टाटा पॉवर रूफटॉप सोलर सोल्युशन्स आता ७० शहरांमध्ये उपलब्ध

Date:

  • रूफटॉप सोलर दरवर्षी ५०,००० रुपये वाचवण्यात मदत करते
  • २५ वर्षांत १२,५०,००० रुपयांची बचत होऊ शकते~

मुंबईअपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रातील आपली आघाडी कायम राखण्याच्या धोरणात्मक नियोजनाचा एक भाग म्हणून टाटा पॉवरने आपल्या रूफटॉप सोलर सेवांचा विस्तार देशातील ७० शहरांमध्ये केला आहे. टाटा पॉवर सोलर ही टाटा पॉवरच्या पूर्णपणे मालकीची उपकंपनी असून, रूफटॉप विभागात गेल्या सहा वर्षांपासून बाजारपेठेमध्ये आघाडीच्या स्थानी आहे.

देशातील निवासी विभागाच्या बाजारपेठेत रूफटॉप सोलर सोल्युशन्स (आरटीएस) हा ऊर्जेचा खात्रीशीर व किफायतशीर स्रोत म्हणून वेगाने उदयाला येत आहे. पर्यावरण तसेच किफायतशीर या दोन्ही बाजूंनी विचार करता टाटा पॉवर सोलरची आरटीएस सोल्युशन्स हा देशभरातील ऊर्जा ग्राहकांसाठी एक खात्रीशीर दीर्घकालीन स्रोत आहे. टाटा पॉवर सोलर हा भारतातील आघाडीची एकात्मिक सौरऊर्जा कंपनी आहे. सेल/मॉड्युल्स व सौरऊर्जा उत्पादनांच्या निर्मितीपासून ते रूफटॉप आणि उपयुक्त सौरऊर्जा प्रकल्पांच्या कार्यान्वयनापर्यंत सौरऊर्जा मूल्यसाखळीत कंपनीने उत्तम कामगिरी केली आहे.

टाटा पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रवीर सिन्हा म्हणाले, दीर्घकाळात स्वत:चा खर्च स्वत: भागवण्याची अंगभूत क्षमता अंगी असलेल्या शाश्वत ऊर्जास्रोताच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी रूफटॉप सोलर हा एक आदर्श पर्याय आहे. आपल्या युटिलिटीजकडून केवळ विजेहून अधिक कशाचीतरी अपेक्षा ठेवणाऱ्या नवीन युगातील ग्राहकांसाठी आरटीएस विकसित करण्यात आले आहे. मायक्रोग्रिडसारख्या नवीन वितरण प्रणालीशी जोडले असता सोलर रूफटॉप देशाच्या ग्रामीण व शहरी दोन्ही भागांतील वीज उपलब्धता सुधारण्यात सोलर रूफटॉप मोठी भूमिका बजावू शकेल.”

टाटा पॉवर सोलरने आत्तापर्यंत ३१५ मेगावॅटहून अधिक क्षमतेचे रूफटॉप प्रकल्प स्थापित केले आहेत. गुजरात, महाराष्ट्र व तमीळनाडूसारख्या सर्वाधिक औद्योगिकीकृत राज्यांमध्ये हे प्रकल्प स्थापित करण्यात आले आहेत. हा कार्यक्रम मुंबई, पुणे, नाशिक, सुरत, बडोदा, दिल्ली, गुडगाव, आग्रा, लखनौ, चंडीगढ, वाराणसी, गुवाहाटी, कोलकाता, धनबाद, पुरी, विशाखापट्टणम, वेल्लोर, म्हैसूर, कोइंबतूर आणि चेन्नई यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये कार्यान्वित करण्यात आला आहे.

टाटा पॉवर सोलर ही कंपनी २९ वर्षांहून अधिक काळापासून भारतातील रूफटॉप विभागातील आद्य कंपनी राहिली आहे. त्यामुळे ही कंपनी देशातील सर्वाधिक विश्वासार्ह व अवलंबून राहण्याजोगी रुफटॉप सोल्युशन पुरवठादार समजली जाते. कंपनीने गेल्या २० वर्षांहून अधिक काळात १.४ गिगावॅट्सहून (जीडब्ल्यू) अधिक क्षमतेची प्रारूपे जगभर निर्यात करून जागतिक स्तरावर अस्तित्व निर्माण केले आहे. टाटा पॉवर सोलरच्या प्रारूप उत्पादनाची इनहाउस उत्पादन क्षमता ४०० मेगावॅट्स (एमडब्ल्यू) इतकी आहे, तर सेल उत्पादन क्षमता ३०० मेगावॅट आहे. कंपनी १२५ मिमी आणि १५६ मिमी आकारमानाच्या मोनो आणि मल्टिक्रिस्टलाइन चकत्या (वेफर्स) निर्माण करू शकते. हे एकात्मिक सेल्स आणि मोड्युल उत्पादन प्रकल्प आयएसओ ९००१:२००८ व आयएसओ १४००१:२००४ प्रमाणित आहेत.

टाटा पॉवर सोलरने देशातील १३ राज्यांमध्ये युटिलिटी स्केल प्रकल्प उभारले असून, या सर्वांची एकत्रित क्षमता २.७६ गिगावॅट्सची आहे. २०१७ मध्ये कंपनीने कोची आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कारपोर्टवर २.६ मेगावॅट (एमडब्‍ल्‍यू) क्षमतेचा सोलर रूफटॉप प्लाण्ट स्थापित केला. हे भारतातील सर्वांत मोठे सौरऊर्जेवर चालणारे कारपोर्ट आहे.  

टाटा पॉवर सोलरने कार्यान्वित केलेल्या अन्य मोठ्या प्रमाणावरील प्रकल्पांमध्ये आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथील ५०० एकर जागेवरील १०० मेगावॅटचा प्रकल्प आणि ओडिशातील लापांगा येथील ३० मेगावॅटपीक (एमडब्ल्यूपी) शक्तीचा सौरऊर्जा प्रकल्प यांचा समावेश होतो. हा भारतातील सर्वांत मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पांपैकी एक आहे. हा प्रकल्प राखेच्या खंदकावर उभारलेला आहे. याचा ६० टक्के भाग (१९ मेगावॅटपीक) अॅश डाइक क्षेत्रात, तर ४० टक्के (११ मेगावॅटपीक) भाग सामान्य जमिनीवर आहे. याशिवाय टाटा पॉवर सोलरने कर्नाटकातील पावागडा सोलर पार्कमध्ये ४०० मेगावॅट क्षमतेची इन्स्टॉलेशन्स यशस्वीरित्या केली आहेत. धोलेरा सोलर पार्कमध्ये उभारल्या जाणाऱ्या १००० मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी कंपनीने लिलाव जिंकला आहे.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...