Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

बेंगळुरू, पुण्यातील रिअल इस्टेट बाजार सावरणार जलद गतीने

Date:

‘मॅजिकब्रिक्स ग्राहक सर्वेक्षणा’तील निरीक्षण

· ‘कोरोना’च्या संकटामुळे घरखरेदीचा निर्णय रद्द करण्याचे ग्राहकांचे प्रमाण बेंगळुरू व पुण्यात सर्वात कमी

· घरांच्या जास्त किंमतींमुळे दिल्ली/एनसीआर व मुंबईतील ग्राहकांमध्ये घरखरेदीबाबत अनिश्चितता

नोएडा – ‘कोविड-19’च्या उद्रेकामुळे देशभरातील रिअल इस्टेट व्यवसायावर विपरीत परिणाम झाला असला, तरी बेंगळुरू व पुण्यातील ग्राहकांच्या मनस्थितीवर त्याचा कमीतकमी परिणाम झालेला दिसतो. दिल्ली/एनसीआर व मुंबईतील ग्राहकांमध्ये मात्र तेथील घरांच्या किंमतींच्या मुद्द्यामुळे अनिश्चितता आहे, असे निरीक्षण ‘मॅजिकब्रिक्स कोविड-19 प्रॉपर्टी बायर्स सेंटिमेंट सर्व्हे’मध्ये मांडण्यात आले आहे.

‘मॅजिकब्रिक्स’च्या सर्वेक्षणानुसार, मोठ्या शहरांमध्ये ग्राहकांच्या घरखरेदीच्या 80 टक्के निर्णयांवर ‘कोविड-19’च्या प्रसाराचा तात्पुरता परिणाम झालेला आहे; तथापि पुणे व बंगळुरू या शहरांतील ग्राहक ‘कोविड-19’ची साथ ओसरल्यावर घरखरेदी करण्यावर ठाम आहेत. दिल्ली/एनसीआर व मुंबई येथील बाजारपेठा टाळेबंदीपूर्वी मंदावल्या होत्या व टाळेबंदीनंतरही ही परिस्थिती तशीच राहील, अशी चिन्हे आहेत.

‘कोविड-19’मुळे घरखरेदी लांबणीवर पडण्याचा अंदाजे कालावधी

ग्राहकांच्या मनस्थितीबाबतच्या या सर्वेक्षणाविषयी बोलताना ‘मॅजिकब्रिक्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर पै म्हणाले, ‘’कोविड-19चा उद्रेक व त्यानंतरची टाळेबंदी यांमुळे भारतातील रिअल इस्टेट बाजारपेठेवर मोठा परिणाम झालेला आहे. तथापि आमच्या सर्वेक्षणानुसार, 67 टक्के ग्राहक अजूनही घरखरेदी करण्यास अनुकूल आहेत. त्यांनी यासाठी थोडे काटकसरीचे धोरण आखले असले, तरी ते घरखरेदीबाबत ठाम आहेत. बेंगळुरू व पुणे येथील बाजारांत प्रत्यक्ष वापरकर्त्या ग्राहकांचे वर्चस्व असते. गेल्या 6 महिन्यांत या बाजारात चांगली उलाढाल झालेली आहे. ही उलाढाल यापुढेही अशीच चालू राहील, असे या बाजारातील वातावरण आहे. तयार घरे घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढला असल्याने, जलद आणि पुरेसा पुरवठा झाल्यास या बाजारांत पुन्हा जोम निर्माण होण्याल मदत होईल.’’

यापुढील काळात घरांच्या किंमती कशा असतील, याविषयी खूप निश्चितता असली, तरी टाळेबंदीच्या काळातही बेंगळुरू (5 टक्के) आणि पुणे (2 टक्के) या शहरांमध्ये किंमतींमध्ये किरकोळ स्वरुपाचीच घट झाली आहे. तुलनेने हैदराबाद व अहमदाबाद येथील बाजारांत किंमतींमध्ये टाळेबंदीच्या काळात जास्त घट झालेली आढळते. या दोन्ही शहरांमध्ये गेल्या वर्षभरात घरांच्या किमती बऱ्यापैकी वाढलेल्या होत्या. हैदराबादमधील किंमती गेल्या 12 महिन्यांत त्याअगोदरच्या वर्षाच्या तुलनेत 15 टक्क्यांनी वाढल्या होत्या, मात्र टाळेबंदीच्या कालावधीत त्या तब्बल 9 टक्क्यांनी घसरल्या. त्याचप्रमाणे अहमदाबादमधील किंमती गेल्या 12 महिन्यांत अगोदरच्या वर्षाच्या तुलनेत 8 टक्क्यांनी वाढल्या होत्या, मात्र टाळेबंदीमध्ये 7 टक्क्यांनी घसरल्या.

देशातील 8 मोठ्या शहरांमध्ये सरासरी 4 टक्क्यांनी सध्या किंमती उतरलेल्या आहेत; अर्थात बेंगळुरू, अहमदाबाद, पुणे व चेन्नई येथील ग्राहकांनी, टाळेबंदीच्या काळात किंमतींमध्ये चढउतार होतील, असे गृहीत धरलेले आहे.

किंमतींबद्दल अनिश्चितता वाटणार्‍या ग्राहकांची शहरांगणिक टक्केवारी

‘कोविड-19’चे संकट दूर झाल्यानंतर घरांच्या किंमतींवर सवलती मिळतील, या आशेने बहुसंख्य नागरिकांनी खरेदीची इच्छा बाळगली असल्याचे ‘मॅजिकब्रिक्स’ला आढळून आले आहे. घरांची खरेदी पुन्हा जोमाने सुरू होण्याकरीता 20 टक्के सवलत देणे पुरेसे होईल. तसेच किमती 10 ट्क्क्यांपेक्षा कमी उतरल्या, तर केवळ 2 टक्के ग्राहक खरेदीचा निर्णय त्वरीत घेतील, असेही निरीक्षण सर्वेक्षणात नोंदविण्यात आले आहे.

घरांच्या किमती उतरण्याबरोबरच, ‘डाऊनपेमेंट’ करण्यासंबंधीच्या अटी शिथिल झाल्यास, घरखरेदीनंतरची दगदग कमी होण्याकरीता सुतारकाम व स्वयंपाकघरातील उपकरणे विकसकांनी लावून दिल्यास, साईटला भेटी देणे कमी करण्याकरीता व्हिडिओ व छायाचित्रांची मदत मिळाल्यास, कागदपत्रे ऑनलाईन स्वरुपात स्वीकारली गेल्यास आणि घरनोंदणी ऑनलाईन झाल्यास ग्राहकांचा घरखरेदीचा उत्साह आणखी वाढू शकतो, असे सर्वेक्षणात आढळले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गोव्यात नाईटक्लबपासून हॉटेल्सपर्यंत सर्व आस्थापनांची होणार सुरक्षा पुनर्तपासणी

“हडफडेची पुनरावृत्ती नाही! गोवा सरकारची कठोर भूमिका; संयुक्त अंमलबजावणी...

शीतल तेजवानीचा आता थेट रणबीर कपूरवर निशाणा!

पुणे-कोरेगाव पार्क , मुंढवा येथील गाजलेल्या 40 एकराच्या सरकारी...

पार्थ अजित पवारांचा जमीन घोटाळा:शीतल तेजवानीने लपवून ठेवलेले दस्त अखेर जप्त

पुणे- कोरेगाव पार्क मुंढवा येथील सरकारी जमीन लाटण्यासाठी...