टाटा पॉवरने जिंकला इन्नोव्हेशन क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान “द एडिसन अवॉर्ड”

Date:

पुणे-टाटा पॉवरला त्यांच्या “क्लब एनर्जी #Switchoff2SwitchOn” या अभियानासाठी अतिशय प्रतिष्ठेच्या जगातील “एडिसन अवॉर्ड” ने सन्मानित केले गेले आहे.  टाटा पॉवरला हा मानाचा पुरस्कार सोशल इन्नोव्हेशन विभाग आणि सोशल एनर्जी सोल्युशन्स उपविभागात बहाल करण्यात आला आहे.  जागतिक कीर्तीचे वैज्ञानिक थॉमस अल्वा एडिसन यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या “द एडिसन अवॉर्ड” मध्ये जगातील सर्वोत्तम इन्नोव्हेशन्स अर्थात नाविन्यपूर्ण संकल्पना व शोध आणि त्यांच्या इनोव्हेटर्सना अर्थात प्रणेत्यांना सन्मानित केले जाते.  नावीन्यपूर्णता आणि व्यवसायामध्ये संपादन केलेले यश यासाठी एखाद्या कंपनीला दिले जाऊ शकतील अशा सर्वोच्च सन्मानांमध्ये “द एडिसन अवॉर्ड”चा समावेश होतो.  “द एडिसन अवॉर्ड” मार्फत नवीन उत्पादन आणि सेवांचा विकासमार्केटिंगमानव-केंद्रीत रचना आणि नावीन्यपूर्णतेतील सर्वोच्च कामगिरीचा गौरव केला जातो.  या पुरस्काराच्या विजेत्यांच्या उत्पादनांमध्ये व सेवांमध्ये “आमूलाग्र परिवर्तन” घडवून आणण्याची क्षमता असतेत्याचप्रमाणे त्यामध्ये संकल्पनामूल्यप्रदान करण्याच्या प्रक्रिया व प्रभाव या चार निकषांमध्ये नावीन्यपूर्णतेमध्ये सर्वोत्कृष्टता आणि नेतृत्व दर्शवले जाते.

 

टाटा पॉवरच्या क्लब एनर्जी हा गेल्या १२ वर्षांपासूनचा पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण उपक्रम शालेय विद्यार्थ्यांमार्फत चालवला जातो.  आज हा उपक्रम जागतिक चळवळ म्हणून ओळखला जाण्याबरोबरीनेच एक यशस्वी मॉडेल म्हणून देखील याकडे पाहिले जाते.  पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणासाठी ऊर्जेचा योग्य वापर करण्याबाबतच्या या उपक्रमात देशभरातील ५३३ शाळांचा सहभाग असून २००७ मध्ये सुरुवात झाल्यापासून या उपक्रमाने २९.८ मिलियन युनिट्स विजेची बचत केली आहे.  दरडोई १२०० युनिट्स वीज वापर गृहीत धरल्यास टाटा पॉवर क्लब एनर्जीमुळे झालेली वीज बचत ही भारतातील जवळपास २५,००० घरांना वर्षभर पुरेल इतकी आहे.  टाटा पॉवर क्लब एनर्जीमध्ये त्याच्या सदस्यांना चार प्रकारे जागरूक केले जाते – शिक्षणसुधारणासहभाग आणि सक्षमीकरण.  असा स्वयंपूर्ण समाज केला जावा जो आपल्या पुढील पिढ्यांना ऊर्जा बचतीची शिकवण देईल हे टाटा पॉवर क्लब एनर्जीच्या कार्यपद्धतीचे उद्धिष्ट आहे.

 

भारताखेरीज आशियायुरोप व उत्तर अमेरिका येथील इतर देश फ्रांसजर्मनीयुनायटेड स्टेट्सआयर्लंडफिलिपिन्सबांग्लादेशसंयुक्त अरब अमिरातदक्षिण आफ्रिका आणि नेपाळ या देशांमध्ये देखील टाटा पॉवर क्लब एनर्जीचे फॉलोअर्स कार्यरत आहेत.  आजवर क्लब एनर्जीला विविध सन्मान मिळाले आहेत.  क्लब एनर्जी उपक्रमावर आयआयएम अहमदाबादमध्ये एक केस स्टडी करण्यात आला आहे – क्लब एनर्जी: द केस स्टडी ऑफ टाटा पॉवर्स इनिशिएटिव्ह टू प्रमोट एनर्जी कन्झर्वेशन अमंग स्कूल चिल्ड्रेन‘.  टेडेक्स आयआयएम अहमदाबादमध्ये “ड्रायविंग कन्झर्वेशन थ्रू शेपिंग द फ्युचर जनरेशन” या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित जागतिक मंचावर क्लब एनर्जी अभियानाला प्रदर्शित करण्यात आले होते.  एशियन लीडरशिप अवॉर्डऑकलंड येथील इंटरनॅशनल फोरममध्ये बेस्ट प्रेक्स (बेस्ट प्रॅक्टिस) आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार व गौरव टाटा पॉवर क्लब एनर्जीला मिळाले आहेत.

 

या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना टाटा पॉवरचे सीईओ व एमडी श्री. प्रवीर सिन्हा यांनी सांगितलेकोणत्याही व्यवसायाचा उद्देश समाजाचे ऋण फेडण्यापुरता मर्यादित असू नये तर व्यवसायातील प्रक्रियाकार्यपद्धती यामध्ये सामाजिक जबाबदारीचे भान पुरेपूर राखले जात आहे आणि त्या पर्यावरणाच्या दृष्टीने अनुकूल आहेत हे देखील सुनिश्चित केले जाणे अतिशय महत्त्वाचे आहे.  माननीय जमशेदजी टाटा यांनी आखून दिलेल्या सिद्धांतांनुसार आम्ही मानवी जीवनावर सकारात्मक प्रभाव निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतो.  आमच्या या प्रयत्नांचे फलित म्हणून एडिसन अवॉर्ड हा सन्मान मिळाल्याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे आणि त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. हा पुरस्कार म्हणजे व्यवसायामध्ये नावीन्यपूर्णता आणण्याच्या आणि भविष्यातील पिढ्यांना प्रेरणा देत राहण्याच्या आमच्या प्रयत्नांचे प्रतीक आहे.”  

 

ग्रीन कम्युनिटीवर आयोजित करण्यात आलेल्या सक्रियता अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी क्लब एनर्जीने मार्फत सर्वांना आवाहन केले आहे.  यासाठी अनेक डिजिटलबीटीएलपीआरइंटर्नल प्लॅटफॉर्म्स आणि प्रत्यक्ष कार्यक्रमांचा देखील वापर केला जात आहे.  या अभियानामध्ये आजवर अनेक स्पर्धाप्लास्टिक स्वच्छता मोहीमशैक्षणिक एव्हीज् आणि क्रिएटिव्हज यांचे आयोजन करून अपव्ययी सवयी बंद करून स्मार्ट सवयी सुरु करण्याचा आणि अशाप्रकारे बचत करण्याचा संदेश दिला गेला आहे.  या उपक्रमाने आजवर –

 

  • डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर संपूर्ण जगभरातून ऑर्गॅनिकली २ मिलियन्सपेक्षा जास्त इम्प्रेशन्स मिळवले आहेत.
  • ग्रीन कम्युनिटीवर १०,००० पेक्षा जास्त प्रतिज्ञा ऑर्गॅनिकली घेतल्या गेल्या आहेत.
  • स्विच ऑफ प्लास्टिक” उपक्रमाच्या माध्यमातून ८६ टनांपेक्षा जास्त प्लास्टिक जमा केले गेले.
  • देशभरातील ५३३ पेक्षा जास्त शाळांना अभियानामध्ये सहभागी करवून घेतले.
  • २५ मिलियन पेक्षा जास्त नागरिकांना जागरूक केले.
  • २९.८ मिलियन पेक्षा जास्त युनिट्स विजेची बचत केली आहे.  एवढ्या विजेतून तब्बल १०,००० घरांना संपूर्ण वर्षभर वीजपुरवठा केला जाऊ शकतो.
  • ,४७,९८६ एनर्जी चॅम्पियन्स आणि ३,८६,६३३ एनर्जी अम्बॅसॅडर्स तयार केले आहेत.
  • २००० पेक्षा जास्त स्वयंपूर्ण मिनी एनर्जी क्लब्स तयार केले आहेत.
  • या उपक्रमाच्या माध्यमातून झालेली ऊर्जा बचत म्हणजे २५,००० टन कार्बन डाय ऑक्साइडचे उत्सर्जन होण्यापासून वाचवण्यासारखे आहे.

 

सर्व नामांकनांची पडताळणी एडिसन अवॉर्ड्स स्टीअरिंग कमिटीमार्फत केली जाते आणि त्यातून निवडण्यात आलेल्या नामांकनांना अंतिम निवडीसाठी एका स्वतंत्र जजींग पॅनेलकडे पाठवले जाते.  या जजींग पॅनेलमध्ये उत्पादन विकासरचनाअभियांत्रिकीविज्ञानमार्केटिंगशिक्षण या विविध क्षेत्रांमधील तब्बल ३००० पेक्षा जास्त व्यावसायिकांचा आणि विविध उद्योगक्षेत्रांमधील व्यावसायिक संघटनांचा समावेश आहे.

 

एडिसन अवॉर्ड्सबद्दल अधिक माहितीसाठी कृपया या वेबसाईटवर संपर्क साधावा – www.edisonawards.com  २०२१ सालच्या पुरस्कारांसाठी अर्ज प्रक्रिया ऑगस्ट २०२० मध्ये सुरु होईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पहिल्या दिवशीच एकानेही भरला नाही उमेदवारी अर्ज

पुणे- एकीकडे विरोधकांची बलस्थाने असलेले ,किंवा निवडून येऊ शकणारे...

5 लाखांची लाच घेताना जीएसटी अधिकाऱ्याला अटक:सीबीआयने ठोकल्या बेड्या, घरात 18 लाखांची रोकड सापडली

मुंबई-मुंबईच्या सीजीएसटी कार्यालयाचे अधीक्षक एका खाजगी कंपनीच्या संचालकाकडून लाचेची...

ठाकरे गटाला आणखी एक धक्का; घाटकोपरमधील डॉ. अर्चना संजय भालेराव यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुंबई, दिनांक २३ डिसेंबर २०२५ बृह्ममुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या आधी १२६,...