बँक ऑफ बडोदाने बाधित एमएसएमई, कॉर्पोरेट कर्जदारांसाठी जाहीर केली इमर्जन्सी क्रेडिट लाइन सुविधा

Date:

कोविड-19 साथीमुळे निर्माण झालेली रोखतेची तात्पुरती चणचण भागवण्यासाठी उपक्रम

 मुंबईबँक ऑफ बडोदा या भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या सरकारी बँकेने कोविड 19चा फटका बसलेल्या सध्याच्या एमएसएमई व कॉर्पोरेट कर्जदार ग्राहकांना शॉर्ट टर्म लोन / डिमांड लोन या स्वरूपामध्ये इमर्जन्सी क्रेडिट लाइन उपलब्ध करण्यासाठी बडोदा कोविड इमर्जन्सी क्रेडिट लाइन-बीसीईसीएल ही सुविधा जाहीर केली आहे.

या अनुषंगाने, बँकेने फंड बेस्ड वर्किंग कॅपिटल लिमिट्सच्या (एफबीडब्लूसी) जास्तीत जास्त 10% आणि 200 कोटी रुपयांपर्यंत रकमेचा वापर करायचे ठरवले आहे. adhoc/excess/SLC/गोल्ड कार्ड लिमिट याव्यतिरिक्त ही सेवा दिली जाणार आहे.

कॉर्पोरेट कर्जदारांसाठी व्याजदर स्टँडर्ड प्रीमिअमविना, 1 वर्ष 8.15% एमसीएलआर असणार आहे आणि एमएसएमईंसाठी व्याजदर 8.00% बडोदा रेपो लिंक्ड लेंडिंग रेट इतका असणार आहे.

मार्च 26, 2020 रोजीपर्यंत SMA 01 किंवा SMA 02 असे विभाजन करण्यात न आलेली आणि मंजुरीच्या तारखेपर्यंतची सर्व सर्वसाधारण खाती या योजनेअंतर्गत कर्जासाठी पात्र ठरणार आहेत.

6 महिने (जास्तीत जास्त) मोरॅटोरिअम असून, कर्जाची 15% रक्कम पहिल्या 6 महिन्यांत मासिक किंवा तिमाही हप्त्याद्वारे परत करायची आहे आणि उरलेल्या 85% रकमेची परतफेड पुढील 12 महिन्यांमध्ये करायची आहे. जेव्हा लागू असेल तेव्हा व्याज भरायचे आहे.

80 टक्के प्रस्तावित मर्यादांना स्टॉक्स व रिसिव्हेबल यांच्या मूल्याचा आधार मिळेल, तर 20% कर्जे क्लीन बेसिसनुसार दिली जाऊ शकतात. गरज असल्यास, सध्या मंजूर करण्यात आलेल्या कालावधीच्या व्यतिरिक्त आणखी 3 महिन्यांचा कालावधी दिला जाऊ शकतो.

कार्यकारी संचालक विक्रमादित्य सिंग खिची यांनी सांगितले, “ग्राहकांना आणि पर्ययाने संपूर्ण अर्थव्यवस्थेला मदत करण्याच्या हेतूने ग्राहकांच्या पाठिशी उभे राहणे, हे बँक ऑफ बडोदाचे मुख्य उद्दिष्ट आहे. “बडोदा कोविड-19 इमर्जन्सी क्रेडिट लाइन (सीईसीएल)” या अतिरिक्त रोखता सुविधेमुळे ग्राहकांना सध्याच्या आर्थिक पेचावर सुरळितपणे मात करण्यासाठी मदत होईल, असे वाटते.”

बँक ऑफ बडोदा मालमत्तांच्या मार्केट लिक्विडिटीमधल्या तफावतीचे मापन करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे आणि व्यवसायांना लाएबिलिटीजसाठी रोखता उपलब्ध करून मदत करत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सर्व धर्मीय ख्रिसमस स्नेह मेळावा संपन्न

पुणे; पुण्यातील येरवडा – शास्त्रीनगर भागातील सेक्रेड हार्ट चर्च येथे...

पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी जास्तीत जास्त दर देण्याचा विचार•...

राज बब्बर,रमेश बागवे, मोहन जोशी,वसंत पुरकेंसह काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर.

मुंबई, दि. २३ डिसेंबर २०२५ राज्यातील २९ महानगरापालिकांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस...

सत्तेच्या लोभी राजकारणाला आम आदमी पार्टी शह देईल..अरविंद केजरीवाल,भगवंत मान पुण्यात प्रचाराला येणार

पुणे- ' महाराष्ट्रात प्रस्थापित राजकीय पक्षांनी विचारधारा सोडून सामान्य...