आयसीआयसीआय बँकेतर्फे भारतातील परिपूर्ण सर्वसमावेशक डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्म लाँच

Date:

·   रिटेल आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी घर किंवा कार्यालयातून डिजिटल बँकिंग सेवा, शाखेला भेट देण्याची गरज नाही

·   ग्राहकांना आता जवळपास सर्व सेवांचा डिजिटल पातळीवर लाभ घेता येणार. या सेवांमध्ये खाते उघडणे, कर्ज, पैसे भरणे, गुंतवणूक आणि संरक्षण सुविधांचा समावेश

 

 मुंबई – आयसीआयसीआय बँकेने आज आयसीआयसीआयस्टॅक या देशातील परिपूर्ण सर्वसमावेशक डिजिटल बँकिंग सेवा आणि एपीआयचे (अप्लिकेशन प्रोग्रॅम इंटरफेज) लाँच जाहीर केले आहे. रिटेल तसेच व्यावसायिक ग्राहकांसाठी ही सुविधा लाँच करण्यात आली असून याच्या लाभधारकांमध्ये रिटेलर्स, व्यापारी, फिनटेक्स, मोठ्या ई- कॉमर्स संस्था, कॉर्पोरेट्स यांचा समावेश आहे. कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे यातील बहुतेक जणांना घरी राहून काम करावे लागत असल्यामुळे ही सेवा त्यांच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. यातील बहुतेक सेवा क्षेत्रात पहिल्यांदाच लाँच करण्यात आल्या असून त्या बँकेच्या मोबाइल फोन किंवा इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्मवर तत्काळ उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

 आयसीआयसीआयस्टॅकद्वारे ग्राहकांना एकाच ठिकाणी सर्व बँकिंग सेवा पुरवल्या जातात. या यादीमध्ये डिजिटल खाते सुरू करणे (तत्काळ सेवा आणि करंट खाते सुरू करणे), कर्ज उपाययोजना (तत्काळ वैयक्तिक कर्ज, तत्काळ क्रेडिट कार्ड्स, तत्काळ गृहकर्ज, तत्काळ वाहन कर्ज, तत्काळ ओव्हरड्राफ्ट सुविधा, तत्काळ व्यावसायिक कर्ज), पेमेंट सेवा (डिजिटल पेमेंट सेवा उदा. युपीआय, भारत बिल पेमेंट यंत्रणा वापरून बिले भरणे), गुंतवणूक (तत्काळ निश्चित ठेवी, पीपीएफ, एनपीएस आणि इतर गुंतवणुकींसाठी एआयवर आधारित रोबो- अडव्हायजरी), विमा (टर्म आणि आरोग्य विमा डिजिटल पातळीवर) आणि काळजी सेवा (जीवन, आरोग्य, वाहन आणि घरासाठी संरक्षण)

 

त्याबरोबरच आयसीआयसीआयस्टॅकतर्फे तत्काळी निश्चित ठेवी किंवा तत्काळ पीपीएफसह तत्काळ बचत खाते सुरू करणारी अशाप्रकारची पहिलीच डिजिटल सेवा देण्यात येत आहे.

    या उपक्रमाविषयी आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी अधिकारी श्री. अनुप बागची म्हणाले, ‘ग्राहकांना एकाच व्यासपीठाद्वारे सर्व प्रकारच्या डिजिटल बँकिंग सेवा देण्यासाठी आम्ही आयसीआयसीआयस्टॅकवर गेली काही वर्ष काम करत आहोत. डिजिटल सेवा उभारणी तसेच डिजिटल भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना आयसीआयसीआयस्टॅकच्या रुपातून यश मिळालेले आहे. गेल्या काही आठवड्यांत कोरोना विषाणूने घातलेल्या थैमानानंतर आम्ही काही नव्या सेवांची भर घालत ग्राहकांना सर्व प्रकारच्या सेवा देऊ केल्या आहेत, ज्यामुळे त्यांची बँकेची काम कुठेच अडणार नाहीत.

 माझ्या मते आयसीआयसीआयस्टॅक ही भारतात एखाद्या बँकेतर्फे उपलब्ध करण्यात आलेली आणि कोट्यवधी रिटेल ग्राहक तसेच रिटेलर्स, व्यापारी, फिनटेक्स, मोठ्या ई- कॉमर्स संस्था, कॉर्पोरेट्स यांना विनाअडथळा, कोणत्याही ठिकाणाहून आणि बँकेची शाखा किंवा कार्यालयाला भेट न देता बँकिंग सेवा देणारी पहिली परिपूर्ण सर्वसमावेशक डिजिटल सेवा आहे. पेमेंट फिनटेक्सबरोबर नुकत्याच करण्यात आलेल्या भागिदारीमुळे विविध प्रकारच्या सेवा, एपीआय आणि मोठ्या संख्येने भार हाताळण्याची क्षमता आयसीआयसीआयस्टॅकमधे असल्यामुळे अल्पावधीत याचे एकत्रीकरण करणे शक्य झाले. आमच्या मते सध्याच्या स्थितीत, आयसीआयसीआयस्टॅक ग्राहकांना त्यांच्या कोणत्याही बँकिंग गरजेशी संबंधित सेवा देण्यासाठी सक्षम आहे.

 आयसीआयसीआयस्टॅकमध्ये उपलब्ध असलेल्या काही प्रमुख सेवा पुढीलप्रमाणे –

 ·         अकाउंट्स स्टॅक – निश्चित ठेवी, पीपीएफसह तत्काळ डिजिटल बचत सेवा, तत्काळ उपलब्ध पगार खाते, करंट अकाउंट, प्रवासी कार्ड, बिल भरण्यासाठीची सुविधा, ईआरपी सॉफ्टवेयरसह कनेक्टेड बँकिंगसारखे एपीआय, खाते व्यवस्थापन आणि भागिदारांचे डिजिटल ऑनबोर्डिंग

·         पेमेंट स्टॅक – याद्वारे युपीआय, क्यूआर स्कॅन अँड पे, मर्चंट सेटलमेंट, ग्राहकासाठी कॅशबॅक, व्यवहाराचे पैसे परत करणे, ईझीपे मर्चंट अप आणि व्यापाऱ्यांचे डिजिटल ऑनबोर्डिंग यांसारख्या डिजिटल पेमेंट आणि पेआउट सेवा दिल्या जातात.

·         लोन स्टॅक – यामध्ये तत्काळ उपलब्ध होणारे वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, क्रेडिट कार्ड, गृहकर्ज मंजुरी, गृहकर्जात वाढ, चारचाकी वाहन कर्ज, डिजिटल स्मॉल टिकिट क्रेडिट – पेलेटर यांचा समावेश होतो. एपीआयमध्ये ई- नाचवर आधारित मँडेट, तत्काळ कर्ज आरक्षण, चारचाकी वाहन कर्ज किंवै शैक्षणिक कर्जाचे भागिदार खात्यांना वाटप, ग्राहक खात्याला वाटप यांचा समावेश होतो.

·         इन्व्हेस्टमेंट स्टॅक – यामध्ये एफडी, आरडी, एसआयपी, पीपीएफ, एनपीएस आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी एआयवर आधारित रोबो- अडव्हायजरी, गुंतवणुकीची प्रत्यक्ष वेळेतील अद्यावत माहिती आणि चॅनेल सर्व्हिसिंग यांसारख्या तत्काळ सेवांचा समावेश होतो. त्याशिवाय जीवन विमा किंवा क्रेडिट कार्ड किंवा मासिक उत्पन्न योजना किंवा एसआयपीसह गुंतवणूक यांसारख्या मूल्यवर्धित उत्पादनांचा त्यात समावेश होतो.

·         केयर स्टॅक – यामध्ये जीवन, आरोग्य, वाहन आणि घरासाठीच्या संरक्षण सेवांचा समावेश होतो.

 आयसीआयसीस्टॅकच्या मदतीने ग्राहकांना घर किंवा कुठेही असताना या सेवांचा लाभ घेता येऊ शकतो व त्यासाठी बँकेच्या शाखेला भेट द्यावी लागत नाही. यामुळे रिटेल ग्राहकांना अतिरिक्त सोयीस्करपणा मिळतो, तर व्यावसायिक ग्राहकांना सध्याच्या सोशल डिस्टन्सिंगच्या काळात कार्यालयापासून दूर असतानाही आपली उत्पादनक्षमता सुधारता येते.

 आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक नसलेल्या रिटेल ग्राहकांनाही बँकेत बचत खाते सुरू करून या सेवांचा लाभ घेता येईल. एखादा व्यावसायिक जर बँकेचा ग्राहक नसेल, तर व्यवसायांसाठी खास तयार करण्यात आलेल्या इन्स्टाबिझ हे बँकेचे मोबाइल अप्लिकेशन डाउनलोड करता येईल आणि आयसीआयसीआयस्टॅक वापरता येईल. त्याशिवाय ग्राहकांना तत्काळ करंट अकाउंटसाठी अर्ज करता येईल आणि आपला खातेक्रमांक सोयीनुसार बदलता येईल, जो लगेचच दाखवला जाईल. त्याशिवाय व्यावसायिकांना बल्क कलेक्शन आणि वेगवेगळ्या डिजिटल माध्यमांतून फंडचे पैसे भरणे, ऑटोमॅटिक बँक रिकन्सिलिएशन करणे सोपे जावे यासाठी अक्सेस दिला जाईल. त्याचबरोबर आवक आणि जावक पैसे स्थलांतरासारख्या आयात- निर्यात व्यवहार डिजिटल पातळीवर करता येतात.  

 आयसीआयसीआय बँकेबद्दल आयसीआयसीआय  बँक लि. (बीएसई – ICICIBANK, एनएसई – ICICIBANK आणि एनवायएसई – IBN) ही भारतातील आघाडीची खासगी क्षेत्रातील बँक आहे. बँकेची एकत्रित मालमत्ता 31 डिसेंबर 2019 रोजी 13,04,911 कोटी रुपये होती. आयसीआयसीआय बँकेच्या उपकंपन्यांमध्ये भारतातील आघाडीच्या खासगी क्षेत्रातील विमा, मालमत्ता व्यवस्थापन, सिक्युरीटीज ब्रोकरेज कंपन्या आणि देशातील सर्वात मोठ्या खासगी इक्विटी कंपन्यांचा समावेश होतो. बँक सध्या भारतासह 15 देशांत कार्यरत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्राजक्ता पटवर्धन यांना भाऊसाहेब स्मृती पाटणकर स्मृती पुरस्कार

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे रविवारी गौरव पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे मराठीतील आद्य...

अडचणींना सामोरे जात फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घ्या : गजाला शेख

गजाला शेख लिखित ‘द फिनिक्स पाथ’ पुस्तकाचे प्रकाशन पुणे :...

शशिकांत सुतारांच्या पुत्राने ठाकरेंना दिला मोठा हादरा, संजय भोसलेंसह भाजपात केला प्रवेश

मुरलीधर मोहोळ,गणेश बिडकर,श्रीनाथ भिमाले यांची विरोधकांची बलस्थाने काबीज करणारी...

प्रशांत जगताप स्वार्थी: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुभाष जगताप म्हणाले…

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार , प्रशांत जगताप यांनी...