‘व्होडाफोन’च्या ‘पग-अ-थॉन’ स्पर्धेचा निकाल जाहीर
पुणे : ‘व्होडाफोन इंडिया’तर्फे घेण्यात आलेल्या ‘30 दिवस पग-अ-थॉन’ या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. पुण्यातील प्रतिककुमार कृष्णलाल दुबे, सूरज बालेकुंद्री, तसेच लातूरचे सचिन व्यवहारे व औरंगाबादचे बळीराम शेळके या चार ग्राहकांना ‘आयफोन-8’ हा मोबाईल देऊन ‘व्होडाफोन’तर्फे गौरविण्यात आले.
‘30 दिवस पग-अ-थॉन’ ही गेमिंग स्पर्धा संपूर्ण देशात महिनाभर आयोजित करण्यात आली होती. ‘व्होडाफोन’च्या प्रीपेड तसेच पोस्टपेड ग्राहकांना या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी होती. ‘माय व्होडाफोन’ अॅपच्या माध्यमातून ग्राहकांनी मोबाईलवर सर्फिंग करायचे व विविध पेजेसवर, वेगवेगळ्या ठिकाणी लपून राहिलेल्या ‘व्होडाफोन पग्ज’ना शोधायचे, असे या स्पर्धेचे स्वरूप होते. सात किंवा त्यापेक्षा जास्त पग शोधून काढणार्यांना दोन लाख रुपये किंमतीचे ‘सुपर अॅपल हॅम्पर’ देण्यात आले. ‘आयफोन-8’ आणि ‘सुपर अॅपल हॅम्पर’ या बक्षिसांव्यतिरिक्त शोधलेल्या प्रत्येक ‘पग’मागे वेगळे ‘सरप्राईज गिफ्ट’ देण्यात आले. दररोज एका भाग्यवान विजेत्याने या स्पर्धेत ‘आयफोन-8’ मिळवलेला आहे, असे व्होडाफोनच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
स्पर्धेतील विजेत्यांचे अभिनंदन करताना ‘व्होडाफोन इंडिया’च्या महाराष्ट्र व गोवा विभागाचे प्रमुख आशिष चंद्रा म्हणाले, “व्होडाफोन इंडिया’मध्ये आम्ही नेहमीच नावीन्यपूर्ण योजना आखतो व ग्राहकांना गमतीचे व विविध अनुभव देत असतो. ‘30 दिवस पग-अ-थॉन’ ही ‘माय व्होडाफोन’ अॅपवरील स्पर्धाही याच प्रकारचा आनंद ग्राहकांना देण्यासाठी आयोजित करण्यात आली. एका क्लिकवरून या अॅपमध्ये काय करता येते, याचा अनुभवही ग्राहकांना या स्पर्धेच्या निमित्ताने मिळाला. आमच्या सर्व विजेत्यांचे मी अभिनंदन करतो व त्यांना ‘व्होडाफोन’सह अधिक काळ आनंदात राहता यावे, यासाठी शुभेच्छा देतो.’
‘व्होडाफोन’च्या ग्राहकांना सर्व सेवा मोबाईलवर अगदी एका क्लिकवर मिळाव्यात याकरीता ‘माय व्होडाफोन’ हे अॅप विशेष प्रकारे बनविण्यात आले आहे. बिलाचे पेमेंट, रिचार्ज, आपल्या प्लॅनचे तपशील, नवीन उत्पादनांची उपलब्धता आदी सुविधा या अॅपमध्ये देण्यात आल्या आहेत.