Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

जनरेटरमध्ये जागतिक दर्जाच्या पर्किन्स इंजिनाचा वापर

Date:

महिंद्रा पॉवरॉल या 19 अब्ज डॉलर उलाढालीच्या महिंद्रा समूहाच्या बिझनेस युनिटने पर्किन्स® 2000 सीरिज इंजिनाचे बळ असलेले 400/500/625 kVA डीजी दाखल करून आपल्या उच्च kVA क्षमतेच्या डिझेल जनरेटर्समध्ये (डीजी) विस्तार केल्याचे आज जाहीर केले आहे. चेन्नईतील महिंद्रा रिसर्च व्हॅलीतील संशोधन व विकास केंद्रामध्ये डिझाइन केलेल्या आणि पुण्यानजिकच्या चाकण येथील प्रकल्पात उत्पादन केलेल्या या 12.5 लिटर ते 18 लिटर पर्किन्स इंजिन असलेल्या नव्या जनरेटरचा समावेश महिंद्रा पॉवरॉलच्या उच्च kVA क्षमतेच्या मालिकेत करण्यात आला आहे.

पर्किन्स® 2000 सीरिज इलेक्ट्रॉनिक इंजिन त्यांच्या जागतिक दर्जाच्या गुणवत्तेसाठी व कार्यक्षमतेसाठी नावाजली जातात. ते टर्बोचार्ज्ड आहेत व एअर-टू-एअर कूल्ड आहेत, तसेच युरो स्टेज IIIA/U.S पर्यंतची प्रमाणपत्रे, ईपीए टिअर 3 व भारतातील CPCB-II उत्सर्जन मापदंड प्राप्त असलेले आहेत. अवजड औद्योगिक पायावर आधारित असलेले हे इंजिन उत्तम कामगिरी करणारे व विश्वासार्ह आहेत. 400-625 kVA प्रमाणातील प्राइम व स्टँडबाय ऊर्जा डीजी अपेक्षित असलेल्या ग्राहकांसाठी हे इंजिन आदर्श आहे.

या निमित्त बोलताना, हेमंत सिक्का, अध्यक्ष – सीपओ, पॉवरॉल व स्पेअर्स बिझनेस, महिंद्रा अँड महिंद्रा, म्हणाले, “उच्च kVA क्षमतेची आमची उत्पादने सक्षम करण्याचे पॉवरॉलचे उद्दिष्ट आहे. आज दाखल केलेल्या 400/500/625 kVA जेनसेटमुळे आमच्याकडे आता 5kVA ते 625kVA क्षमतेचे उत्तम दर्जाचे जेनसेट आहेत. यामुळे आम्हाला नव्या श्रेणीमध्ये प्रगती करण्यासाठी व आमच्या ग्राहकांना जागतिक दर्जाचे जेनसेट देण्यासाठी सुवर्ण संधी निर्माण झाली आहे”.

स्मार्ट सर्व्हिस देणारे स्मार्ट डीजी

नव्या डीजी सेटमध्ये महिंद्राच्या विशेष डिजि-सेन्स तंत्रज्ञानाचा वापर केला असून त्यामुळे हे डीजी स्मार्ट डीजी ठरले आहेत. स्मार्ट डीजीच्या कामगिरीची तपासणी केव्हाही व दुरूनही करता येते व त्यामुळे डीजी सेटचा अपटाइमही सुधारतो.

प्रामुख्याने या सेवा-केंद्रित उद्योगामध्ये, डीजी सेटची खरेदी करण्याचा निर्णय सर्व्हिस नेटवर्क व आफ्टर सेल्स सर्व्हिस यावर अवलंबून असतो. महिंद्रा पॉवरॉल डीजी सेट्सना देशभरातील 200 हून अधिक डीलर व अंदाजे 400 टच पॉइंट्स यांच्या विस्तृत सेवा जाळ्याचे पाठबळ आहे.

ग्राहकांना तातडीने मदत उपलब्ध करण्यासाठी सेंट्रलाइज्ड कॉल सेंटर 24×7 सदैव तत्पर असते व सुसज्ज आहे. ग्राहकांना शक्य तितक्या चांगल्या प्रकारे मदत करण्यासाठी सर्वात योग्य व साजेसा पर्याय निवडण्यासाठी तज्ज्ञांची टीम मदत करू शकते.

महिंद्रा पॉवरोलविषयी :

कंपनीने 2001-02 मध्ये वीजनिर्मिती क्षेत्रात प्रवेश केला. आर्थिक वर्ष 2002 पासून, व्यवसाय प्रचंड वाढीस लागला आणि आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये 1,400 कोटी रुपये झाला. आज, महिंद्रा पॉवरोलमधील इंजिन 5 kVA ते 625 kVA अशा डिझेल जनरेटिंग सेटने ऊर्जा देत आहेत.

स्थापना झाल्यापासून, महिंद्रा पॉवरोलने अल्प काळातच भारतीय जेनसेट क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. महिंद्रा पॉवरोल डीजी सेटना भारतातील व जगभरातील दूरसंचार कंपन्यांची प्रथम पसंती आहे. या ब्रँडने गेली सलग 11 वर्षे भारतीय दूरसंचार उद्योगात प्रभुत्व गाजवले आहे.

महिंद्रा पॉवरोलने अलीकडेच, 2014 मधील प्रतिष्ठित डेमिंग प्राइज मिळवले. डेमिंग प्राइझ हा युनियन ऑफ जापनीज सायण्टिस्ट अँड इंजिनीअर्सने (जेयूएसई) सुरू केलेला गुणवत्तेसाठीचा जागतिक पुरस्कार असून त्यामार्फत, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट (टीक्यूएम) यशस्वीपणे राबवलेल्या उद्योगांना गौरवले जाते.

महिंद्रा पॉवरोलने विविध पुरस्कार जिंकले आहेत, जसे की, फ्रॉस्ट अँड सलिव्हन “व्हॉइस ऑफ कस्टमर” पुरस्कार, मास्टर ब्रँड, पॉवर ब्रँड. या ब्रँडला सुपर ब्रँड म्हणून गौरवण्यात आले आहे.

दूरसंचारव्यतिरिक्त, महिंद्रा पॉवरोल डीजी सेट विविध क्षेत्रांतील उद्योगांना, तसेच बँका, इमारती व बांधकाम, सरकारी क्षेत्रातील युनिट, रुग्णालये, हॉटेले, घरे, भारतातील व जगभरातील उत्पादन युनिट अशा क्षेत्रांतील ग्राहकांना ऊर्जा देत आहे.

महिंद्राविषयी

19 अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या या कंपन्यांच्या समूहाचा नेहमीच प्रयत्न असतो की, ग्रामीण भागात भरभराट झाली पाहिजे, शहरातील जीवनशैली सुधारली पाहिजे आणि व्यवसायाची कार्यक्षमता वाढली पाहिजे. त्यामुळे लोकांना चालना मिळून त्यांचा विकास होईल. समूह भारतात युटिलिटी व्हेइकल्स, माहिती तंत्रज्ञान, वित्तीय सेवा व व्हेकेशन ओनरशिप यामध्ये आघाडीच्या स्थानी आहे व व्हॉल्युमच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपनी आहे. कृषिव्यवसाय, एअरोस्पेस, कम्पोनंट्स, सल्ला सेवा, संरक्षण, ऊर्जा, औद्योगिक उपकरणे, लॉजिस्टिक्स, रिअल इस्टेट, स्टील, रिटेल, व्यावसायिक वाहने व दुचाकी व्यवसायांतही अग्रेसर आहे. मुंबईत मुख्यालय असलेल्या महिंद्रामध्ये 100 देशांत अंदाजे 240,000 कर्मचारी आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...