महाराष्ट्रातील १७,४०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना दिली जात आहे घरून अभ्यास करण्याची सुविधा

Date:

  • भारतातील ६०० पेक्षा जास्त पार्टनर शाळांमधील २.५ लाख विद्यार्थी सध्या लीड स्कूलचा लाभ घेत आहेत
  • २ एप्रिल२०२० पासून ३० लाख वेळा पाहिले गेले व्हिडीओज्

 पुणे१७ एप्रिल२०२०: देशभरातील लॉकडाउन ३ मे २०२० पर्यंत वाढवण्यात आला आहे आणि देशभरातील शाळा बंद आहेतअशा परिस्थितीत लीड स्कूल देशातील २.५ लाखांहून जास्त शालेय विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास ऑनलाईन पद्धतीने सुरु ठेवण्यासाठी मदत करत असून त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष कोणताही खंड न पडता पुढे चालू आहे.  करोना विषाणूच्या संसर्गाला सुरुवात झाल्यामुळे १५ एप्रिल रोजी भारत सरकारने शिक्षण संस्थांना त्यांचे अभ्यासाचे वर्ग ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म्समार्फत सुरु ठेवण्याच्या सूचना दिल्यानुसार ही पावले उचलली गेली आहेत.

 

सध्या एकट्या महाराष्ट्रात या प्रोग्राममार्फत ४८ शाळांमधील १७,४०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना लाभ मिळत आहेत.

 

भारतातील सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेल्या आणि तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या शैक्षणिक प्रणालींपैकी एक – लीड स्कूलने १६ मार्च रोजीच म्हणजे सरकारने २१ दिवसांचा राष्ट्रीय लॉकडाउन लागू करण्याअगोदर आपला स्कूल@होम प्रोग्रॅम सुरु केला होता.  त्यावेळी फक्त काही राज्य सरकारांनी लॉकडाउनच्या घोषणा करायला सुरुवात केली होती.  मुले शाळेत जाऊ शकत नसल्याने शाळाच मुलांच्या घरी आणत लीड स्कूलने २ एप्रिल रोजी नवीन शैक्षणिक वर्ष सुरु केले.  आजतागायत या प्रोग्रॅमअंतर्गत झालेल्या ऑनलाईन क्लासेसचे व्हिडीओज् जवळपास ३० लाख वेळा पाहिले गेले आहेत.  या उपक्रमामुळे इंग्रजी माध्यमाच्या ६०० पेक्षाही जास्त शाळांमधील विद्यार्थ्यांना घरी राहून शिक्षणाचा लाभ मिळत आहे.  यामुळे भारताच्या शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल घडून येत आहे.

 ऑनलाईन शिक्षणाचा अशाप्रकारचा पहिलाच उपक्रम असलेला लीड स्कूल@होम प्रोग्रॅम पूर्णपणे केंद्रीय आणि राज्य शिक्षण मंडळाने आखून दिलेल्या आणि शाळांमध्ये शिकवल्या जाणाऱ्या मूलभूत अभ्यासक्रमावर आधारित आहे.  लीड स्कूल@होम प्रोग्राममध्ये विद्यार्थ्यांना इतर एज्युकेशन प्लॅटफॉर्म्ससारखे पूरक कोर्सेस नव्हे तर शाळेत ज्याप्रमाणे अभ्यास चालतो त्याप्रमाणे नियमित अभ्यासक्रम शिकवला जातो.

 भारतात शालेय विद्यार्थ्यांची संख्या २५० दशलक्ष आहे आणि त्यांच्यापैकी बहुसंख्य विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शाळा सुविधा उपलब्ध नाही.  लीड स्कूल@होम हे आता भारतातील प्रत्येक मुलामुलींसाठी खुले आहे. https://leadschool.in/lead-school-at-home.html या लिंकवर जाऊन पालक आपल्या पाल्याची नोंदणी करू शकतात.

 लीड स्कूल हा तंत्रज्ञानाला सर्वाधिक महत्त्व देणारामल्टी-मोडल लर्निंग प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये सातत्याने नवनवीन गोष्टी आणल्या जातात.  लीड स्कूलने तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षणाचे नवे मार्ग खुले करवून दिलेले असल्याने आणि शिक्षणाचा ही नवी सर्वसामान्य प्रणाली स्वीकारणे खूप जास्त सोपे करून दिल्यामुळे आज त्यांच्या पार्टनर शाळापालकांना आणि विद्यार्थ्यांना अनेक लाभ मिळत आहेत.

 स्कूल@होम अंतर्गत अनेक फायदे मिळवून देण्यासाठी लीड स्कूल अनेक शाळांचे चालकप्रशासक आणि शिक्षक यांच्यासोबत मिळून काम करत आहे.  शैक्षणिक वर्ष वेळेवर सुरु करण्याव्यतिरिक्त पहिल्या दिवसापासून लाईव्ह ऑनलाईन क्लासेस आणि विद्यार्थ्यांसाठी डिजिटल कन्टेन्ट व वर्कबूक्स उपलब्ध करवून देणे यांचा देखील यामध्ये समावेश आहे.  अभ्यास सुरु करण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अतिरिक्त डिव्हाईसची गरज नाही.  पार्टनर शाळांना आपल्या प्रक्रियांमध्ये सुधारणा करता यावीशिक्षण जास्तीत जास्त विद्यार्थीकेंद्री बनावेशिक्षक अधिक सक्षम व्हावेत आणि विद्यार्थी व शिक्षक या दोघांचीही कामगिरी अधिकाधिक गुणवत्तापूर्ण व्हावी यासाठी लीड स्कूल त्यांना मदत करते.

 लीड स्कूलचे सह-संस्थापक व सीईओ श्री. सुमीत मेहता यांनी सांगितलेआजाराच्या साथीमुळे आणि लॉकडाउनमुळे प्रीस्कूल्स आणि के-१२ शाळांमधील वर्ग चालवण्यात खंड पडलेला असल्याने शाळा चालकशिक्षकविद्यार्थी आणि पालकांच्या मनात अनिश्चितता निर्माण झाली आहे.  जर शाळा वेळेत सुरु झाल्या नाहीत तर आपल्याला एका शैक्षणिक वर्षाला मुकावे लागेल की काय अशी भीती विद्यार्थ्यांना वाटत आहे.  त्यांची ही चिंता दूर करण्यासाठी आम्ही अजिबात वेळ न दवडता लीड स्कूल@होम हा प्रोग्रॅम देशभरातील इंग्रजी माध्यमाच्या सर्व शाळांना उपलब्ध करवून दिला.  शिक्षण देण्याचा आमचा संकल्प सर्वसामान्य आणि संकट काळातही कायम राखला जावा यासाठी आम्ही हे करत आहोत.  शिक्षण ही सातत्यपूर्ण आणि जीवनभर चालणारी प्रक्रिया असावी असे आमचे ठाम मत आहे.  स्कूल@होमची रचना करताना ते शहरी आणि ग्रामीण भारतातील विद्यार्थ्यांना समजायला आणि घराच्या वातावरणात राहून अभ्यास करण्यासाठी सोपे असावे अशा प्रकारे डिझाईन करण्यात आले आहे.  मला पक्की खात्री आहे कीशिक्षणाच्या या एकात्मिक प्रणालीमुळे सर्व हितधारकांना आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सध्या ज्यांना त्याची सर्वाधिक गरज आहे त्या विद्यार्थ्यांना याचा खूप फायदा होईल.”      

 शहरे आणि दुसऱ्यातिसऱ्याचौथ्या श्रेणीतील नगरांमधील ८०० पेक्षा जास्त खाजगी शाळांमधील ३ लाखांहून जास्त विद्यार्थ्यांना आजवर लीड स्कूलने आपल्या सुविधा पुरवल्या आहेत.  देशातील सर्व सीबीएसई आणि राज्य शिक्षण मंडळांच्या विद्यार्थ्यांसाठी लीड स्कूल@होम प्रोग्रॅम आधीच उपलब्ध आहे.  लीड स्कूल पॅरेन्ट ऍप विद्यार्थ्यांना होमवर्क आणि असेसमेंट्स पुरवते तसेच पालकांना मुलांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती देते.

 लाईव्ह क्लासेसहोमवर्क आणि असेसमेंट्स याबाबत माहिती मिळवण्यासाठी कृपया येथे लॉग ऑन करा – http://bit.ly/LEADappforparent

लीड स्कूल@होम प्रोग्रॅममध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक शाळांनी कृपया या क्रमांकावर संपर्क साधावा –  8682833333

लीड स्कूल

लीडरशिप बॉलवर्ड ही भारतातील सर्वाधिक वेगाने प्रगती करत असलेल्या शिक्षण कंपन्यांपैकी एक कंपनी लीड स्कूलची प्रायोजक आहे.  लीड स्कूलची स्थापन २०१२ मध्ये करण्यात आली.  ही शाळांसाठी तयार करण्यात आलेली एकात्मिक शिक्षण प्रणाली आहे जी विद्यार्थ्यांना उच्चतम स्तरावर शिक्षण घेण्यात मदत करते.  लीड स्कूलमध्ये तंत्रज्ञान, अभ्यासक्रम आणि अध्यापन शास्त्र यांचा मिलाप घडवून आणून शिकवण्याची आणि शिकण्याची एक व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे, जेणेकरून देशभरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची अभ्यासातील आणि शिक्षकांची शिकवण्यातील कामगिरी सुधारता येईल.  लीड स्कूलच्या मालकीच्या सहा शाळा असून देशभरातील १५ राज्यांमधील द्वितीय ते चतुर्थ श्रेणीच्या शहरांसह ३०० पेक्षा जास्त शहरांमधील ८०० पेक्षा जास्त शाळा लीड स्कूलच्या सहयोगी आहेत.  या शाळांमध्ये मिळून जवळपास ३ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पहिल्या दिवशीच एकानेही भरला नाही उमेदवारी अर्ज

पुणे- एकीकडे विरोधकांची बलस्थाने असलेले ,किंवा निवडून येऊ शकणारे...

5 लाखांची लाच घेताना जीएसटी अधिकाऱ्याला अटक:सीबीआयने ठोकल्या बेड्या, घरात 18 लाखांची रोकड सापडली

मुंबई-मुंबईच्या सीजीएसटी कार्यालयाचे अधीक्षक एका खाजगी कंपनीच्या संचालकाकडून लाचेची...

ठाकरे गटाला आणखी एक धक्का; घाटकोपरमधील डॉ. अर्चना संजय भालेराव यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुंबई, दिनांक २३ डिसेंबर २०२५ बृह्ममुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या आधी १२६,...