टाटा ट्रस्ट्स भारताच्या कोविड-१९ विरोधातील लढाईसाठी अत्यावश्यक वस्तूंचे एअरलिफ्टिंग करत आहे

Date:

मुंबई१६ एप्रिल२०२०:  कोविड-१९ विरोधातील लढ्यामध्ये सहकार्य देत टाटा ट्रस्ट्स अत्यावश्यक वस्तू देशभरात उपयोगात आणता याव्यात यासाठी त्यांचे एअर लिफ्टिंग करत आहे.  हे काम टाटा इंटरनॅशनल लिमिटेडच्या सहयोगाने केले जात आहे.

आयात केल्या जात असलेल्या वस्तूंमध्ये व्यक्तिगत बचाव उपकरणांचे किट्स (संपूर्ण शरीर झाकले जाईल असे संरक्षक आवरण, मास्क्स, हातमोजे आणि गॉगल्स सहित) एन९५/केएन९५ मास्क्स आणि विविध ग्रेडस्चे सर्जिकल मास्क्स यांचा समावेश आहे. एका व्यक्तीसाठी एक युनिट अशाप्रकारच्या जवळपास एक कोटी युनिट्सचे कंसाइन्मेंट वेगवेगळ्या बॅचेसमध्ये आणले जाईल आणि येत्या आठवड्यांमध्ये देशभरातील सर्वाधिक गरजू भागांमध्ये त्यांचे वितरण केले जाईल.  या साहित्याच्या सोर्सिंगसाठी बांधील ठेवण्यात आलेले एकूण मूल्य जवळपास १५० कोटी रुपये आहे.

चेअरमन श्री. रतन एन टाटा यांनी आपल्या निवेदनात नमूद केले होते की, आजवरच्या सर्वात गंभीर समस्यांपैकी एक कोविड १९ विरोधातील लढाईसाठी आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी तात्काळ आपत्कालीन साधने तैनात करणे गरजेचे आहे.  त्यानुसार टाटा ट्रस्ट्सने हे काम हाती घेतले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...

पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदचे तीन सदस्य काश्मीर मध्ये ठार मारले..

दहशतवादी एका टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या मातीच्या घरात लपलेले आढळले...