– वनरुम किचन, 1 बीएचके व 2 बीएचके घरांची किंमत फक्त 13.62 लाख, 21.18 लाख व 27.74 लाख अनुक्रमे
– कोणतेही अपार्टमेंट, कोणताही मजला.. एकच किंमत
– शिक्षणाच्या सोयी उपलब्ध असणारा एकमेव निवासी प्रकल्प
पुणे: व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लि. (बीएसई स्क्रीप आयडी VASCONEQ) या अत्यंत विश्वासार्ह व पुण्यात मुख्यालय असलेल्या विकसकाने दर्जेदार परवडणारी घरे बांधण्याचा शुभारंभ केला आहे. तळेगावजवळ काटवी येथे ‘व्हॅस्कॉन गुडलाईफ’ हा आपला नवा प्रकल्प या कंपनीने उभारला आहे. वनरुम किचन, 1 बीएचके व 2 बीएचके असे फ्लॅट्स केवळ परवडणाऱ्या दरांतच नव्हे, तर दर्जेदार स्वरुपात ‘व्हॅस्कॉन’ने सादर केले आहेत. मुलांच्या शिक्षणाची चांगली सोय प्रकल्पाच्या आवारातच उभारून ‘व्हॅस्कॉन’ने एक नवीन पायंडा पाडला आहे.
‘गुडलाईफ’मध्ये विविध सोयी-सुविधा असून त्यांत सर्व वयोगटांचा विचार करण्यात आला आहे. प्रत्येक टॉवरमध्ये ग्रंथालय, अभ्यासासाठी वाचनालय, संगणकांची उपलब्धता असलेले विशेष कक्ष बांधण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात सहा व अकरा मजली इमारती उभारून सुमारे 500 घरे सादर करण्यात येणार आहेत. दहा एकरांच्या जागेत वसलेल्या ‘गुडलाईफ’पासून जुना पुणे-मुंबई महामार्ग आणि द्रूतगती महामार्गाला अगदी सहज जाता येते. आयटी कंपन्या आणि विविध उद्योग यांच्या जवळच हा प्रकल्प आहे.
व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लि. चे व्यवस्थापकीय संचालक सिध्दार्थ वासुदेवन यांनी सांगितले, की “गेल्या काही काळापासून परवडणाऱ्या घरांना मोठी मागणी येऊ लागली आहे. शहरांकडे होणारे स्थलांतर आणि सरकारकडून मिळणाऱ्या विविध सवलती यांचा विचार करून गृहनिर्माण प्रकल्प उभे राहात आहेत. कौटुंबिक दृष्टीने मुलांचे संगोपन, शिक्षण व विकास यांना महत्त्व देणारा हा पहिलाच गृहनिर्माण प्रकल्प आम्ही ‘व्हॅस्कॉन गुडलाईफ’च्या रुपाने उभारला आहे. आधुनिक तंत्रज्ञान व आमचे विशेष कौशल्य यांचा उपयोग करून घरातील प्रत्येक व्यक्तीला काहीतरी मिळेल, याचा आम्ही या प्रकल्पात विचार केला आहे. ‘व्हॅस्कॉन’ला तीन दशकांची गौरवशाली परंपरा आहे. उत्कृष्ट दर्जा व पैशाचा पुरेपूर मोबदला या आमच्या तत्वांना आम्ही जपतो. यापुढेही आम्ही नवनवीन संकल्पांचा विचार करू व तसे प्रकल्प राबवू.”
पुणे हे मुंबईच्या जवळ आहेच, त्याशिवाय येथे आयटी, उत्पादन आणि सेवा उद्योग-धंद्यांची भरभराट झालेली असल्याने पुण्यात रिअल इस्टेट क्षेत्राचा विकास झालेला आहे. तथापि बांधकामे मोठ्या प्रमाणावर झाल्याने, तसेच काही विशिष्ट भागांमध्ये किंमती खूपच वाढल्याने आता तळेगावसारख्या शहरालगतच्या परवडणाऱ्या भागांमध्ये गृहनिर्माण प्रकल्प निर्माण होऊ लागले आहेत. या नव्या भागांतही आता इन्फ्रास्ट्रक्चर वाढू लागले आहे.
व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लि. संबंधी –
‘व्हॅस्कॉन इंजिनीअर्स’चे मुख्य कार्यालय पुण्यात आहे. शेअर बाजारात नोंदणी असलेल्या पहिल्या काही रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये ‘व्हॅस्कॉन’चा समावेश होतो. गेल्या 30 वर्षांत कंपनीने निवासी, औद्योगिक बांधकामे, आयटी पार्क, मॉल, मल्टीप्लेक्स, हॉस्पिटॅलिटी व समाज विकास केंद्रे असे विविध दोनशेहून अधिक प्रकल्प देशभरातील सुमारे 30 शहरांमध्ये उभे केले आहेत. यातील काही कामे स्वतःची आहेत, तर काही ‘इपीसी’च्या माध्यमातून केलेली आहेत. यापुढे ‘इपीसी’ पध्दतीच्या कामांवर तसेच परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पांवर भर देण्याचे ‘व्हॅस्कॉन’ने ठरविले आहे.