Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

उद्योगक्षेत्रातील पहिला कमॉडिटी डेरिव्हेटिव्जमध्ये गुंतवणूक करणारा म्युच्युअल फंड

Date:

टाटा म्युच्युअल फंडचा नवीन टाटा मल्टी ऍसेट अपॉर्च्युनिटीज फंड

ठळक वैशिष्ट्ये:

  • इक्विटीएक्सचेंज ट्रेडेड कमॉडिटी डेरिव्हेटिव्ज आणि कर्ज साधनांमध्ये गुंतवणूक करणारी ओपन-एंडेड योजना
  • पोर्टफोलिओची जोखीम कमी करण्यासाठी आणि अधिक चांगले जोखीम समायोजित लाभ मिळवून देण्यासाठी सर्व इक्विटीकमॉडिटीजस्थिर उत्पन्न अशा सर्व विभागांमध्ये वैविध्यपूर्ण गुंतवणूक केली  आणि परस्पर संबंध कमी राखले जाणार
  • कमॉडिटी ईटीसीडीज्मध्ये वाव देऊ करणारा पहिला म्युच्युअल फंड.  इक्विटी आर्बिट्रेज कडून बचावाच्या तरतुदीसह इक्विटीमध्ये मोठ्या प्रमाणावर महत्त्वाकांक्षी गुंतवणूक
  • हे संपत्ती वाटप डायनॅमिक (वेगाने बदलत राहणारे) नाही.  संपत्ती वाटप सर्वसामान्यपणे स्थिर पद्धतीचे असल्यामुळे एखाद्या संपत्ती वर्गात अचानक लाभ मिळाल्यास गुंतवणूकदारांना त्याचा फायदा नक्कीच मिळतो.  गुंतवणूकदाराला करांमुळे कोणतेही परिणाम सहन करावे न लागता पुनःसंतुलन हे याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे
  • नवीन फंड ऑफर १४ फेब्रुवारी २०२० रोजी खुले होत असून २८ फेब्रुवारी २०२० रोजी बंद होईल

 मुंबई:  टाटा म्युच्युअल फंडने टाटा मल्टी ऍसेट अपॉर्च्युनिटीज फंड‘ बाजारपेठेत दाखल केला आहे. एक्स्चेंज ट्रेडेड कमॉडिटी डेरिव्हेटिव्जमध्ये गुंतवणूक करणारा म्युच्युअल फंड उद्योगक्षेत्रातील हा पहिला फंड आहे.  कमॉडिटी डेरिव्हेटिव्जमध्ये विस्तार करण्यासाठी सेबीकडून मंजुरी मिळाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले असून त्यामुळे भारतातील म्युच्युअल फंड उद्योगक्षेत्रातील ट्रेन्डसेटर अशी टाटा ऍसेट मॅनेजमेंटची ओळख निर्माण होईल.

 हा फंड प्रामुख्याने इक्विटीकमॉडिटी डेरिव्हेटिव्ज आणि कर्ज या तीन संपत्ती वर्गांमध्ये गुंतवणूक करेल.  यापैकी प्रत्येक संपत्ती वर्ग गुंतवणूकदारांसाठी विशेष फायद्याचा ठरेल असा आहे.  भारतात कमॉडिटी गुंतवणुकीमध्ये सर्वात जास्त भर सोन्यामधील गुंतवणुकीवर दिला जातो.  एक्स्चेंज ट्रेडेड कमॉडिटी डेरिव्हेटिव्जमुळे  (ईटीसीडी) ग्राहकांना बेस मेटल्सकृषी कमॉडिटीजऔद्योगिक रसायनेक्रूड तेल इत्यादी इतर पर्यायांचेही लाभ घेता येतील.

 सेबीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा फंड आपल्या व्यवस्थापनांतर्गत असलेल्या संपत्तीपैकी २५% गुंतवणूक ईटीसीडी मध्ये करेल ज्यामध्ये एका कमॉडिटीमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण १०% असेल.

टाटा ऍसेट मॅनेजमेंटचे सीईओ आणि एमडी श्री. प्रथित भोबे यांनी सांगितलेटाटा मल्टी ऍसेट अपॉर्च्युनिटीज फंड मुळे आमच्या सक्षम आणि सातत्याने वृद्धींगत होत असलेल्या उद्योगात नवीन उत्पादन दाखल झाले आहे.  तब्बल १० ट्रिलियन रुपयांची उलाढाल आणि अनेक संधी उपलब्ध असलेल्या उद्योगक्षेत्रात आम्ही हे छोटे पाऊल उचलत आहोत.  आम्हाला पक्की खात्री आहे की सध्याचे गुंतवणूकदार आणि वितरक भागीदार यांना ही नवी ऑफर नक्की आवडेल तसेच अनेक नवीन गुंतवणूकदार देखील याकडे आकर्षित होतील.  आमच्या एआय / एमएल पॉवर्ड क्वान्ट फंड नंतर चालू आर्थिक वर्षासाठी आखली गेलेली ही आमची दुसरी अभिनव योजना आहे.  इक्विटीडेट आणि कमॉडिटी डेरिव्हेटिव्ज यांचा समावेश असलेल्या आमचा मल्टी ऍसेट फंड हा अशाप्रकारचा या उद्योगक्षेत्रातील पहिला फंड असून दीर्घकालीन संपत्ती निर्माणासाठी अनेक गुंतवणूकदार या नवीन संपत्ती वर्गासाठी उत्सुक होतील.”

 टाटा ऍसेट मॅनेजमेंटचे सीआयओ – इक्विटीजश्री. राहुल सिंग यांनी सांगितले, “वेगवेगळ्या संपत्ती वर्गांमध्ये नकारात्मक सह संबंध असल्यामुळे एकाच वेळी सर्व गुंतवणूक अपयशी ठरण्याचा धोका टळतो आणि पोर्टफोलिओला स्थिरता मिळते.  इक्विटीकमॉडिटीजस्थिर उत्पन्न यामध्ये वैविध्य आणि कमी परस्पर संबंध तसेच कमॉडिटी आर्बिट्रेजमधील लाभ यामुळे अस्थिरतेची जोखीम कमी होते आणि लाभांमध्ये सातत्य राहते.  या फंडमध्ये संपत्ती वाटप हे सर्वसामान्यतः स्थिर स्वरूपाचे असल्यामुळे एखाद्या संपत्ती वर्गात अचानक लाभ मिळू लागल्यास गुंतवणूकदारांना त्याचा फायदा नक्कीच मिळतो.  इक्विटी आर्बिट्रेजकडून सुरक्षेच्या तरतुदीसह इक्विटीमध्ये पुरेसा वाव या फंडला मिळेल.  गुंतवणूकदारांना अधिक चांगले निव्वळ लाभ मिळावेत यासाठी इक्विटी टॅक्सेशन सुनिश्चित केले जाईल.”  

 टाटा ऍसेट मॅनेजमेंटचे कमॉडिटीज स्ट्रॅटेजी – हेडऑरोबिंदा प्रसाद गयन यांनी सांगितलेआर्बिट्रेज आणि निवडक निर्देशात्मक धोरणांमार्फत कमॉडिटीजमध्ये बाजारपेठेतील सर्व टप्प्यांमध्ये लाभ निर्माण करून देण्याची क्षमता असते.  जोखीम सांभाळून लाभ मिळवून देणे हा कमॉडिटीज आर्बिट्रेजचा उद्देश आहे.  पैशाचा कमी पुरवठा आणि कमॉडिटीजसाठी जास्त मागणी यामुळे कमॉडिटीजमध्ये जास्त विस्तार आणि वैविध्य आणता येते.  कमॉडिटी फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट किमती स्पॉट किमतींवरून संकेत घेतात.”

 नवीन फंड ऑफरसाठी किमान अर्ज रक्कम ५००० रुपये असून ती पुढे १ रुपयांच्या पटीत वाढवता येईल.

 या फंडचे व्यवस्थापन अधिकारी व त्यांचे क्रमशः संपत्ती वर्ग पुढीलप्रमाणे आहेत – श्री. राहुल सिंग – चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर – इक्विटीजश्री. मूर्ती नागराजनहेड – फिक्स्ड इन्कमऑरोबिंदा प्रसाद गायनहेड – कमॉडिटीज स्ट्रॅटेजीआणि श्री. शैलेश जैनफंड मॅनेजर – टाटा ऍसेट मॅनेजमेंट

 टाटा ऍसेट मॅनेजमेंट

१९९४ साली स्थापन करण्यात आलेली टाटा ऍसेट मॅनेजमेंट लिमिटेड ही टाटा म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट मॅनेजर कंपनी आहे.  भारतातील सर्वात जुन्या व सर्वाधिक विश्वसनीय फंड कंपन्यांपैकी एक असलेल्या टाटा ऍसेट मॅनेजमेंटच्या गुंतवणूकदारांची संख्या २० लाखांपेक्षा जास्त आहे (३१ जानेवारी २०२० च्या आकडेवारीनुसार).  लहानपणापासून ते निवृत्तीपर्यंत सर्वसामान्य व्यक्तीच्या सर्व गुंतवणुकीचे व्यवस्थापन टाटा म्युच्युअल फंडमध्ये केले जाते.  गुंतवणूकदारांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गरजांनुसारवेगवेगळ्या जोखीम सांभाळत अनेक फंड पर्याय या कंपनीकडे उपलब्ध आहेत. यामध्ये इक्विटी फंड्सहायब्रीड फंड्स आणि स्थिर उत्पन्न फंड्सचा समावेश आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिका निवडणुकीचा बिगुल सोमवार नंतर …

मुंबई- राज्यातील २९ महापालिकेत प्रशासक राज आहे. मात्र,...

पुण्याला पुस्तकाची जागतिक राजधानी करणार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे महोत्सव खऱ्या अर्थाने भारतीय विचार, संवाद आणि संस्कृतीचा...

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...