात असलेली ही तिसरी एनसीडी विक्री डीएचएफएलच्या भविष्यातील नियोजनाला मोठी चालना व बळ देणार आहे. यामुळे आमच्या बॉरोइंग पोर्टफोलिओमध्येही वैविध्य येणार आहे.
आपल्या भागधारकांना जास्तीत जास्त मूल्य देण्याच्या डीएचएफएलच्या प्रयत्नांना अनुसरून, कंपनीने बदलते व्याजदर असलेल्या एनसीडीची घोषणा केली असून त्यासाठी बेंचमार्क ओव्हरनाइट एमआयबीओआर आहे. एमआयबीओआरशी संबंधित एनसीडींसाठी व्याजदर एफबीआयएलने जाहीर केलेल्या व्याजदरावर आधारित असतील व ते वार्षिक पद्धतीने दिले जातील. आम्ही वार्षिक 9.10% पर्यंत आकर्षक व्याजदर, सुरुवातीच्या सबस्क्रिप्शनवर मुदतपूर्तीच्या वेळी 1.00% पर्यंत अतिरिक्त एकरकमी इन्सेन्टिव्ह व ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त0.10% व्याज देणार आहोत. संबंधित घटकांचा प्रचंड विश्वास व परवडणारे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करण्यासाठी बांधिलकी यामुळे डीएचएफएल प्रगतीच्या महत्त्वाकांक्षी योजना साकार करण्याच्या दृष्टीने आणखी एक एनसीडी विक्री यशस्वीपणे पूर्ण करेल, असा विश्वास आहे.”
सर्व पर्यायांच्या एनसीडींसाठी अर्जाची किमान रक्कम 10,000 रुपये आहे व त्यानंतर एकच्या (1) पटीत अर्ज करता येईल. एनसीडी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वानुसार दिले जातील (ओव्हरसबस्क्रिप्शनची तारिख वगळता, सदर तारखेला अर्ज करणाऱ्या सर्व गुंतवणूकदारांना विशिष्ट प्रमाणात एनसीडी दिले जातील). गुंतवणूकदारांना डीमटेरिअलाइज्ड किंवा भौतिक स्वरूपातील एनसीडींसाठी अर्ज करण्याची सुविधा असेल.
इश्यूची रचना:
- सीरिज 1 मध्ये, कालावधी 3 वर्षे आहे व व्याज देण्याची वारंवारिता वार्षिक असेल; कॅटेगरी 1, कॅटेगरी 2, कॅटेगरी 3 व कॅटेगरी 4 यासाठी व्याजदर 8.90%; सर्व कॅटेगरींसाठी लागू असलेले उत्पन्न 8.90% असेल.
सीरिज 2 मध्ये, कालावधी 5 वर्षे आहे व व्याज देण्याची वारंवारिता वार्षिक असेल; कॅटेगरी 1 व कॅटेगरी 2 मधील गुंतवणूकदारांसाठी व्याजदर 8.90% आहे; कॅटेगरी 3 व कॅटेगरी 4 मधील गुंतवणूकदारांसाठी व्याजदर 9.00% आहे; कॅटेगरी 1 व कॅटेगरी 2 मधील गुंतवणूकदारांसाठी उत्पन्न 8.90% असेल; कॅटेगरी 3 व कॅटेगरी 4 मधील गुंतवणूकदारांसाठी उत्पन्न 9.00%असेल.
सीरिज 3 मध्ये, कालावधी 7 वर्षे आहे व व्याज देण्याची वारंवारिता वार्षिक असेल; कॅटेगरी 1 व कॅटेगरी 2 मधील गुंतवणूकदारांसाठी व्याजदर 8.90% आहे; कॅटेगरी 3 व कॅटेगरी 4 मधील गुंतवणूकदारांसाठी व्याजदर 9.00% आहे; कॅटेगरी 1 व कॅटेगरी 2 मधील गुंतवणूकदारांसाठी उत्पन्न 8.90% असेल; कॅटेगरी 3 व कॅटेगरी 4 मधील गुंतवणूकदारांसाठी उत्पन्न 9.00%असेल.
सीरिज 4 मध्ये, कालावधी 10 वर्षे आहे व व्याज देण्याची वारंवारिता वार्षिक असेल; कॅटेगरी 1 व कॅटेगरी 2 मधील गुंतवणूकदारांसाठी व्याजदर 8.90% आहे; कॅटेगरी 3 मधील गुंतवणूकदारांसाठी व्याजदर 9.00% व कॅटेगरी 4 मधील गुंतवणूकदारांसाठी व्याजदर 9.10% आहे; कॅटेगरी 1 व कॅटेगरी 2 मधील गुंतवणूकदारांसाठी उत्पन्न 8.90% असेल; कॅटेगरी 3 मधील गुंतवणूकदारांसाठी उत्पन्न 9.00% व कॅटेगरी 4 मधील गुंतवणूकदारांसाठी उत्पन्न 9.10% असेल.
सीरिज 5 मध्ये, कालावधी 3 वर्षे आहे व व्याज देण्याची वारंवारिता मासिक असेल; कॅटेगरी 1, कॅटेगरी 2, कॅटेगरी 3 व कॅटेगरी 4 यासाठी व्याजदर 8.56%; सर्व कॅटेगरींसाठी लागू असलेले उत्पन्न 8.90%.
सीरिज 6 मध्ये, कालावधी 5 वर्षे आहे व व्याज देण्याची वारंवारिता मासिक असेल; कॅटेगरी 1 व कॅटेगरी 2 मधील गुंतवणूकदारांसाठी व्याजदर 8.56%; कॅटेगरी 3 व कॅटेगरी 4 मधील गुंतवणूकदारांसाठी व्याजदर 8.65%; कॅटेगरी 1 व कॅटेगरी 2 मधील गुंतवणूकदारांसाठी उत्पन्न 8.90%; कॅटेगरी 3 व कॅटेगरी 4 मधील गुंतवणूकदारांसाठी उत्पन्न 9.00%.
बदलते व्याजदर असलेले एनसीडी
सीरिज 7 मध्ये, कालावधी 5 वर्षे आहे व व्याजदर बेंचमार्क एमआयबीओआर अधिक 2.16% स्प्रेड. बेंचमार्क एमआयबीओआर म्हणजे एफबीआयएलने जाहीर केलेला, वार्षिक पद्धतीने मोजलेला व ओव्हरनाइट एमआयबीओआर बेंचमार्क दरानुसार वार्षिक पद्धतीने बदलला जाऊ शकणारा बेंचमार्क ओव्हरनाइट एमआयबीओआर असतो. पहिल्या वर्षाच्या अखेरीस दिला जाणारा बदलता व्याजदर संबंधित कॅल्क्युलेशन पिरिअड अधिक लागू असलेले 2.16% चे फिक्स्ड स्प्रेड यासाठी बेंचमार्क एमआयबीओआर असेल. उदाहरणार्थ, वार्षिक पद्धतीने मोजलेला6.01% ओव्हरनाइट एमआयबीओआर 6.19% असेल. व्याज देण्याच्या पहिल्या, दुसऱ्या, व तिसऱ्या तारखेसाठी संबंधित कॅल्क्युलेशन पिरिअडसाठी हा दर पुन्हा मोजला जाईल.
ज्येष्ठ नागिरकांसाठी लाभ
डीम्ड डेट ऑफ अॅलॉटमेंटच्या दिवशी ज्येष्ठ नागरिक असलेल्या प्रस्तावित ट्रॅंच 1 इश्यूच्या कॅटेगरी 3 व कॅटेगरी 4 गुंतवणूकदारांना दरवर्षी0.10% जास्तीचा व्याजदर दिला जाईल, मात्र त्यासाठी ट्रॅंच 1 इश्यूअंतर्गत देण्यात आलेले एनसीडी या कॅटेगरी 3 व कॅटेगरी 4 गुंतवणूकदारांनी संबंधित व्याजदर लागू होण्यासाठीच्या संबंधित रेकॉर्ड डेटपर्यंत कायम ठेवणे गरजेचे आहे. हा लाभ सुरुवातीच्या सबस्क्रिप्शन रकमेपेक्षा जास्त रकमेवर लागू असणार नाही.
अतिरिक्त लाभ
डीम्ड डेट ऑफ अॅलॉटमेंटच्या दिवशी सुरुवातीला एनसीडी देण्यात आलेल्या, प्रस्तावित ट्रॅंच 1 इश्यूच्या कॅटेगरी 3 व कॅटेगरी 4 गुंतवणूकदारांना सीरिज 2, सीरिज 3, सीरिज 4 व सीरिज 6 यासाठी अनुक्रमे 0.50%, 0.70%, 1.00% व 0.50% असा एकदा अतिरिक्त लाभ दिला जाईल व ही रक्कम व्याजाच्या रकमेबरोबर दिली जाईल, मात्र शेवटच्या व्याजासह सर्व व्याज दिले जाण्यासाठी कॅटेगरी 3 व कॅटेगरी 4 गुंतवणूकदारांनी सीरिज 2, सीरिज 3, सीरिज 4 व सीरिज 6 याअंतर्गतच्या एनसीडीतील गुंतवणूक संबंधित रेकॉर्ड तारखेपर्यंत कायम ठेवणे आवश्यक आहे. हा लाभ सुरुवातीच्या सबस्क्रिप्शन रकमेपेक्षा जास्त रकमेवर लागू असणार नाही.
[कॅटेगरी 4 गुंतवणूकदार (रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर) म्हणजे, एनसीडीच्या सर्व सीरिजसाठी 10 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी कार्टाद्वारे अर्ज करणाऱ्या निवासी भारतीय व्यक्ती व एचयूएफ. कॅटेगरी 3 गुंतवणूकदार (हाय नेट-वर्थ इंडिव्हिज्युअल्स किंवा एचएनआय) म्हणजे, एनसीडीच्या सर्व सीरिजसाठी 10 लाख रुपयांपर्यंतहून अधिक रकमेसाठी कार्टाद्वारे अर्ज करणाऱ्या निवासी भारतीय व्यक्ती व एचयूएफ].
एनसीडीच्या खुल्या विक्रीतून मिळालेल्या निव्वळ रकमेपैकी किमान 75% रक्कम पुढील कर्जे, वित्तपुरवठा आणि कंपनीच्या सध्याच्या कर्जावरील व्याज व मुद्दलाची परतफेड/मुदतीपूर्वी फेड यासाठी वापरली जाणार आहे. जास्तीत जास्त 25% रक्कम सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देशाने वापरली जाईल.
या शेल्फ प्रॉस्पेक्टस ट्रँच 1 प्रॉस्पेक्टसद्वारे दिल्या जाणाऱ्या एनसीडीची नोंदणी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“एनएसई”)व बीएसई लिमिटेड (“बीएसई”) येथे करण्याचे प्रस्तावित असून, बीएसई डेझिग्नेटेड स्टॉक एक्स्चेंज आहे.
एनसीडी इश्यूसाठी लीड मॅनेजर्स आहेत – येस सिक्युरिटीज (इंडिया) लि., एडलविस फिनान्शिअल सर्व्हिसेस लि., ए. के. कॅपिटल सर्व्हिसेस लि., अॅक्सिस बँक लिमिटेड, ग्रीन ब्रिज कॅपिटल अॅडव्हॉयजरी प्रायव्हेट लिमिटेड, आयसीआयसीआय बँक लि., आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, आयआयएफएल होल्डिग्स लिमिटेड, इंडसइंड बँक लिमिटेड, एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड व ट्रस्ट इन्व्हेस्टमेंट अॅडव्हॉयजर्स प्रायव्हेट लिमिटेड.
डीएचएफएलविषयी
भारतातील निम-शहरी व ग्रामीण भागातील अल्प व मध्यम उत्पन्न असलेल्या ग्राहक वर्गांना वित्तीय सेवा देण्याच्या उद्देशाने सन 1984 मध्ये दिवंगत श्री राजेश कुमार वधावन यांनी डीएचएफएलची स्थापना केली. आज, डीएचएफएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कपिल वधावन यांच्या नेतृत्वाखाली कंपनी आज देशव्यापी जाळ्याद्वारे एलएमआय श्रेणीतील लाखो ग्राहकांना सेवा देत आहे. डीएचएफएलला केअर एएए (ट्रिपल ए) मानांकन मिळाले आहे व ब्रिकवर्क्स रेटिंगकडून बीडब्लूआर एएए मिळाले आहे.
गेली 34 वर्षे, डीएचएफएलने ग्राहकांना विविध प्रकारची गृहकर्जे उपलब्ध केली असून त्यामध्ये घरे, निवासी प्लॉट, बांधकाम यासाठी कर्जे, एलएपी किंवा मालमत्तेवर कर्जे, तसेच मॉर्गेज, बिगर-निवासी व प्रकल्प कर्जे यांचा समावेश आहे. कंपनीने इतक्या वर्षांत निर्माण केलेले विस्तृत जाळे, ग्राहकांच्या गरजांचे सखोल आकलन यामुळे डीएचएफएलला भारतातील लहान शहरांतील एलएमआय ग्राहकांना त्यांच्या गरजांनुसार आर्थिक सुविधा देणे शक्य होते. उद्योगाचा भक्कम पाया व या क्षेत्रातील कौशल्य यामुळे डीएचएफएल ही भारतातील एलएमआय ग्राहक श्रेणीतील ग्राहकांना घर घेणे शक्य करण्यासाठी प्रयत्न केंद्रित करणारी, अत्यंत प्रतिष्ठित व विश्वासार्ह वित्तीय सेवा कंपनी आहे. डीएचएफएलचे सीएसआर उपक्रम हा परिणामकारकरित्या राबवल्या जाणाऱ्या आणि आर्थिक साक्षरता, कौशल्य विकास, दुष्काळाचा सामना व अर्ली चाइल्डहूड केअर अँड एज्युकेशन (ईसीसीई) यावर भर असलेला ग्रामीण विकास याद्वारे आर्थिक सबलीकरण करून समाजाच्या गरजा पूर्ण करणे, या कंपनीच्या मूल्यांचा अविभाज्य भाग आहे. डीएचएफएलची प्रतिनिधी कार्यालये दुबई, लंडन व यूएई येथेही आहेत.