बजाज इलेक्ट्रिकल्स फाऊंडेशनच्या ‘क्लीन इंडिया’ उपक्रमांतर्गत कर्जतमध्ये सौर प्रकल्पांची उभारणी

Date:

कर्जतबजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या कॉर्पोरेट सामाजिक दायित्व उपक्रम राबविणाऱ्या बजाज इलेक्ट्रिकल्स फाऊंडेशनने आपल्या क्लीन इंडियाउपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील कर्जत येथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारले आहेत. अभिनव मंदिर (१० केडब्ल्यू क्षमता) आणि शारदा मंदिर                    (८ केडब्ल्यू क्षमता) या दोन शाळांच्या छतांवर सोलर पीव्ही पॅनेल्स उभारणीचे काम बजाज इलेक्ट्रिकल्स फाऊंडेशन आणि सेवा सहयोग फाऊंडेशन यांच्या भागीदारीतून ८ फेब्रुवारी २०२० रोजी सुरु करण्यात आले. या दोन्ही शाळांमधील ५९२९ विद्यार्थी आणि १३५ शिक्षकांना या प्रकल्पांचे लाभ मिळणार आहेत. हे सर्व विद्यार्थी अल्प ते मध्यम उत्पन्न गटातील कुटुंबातील असल्यामुळे शाळा ट्रस्टतर्फे त्यांना फीमध्ये मोठ्या प्रमाणावर सबसिडी दिली जाते, त्यामुळे हे विद्यार्थी मूलभूत शिक्षण व इतर सुविधांचा लाभ घेऊ शकत आहेत. विद्यार्थ्यांच्या एकंदरीत विकासात हे खूप मोठे योगदान ठरत आहे.

 ईशान्य, वायव्य आणि मध्य भारतातील सर्व हितधारकांमध्ये सकारात्मक प्रभाव निर्माण करणे आणि शाश्वत ऊर्जेच्या वापरावर भर देण्याच्या उद्देशाने बजाज इलेक्ट्रिकल्सने अशा दुर्गम ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्पांची यशस्वी उभारणी केली आहे.  या सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे स्थानिक लोकांना आता रॉकेलच्या दिव्यांवर अवलंबून राहावे लागत नाही, प्रदूषण टळते.  त्याचबरोबरीने रोजगार निर्मितीला चालना मिळून स्थानिकांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यातही बजाज इलेक्ट्रिकल्स फाऊंडेशनचे हे सौर ऊर्जा प्रकल्प अप्रत्यक्षरीत्या योगदान देत आहेत.

 बजाज इलेक्ट्रिकल्सचे कार्यकारी संचालक श्री. अनुज पोद्दार यांनी यावेळी सांगितले, देशाच्या विकासाचे दोन प्रमुख आधारस्तंभ – शिक्षण आणि शाश्वत ऊर्जा यांना एकत्रित करत अतिशय विचारपूर्वक आखणी करण्यात आलेल्या या उपक्रमात सहभागी होताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.   शिक्षण हा व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे आणि तो मिळालाच पाहिजे.  सर्व अडीअडचणी दूर करून गुणी युवा पिढीला आपली स्वप्ने पूर्ण करण्याच्या आणि आपल्या देशाचे उज्वल भवितव्य घडवण्याच्या संधी उपलब्ध करवून देण्यासाठी बजाज इलेक्ट्रिकल्समध्ये आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो.  या विद्यार्थ्यांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून सक्षम आणि शाश्वत ऊर्जेबाबत जागरूक बनवल्याबद्दल मी बजाज फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.”  

 या दोन सोलर युनिट्समधून दरवर्षी एकूण २६,००० युनिट्स वीजनिर्मिती केली जाईल.  यामुळे या शाळांच्या इतर वीज वापरात जवळपास ६०% घट होईल.  तसेच दरवर्षी कार्बन उत्सर्जन २३ टनांनी कमी होईल.  या शाळा नेट मीटरिंग वापरतील, त्यामुळे या सोलर युनिट्समधून अतिरिक्त वीजनिर्मिती झाल्यास ती ग्रीडला दिली जाईल, ज्यामुळे त्यांच्या वीजबिलात अजून जास्त बचत होईल.  अशाप्रकारे या प्रकल्पाचा पेबॅक कालावधी जवळपास ३-४ वर्षे आहे.

 उदघाटन समारंभानंतर श्री. पोद्दार यांनी बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या सोलर आणि सीएसआर टीमच्या सदस्यांसोबत मिळून उपस्थित विद्यार्थ्यांना शुद्ध, सौर ऊर्जा वापराच्या लाभांबद्दल माहिती दिली तसेच शाळांच्या परिसरात नव्याने बसवण्यात आलेल्या प्रकल्पांचेही महत्त्व समजावून सांगितले. आपल्या सर्व हितधारकांसाठी “अधिक जास्त हरित आणि निरोगी भारत” निर्माण करण्याचे उद्धिष्ट डोळ्यासमोर ठेऊन या टीमने शाळांच्या परिसरात एका आरोग्य शिबिराचे तसेच वृक्षारोपण कार्यक्रमांचेही आयोजन केले होते.

 बजाज इलेक्ट्रिकल्स फाऊंडेशन (बीईएफ):

बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या कॉर्पोरेट सामाजिक दायित्व उपक्रमांची अंमलबजावणी करणाऱ्या बजाज इलेक्ट्रिकल्स फाऊंडेशनची (बीईएफ) स्थापना २% सीएसआर कायद्यानुसार आमच्या सामाजिक योगदानाच्या वाढ करणे आणि विशिष्ट भागांमध्ये आमच्या प्रकल्पांना पाठिंबा देणे या उद्देशाने करण्यात आली.  पर्यावरणाचे संवर्धन, स्त्री-पुरुष सर्वांचा विकासात समावेश, कर्मचाऱ्यांचा सामाजिक प्रकल्पांमध्ये सहभाग आणि समाजातील जास्तीत जास्त स्तरांपर्यंत पोहोचणे या चार उद्देशांना अनुसरून बजाज इलेक्ट्रिकल्स फाऊंडेशनच्या सीएसआर उपक्रमांची आखणी आणि अंमलबजावणी केली जाते.  आमच्या सामाजिक उपक्रमांमध्ये पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन, शिक्षण, रोजगार, व्यावसायिक कौशल्य निर्माण, आरोग्य, कला व संस्कृतीची जोपासना यावर भर दिला जातो.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विकास, सेवा, सुशासनला मतदारांचा कौल – भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजयभाजपावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मतदारांचे...

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...