– ६५ एच.पी. २ डब्ल्यू डी ओपन स्टेशन गटामधील ट्रॅक्टरची किंमत ९.९९ लाखांपासून पुढे (एक्स शो रुम महाराष्ट्र)
मुंबई: महिंद्रा अॅंड महिंद्रा कंपनीच्या शेतीपूरक यंत्रसामग्री (‘फार्म एक्विप्ड सेक्टर’ -एफईएस) निर्मिती कंपनीतर्फे ‘नोव्हो ६५ एच.पी.’ आणि ‘नोव्हो ७५ एच.पी.’ क्षमतेच्या नवीन ट्रॅक्टर्सची घोषणा आज करण्यात आली. महिंद्राचे हे नवीन नोव्हो ट्रॅक्टर्स अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून त्याची रचना स्लायलिश आहे. या ट्रॅक्टर्सची किंमत ६५ एछपी, २ डब्ल्यूडीसाठी ९ लाख ९९ हजार रुपये एवढी असून ७५ एच.पी. ४ डब्ल्यू डी क्षमतेच्या ट्रॅक्टर्ससाठी ग्राहकांना १२ लाख ५० हजार रुपये मोजावे लागणार आहेत. या किंमती ‘एक्स महाराष्ट्र’ आहेत.
भारतामधील शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन ‘महिंद्रा’ने या ‘नोव्हो’ ट्रॅक्टर्सची निर्मिती केली आहे. ‘ओपन स्टेशन इंजिन’ गटामध्ये हा ट्रॅक्टर २ डब्ल्यू डी आणि ४ डब्ल्यू डी श्रेणीमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.
‘महिंद्रा रीसर्च व्हॅली’च्या चेन्नई येथील जागतिक संशोधन आणि विकास केंद्रामध्ये या नव्या युगाच्या ट्रॅक्टरची रचना आणि निर्मिती करण्यात आली आहे. देशभरामधील शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करणे हे ‘महिंद्रा नोव्हो’चे ध्येय आहे. तंत्रज्ञान, आरामदायी सेवा आणि एरगोनॉमिक्समधील नवीन मापदंडामुळे ‘महिंद्रा नोव्हो’ भारतामधील शेती उद्योगाचे चित्रच पालटणार आहे. या ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न तसेच त्यांची कार्यक्षमता वाढणार आहे. त्यामुळे त्यांची समृद्धी होणार आहे.
‘महिंद्रा अॅंड महिंद्रा’च्या शेती उपकरणे विभागाचे अध्यक्ष श्री. राजेश जेजुरीकर म्हणाले, “शेतकऱ्यांपर्यंत पोचेल असे तंत्रज्ञान निर्मिणे हा आमचा उद्देश आहे. त्याद्वारे जगभरातील शेकऱ्यांचे आयुष्य बदलून जाईल. ‘फार्मिंग ३.०’ या उपक्रमाचा फोकस तंत्रज्ञानावर असून उत्तम दर्जाचे शेती सेवासुविधा पुरविणे हा उद्देश आहे. भारतीय शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन आम्ही ६५ ते ७५ एच.पी. गटामधील नोव्हो ट्रॅक्टर मालिका सादर केल्याचा आम्हाला अभिमान आहे. शेती उद्योगात हे ट्रॅक्टर नवीन मापदंड निर्माण करतील याची आम्हांला खात्री आहे. लवकरच आम्ही भारतामधील इंटिग्रेटेड केबिनची सुविधा असलेले जागतिक पातळीवरचे प्रॉडक्ट सादर करू.”
देशभरातल्या १२ राज्यांमधील शेतकऱ्यांची मते घेऊन ‘महिंद्रा नोव्हो’चे हे ट्रॅक्टर निर्मिण्यात आले आहेत. ‘महिंद्रा नोव्हो’च्या या जन्मप्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे येथील ट्रॅक्टर्सना ८ राज्यांमधील ३७ केंद्रांवर २५ हजार तासांची चाचणी द्यावी लागते. ट्रॅक्टर निर्मिती क्षेत्रामधील सध्याच्या निकषांनुसार हा सर्वात मोठा चाचणी कार्यक्रम आहे. या चाचणीमधून आलेल्या निकालानुसार ‘महिंद्रा नोव्हो’ची रचना तयार झाली आहे. या ट्रॅक्टर मालिकेमध्ये ‘महिंद्रा नोव्हा’ने अनेक नवीन आधुनिक तंत्रज्ञान आणि सेवासुविधा असलेले ट्रॅक्टर बाजारात आणले आहेत. त्याचा लाभ कृषी क्षेत्रामधील शेकऱ्यांना पीकवृद्धी आणि चांगल्या नियोजनासाठी होणार आहे.
‘महिंद्रा नोव्हो’बद्दल थोडेसे : ६५ ते ७५ एचपी इंजिन क्षमतेसाठी हे ट्रॅक्टर विकसित करण्यात आले आहे. कोणत्याही जमिनीवर समान ऊर्जेने कार्यरत राहण्याची क्षमता या ट्रॅक्टर्समध्ये असून त्यांच्या ‘आरपीएम’मध्ये अल्प घट नोंदली जाते. या ट्रॅक्टर्सची ‘हाय लिफ्ट’ क्षमता असून नियंत्रित हायड्रॉलिक यंत्रणेमुळे शेतीकामासाठी तो सुयोग्य आहे. ऑपरेटिंग स्टेशनची रचना एरगोनिक्स पद्धतीची असल्यामुळे या ट्रॅक्टर्सचा देखभाल खर्च खूप कमी आहे. तसेच त्याद्वारे शेतकऱ्यांची मोठी इंधनबचत होते.
नवीन, अत्याधुनिक तंत्रज्ञानाधीष्ठ इंजिनामुळे कार्यक्षमता तसेच कामगिरी उंचावणार
‘अर्जन नोव्हो’ या ट्रॅक्टरमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असलेले इंजिन कार्यक्षम आहे.
– सर्वाधिक शक्तिशाली इंजिन. ३०५ एनएम एवढा सर्वाधिक टॉर्क आणि बॅकअप टॉर्कची टक्केवारी २८.
– ‘इनलाइन एफआयपी’ असलेले चार सिलिंडरचे इंजिन.
– शक्तिदायी २१०० ‘आरपीएम’.
– या श्रेणीतील सर्वाधिक इंधनबचत करणारा ट्रॅक्टर.
– या श्रेणीतील सर्वाधिक ‘कुलिंग’ यंत्रणा उपलब्ध करणारा ट्रॅक्टर. सर्वात मोठ्या रॅडिएटर आणि एअर क्लिनरमुळे हे शक्य.
– ‘फ्रंट पीटीओ ड्राइव्ह’ची सुविधा उपलब्ध.
उच्च दर्जाच्या अत्याधुनिक सिंक्रोमेश वहन तंत्रज्ञानाचा अंतर्भाव
उच्चा दर्जाच्या अत्याधुनिक सिंक्रोमेश वहन तंत्रज्ञान आणि विविध गटामधील वेगामुळे ‘महिंद्रा नोव्हा’चे ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांना चांगली सेवा उपलब्ध करतात.
– तीन गटामधील लिव्हर्स -(उच्च, मध्यम आणि निम्न)
– भारतामधील कोणत्याही ट्रॅक्टरच्या तुलनेत अधिक गिअर्स. (१५ पुढचे आणि १४ रीव्हर्स गिअर उपब्ध) त्यामुळे शेतीकाम करणे सोयीचे.
– ट्रॅक्टरचा वेग ताशी १.७ किलमोटीर ते ३६ किलोमीटर.
– क्रिपर वेरिएंटमध्येही उपलब्ध (दर ताशी ०.४ किमीपासून वेगाची सुरुवात)
– साठ हॉर्सपॉवर गटामध्ये सर्वोत्तम पीटीओ एच.पी.
– वेगळ्या ‘पीटीओ’द्वारे तीन वेगांचे पर्याय उपलद्ध.
– प्लॅनेटरी ड्राइव्ह फायनल रिडक्शन.
– सर्वात मोठा, विश्वासार्ह आणि दीर्घ काळ चालणारा क्लच.
– परिणामकारक तेल असलेले ट्रिपल डिक्स ब्रेक्स.
अत्याधुनिक प्रिसीजन हायड्रॉलिक्स
अत्याधनिक प्रिसीजन हायड्रॉलिक्स यंत्रणेमुळे ‘अर्जुन नोव्हो’द्वारे अशक्य वाटणारी अवजडे वजने उचलणे शक्य होते.
– अत्याधुनिक उच्च दर्जाचे प्रिसीजन हायड्रॉलिक्स
– २ छिद्रे – बेल क्रॅंक – वेगवेगळ्या जमिनप्रकारांशी संलग्न ठरतील असे.
– २ हजार ६०० किलो वजन उचलण्याच्या गटामध्ये सर्वोत्तम.
– सर्वोत्तम पंप फ्लो. (५६ एलपीएम)
– जमीन सपाटीकरण-विकास, पेरणी, नांगरणी या कामांमध्ये सर्वोत्तम. रोटरी टिलर, एमबी प्लॉ, बटाटे पेरणी, डिगर रेक, बालेरशी संलग्न.
सर्वाधिक आरामदायी सेवा आणि चालविण्यास सोपे
एर्गोनॉनिक्स तंत्रज्ञानाने हे ट्रॅक्टर बनविण्यात आले अस,ल्यामुळे ते या श्रेणीतील सर्वाधिक आरामदायी ट्रॅक्टर्स आहेत. ‘अर्जुन नोव्हो’ ट्रॅक्टर्समधील अत्याधुनिक सेवासुविधांमुळे शेतकऱ्यांना शेतात दीर्घ काळ आणि न थकता काम करणे शक्य होते.
– पूर्ण फ्लॅट प्लॅटफॉर्म पद्धतीचा ट्रॅक्टर.
– आरामदायी आसनव्यवस्थात. चार पद्धतीने फिरवता येणारी डिलक्स आसने. एअर सस्पेंडेड खुर्च्या.
– टिल्टेबल स्टिअरिंग.
– सस्पेंडेड पेडल्ससारखे अत्याधनिक एर्गोनॉमिक नियंत्रक.
– ऑटो निर्देशांकासहित स्टायलिश इन्स्ट्रुमेंट क्लस्टर.
– कारसदृश बटणे
– हेड लॅंपच्या भोवती उत्तम स्टाललिश बांधणी
– दोन पोझिशनमध्ये एका बटणाद्वारे बॉनेट उघडणे शक्य. (५५ डिग्री आणि ८० डिग्री)
– वातानुकुलित यंत्रणेचा अवलंब करणे शक्य.
अमेरिकेत अत्याधुनिक पद्धतीने बांधणी केलेले एसी केबिन ट्रॅक्टर लवकरच येणार
जागतिक पातळीवरचे या ‘नोव्हो ट्रॅक्टर्स’मध्ये खालील पद्धतीच्या सेवासुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
– पुश बटणाद्वारे ट्रॅक्टर सुरू आणि बंद करणे शक्य.
– ऑटो डायग्नोस्टिक इंडिकेटरतर्फे डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर
– १० इंचाचा इन्फोटेनमेंट टच स्क्रीन.
– डे रनिंग लाइट.
– क्लचमुक्त फॉरवर्ड आणि रीव्हर्ससाठी पॉवर शटल पर्याय.
– हिटिंग, व्हेंटिलेशन आणि वातानुकुलित केबिन.
– की मोबीलायझर.
– रीअर व्ह्यू कॅमेरा.
– टायरट्रॉनिक्स.
स्टायलिंग
या ओपन स्टेशन ट्रॅक्टरमध्ये खालील पद्धतीच्या सेवासुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
– मेटॅलिक डीप रेड पेंट
– स्टायलाइज्ड मेटॅलिक ३ थ्री डिकल.
‘महिंद्रा’बद्दल थोडेसे :
‘द महिंद्र ग्रुप’ हा १९ अब्ज डॉलर्सचा असून तो विविध कंपन्यांनी समृद्ध झाला आहे. या ग्रुपमुळे देशातील ग्रामीण भागाचा कायापालट झाला असून लोकांचे जीवनमान उंचावले आहे. वाहननिर्मिती, माहिती आणि तंत्रज्ञान, वित्तीय सेवा, पर्यटन या क्षेत्रांबरोबरच ही कंपनी जगभरात ट्रॅक्टर निर्मितीमध्येही अग्रेसर आहे. कृषी, अंतरीक्ष, खासगी वाहने, काम्पोनंट्स, संरक्षण, लॉजिस्टिक्स, रियल इस्टेट, पुर्नऊर्जा, स्पीडबोट्स आणि लोखंड निर्मिती क्षेत्रामध्येही ही कंपनी काम करते. शंभराहून अधिक देशांमध्ये कार्यरत असलेल्या या कंपनीचे मुख्यालय भारतात असून २ लाख ४० हजार कर्मचारी कार्यरत आहेत.