मसई स्कूलने महिला व वर्किंग प्रोफेशनलसाठी दाखल केले ऑनलाइन कोडिंग प्रोग्रॅम

Date:

  • करिअरची दुसरी इनिंग सुरू करण्याची इच्छा असणाऱ्या महिलांसाठी प्रामुख्याने प्रोग्रॅमची निर्मिती
  • प्रामुख्याने बॅकेंड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटवर भर

बेंगळुरू, मसई स्कूल या भारतातील पहिल्या मिलिटरी शैलीच्या कोडिंग स्कूलने प्रामुख्याने महिलांना त्यांच्या करिअरची दुसरी इनिंग सुरू करण्यास मदत करण्याच्या दृष्टीने पहिल्या ऑनलाइन कोडिंग प्रोग्रॅमची घोषणा केली आहे. संध्याकाळी घेतला जाणारा हा अर्ध वेळ कोर्स बॅकेंड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट व कॉम्प्युटर सायन्स यांचा सक्षम पाया रचण्यावर भर देणारा आहे. हा कोर्स सर्व वर्किंग प्रोफेशनलसाठी खुला आहे आणि त्यासाठी नोंदणी मसई स्कूलच्या वेबसाइटवर करता येऊ शकते.

फुल स्टॅक डेव्हलपमेंटवरील ऑन-कॅम्पस प्रोग्रॅम असणारे मसई स्कूल या वर्षी जूनमध्ये सुरू करण्यात आले. मसई स्कूलने वर्किंग प्रोफेशनलना कौशल्यांमध्ये वाढ करण्यास मदत करण्यासाठी आणि करिअरच्या प्रगतीला चालना देण्यासाठी प्रोफाइल सक्षम करण्यासाठी हा ऑनलाइन कोडिंग प्रोग्रॅम सुरू केला. कोर्समध्ये 30 आठवड्यांच्या कालावधीमध्ये 600 तासांचे कोडिंग, 30 तास सॉफ्ट स्किल व 60 तास गणिती क्षमता निर्माण करणे, यांचा समावेश आहे. याबरोबरच, कोर्समध्ये 24 गेस्ट लेक्चर्स, 2 डेमो डेज, 2 हॅकेथॉन, 10 प्रोजेक्ट, 50 आव्हाने व 5 मॉक मुलाखती यांचा समावेश आहे.

मसई स्कूलचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतीक शुक्ला यांनी सांगितले, या वर्षी आम्ही लाँच केल्यापासून देशभरातील विद्यार्थी आणि वर्किंग प्रोफेशनल यांच्याकडून उत्तम प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. त्यापैकी अनेक जण मसई स्कूलमध्ये येण्यासाठी उत्सुक होते, परंतु त्यांना नोकरी सोडण्याचा विचार करणे शक्य होत नव्हते. आम्हाला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे आम्हाला हा भाग तयार करण्यासाठी प्रेरणा मिळाली – अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी सोयीचे ठरतील असे टाइम कोर्स.” त्यांनी नमूद केले, कोडिंग ही लवकरच जगातील दुसरी भाषा बनणार आहे. तंत्रज्ञान वेगाने विकसित होत असल्याने, विशिष्ट कौशल्ये असणाऱ्या प्रोफेशनलची मागणी निर्माण होणार आहे. प्रोफेशनलनी नाकारले जाऊ नये, यासाठी कौशल्यांमध्ये वाढ करणे गरजेचे असल्याचे यातून सूचित होते. मसई स्कूलच्या बॅकेंड डेव्हलपर प्रोग्रॅमद्वारे वर्किंग प्रोफेशनलच्या करिअरची घोडदौड वाढवायची, हे आमचे उद्दिष्ट आहे.”

मसई स्कूलमधील पहिली बॅच नुकतीच पदवीधर झाली व त्यातील 90% विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाल्या. त्यातील एक विद्यार्थी म्हणजे हसन. हसन तामिनाडूतील सालेम इथला आहे. तो गरजू व वंचित कुटुंबातला नाही. त्याला दर्जेदार शिक्षण उपलब्ध नव्हते. त्याने मेकॅनिकल इंजिनीअर म्हणून पदवी घेतली असली तरी त्याचा बाहेरच्या जगाशी फारसा संबंध नव्हता. यामुळे त्याला मासिक 18,000 रुपये उत्पन्नावर स्थानिक वर्कशॉपमध्ये मेकॅनिक म्हणून नोकरी मिळाली. आज, हसनने एक अवघड तांत्रिक मुलाखत सहजरित्या पार केली आहे आणि देशातील एका झपाट्याने वाढत्या स्टार्ट-अपमध्ये तो रुजू झाला आहे. त्याच्या नव्या नोकरीमध्ये 3 महिने अप्रेंटिसशिप (त्याच्या अगोदरच्या पगारापेक्षा 4.5X पट अधिक) समाविष्ट आहे व त्यानंतर त्याला फुल स्टॅक डेव्हलपर म्हणून पूर्ण वेळ काम मिळाले व अगोदरच्या पगारापेक्षा 8X पट पगार मिळाला.

महेश हा एक आणखी प्रेरणादायी विद्यार्थी आहे. तो महाराष्ट्रातील सांगलीचा आहे. त्याने एमसीएममध्ये मास्टर्स केले आहे व त्यानंतर तो त्याचे वडील चालवत असलेल्या कौटुंबीक व्यवसायामध्ये रुजू झाला. दीड वर्षाने, त्याने त्याच्या शिक्षणाच्या अनुषंगाने नोकरी शोधण्यास सुरुवात केली. महेशने 25 हून अधिक कंपन्यांसाठी अर्ज केला. या कंपन्या वार्षिक 2.5 लाख रुपये देत होत्या. परंतु, त्याला सगळीकडे नकार मिळाला. अशा वेळी त्याने मसई स्कूलसाठी अर्ज केला. आज, त्याचा कोर्स जवळजवळ संपत आला असताना त्याला फुल स्टॅक डेव्हलपर म्हणून नोकरी मिळाली आहे. मसई स्कूलमध्ये येण्यापूर्वी त्याला कंपन्या जो पगार देऊ करत होत्या त्याच्या जवळजवळ चौपट पगार त्याला मिळाला आहे.

मसई स्कूलने जून 2019 मध्ये बेंगळुरू शहरात कार्यास सुरुवात केली. सध्या, स्कूलची शाखा पाटणा येथे आहे आणि पुढील 10-12 महिन्यांत 2000 विद्यार्थ्यांना पदवीधर करण्याचे नियोजन आहे.

मसई स्कूल:

मसई स्कूल हे मिलिटरी शैलीचे कोडिंग स्कूल आहे. आम्ही न वापरलेल्या किंवा कमी वापरलेल्या गुणवत्तेचा शोध घेतो आणि त्यांना जगातील सर्वाधिक मागणी असणाऱ्या नोकऱ्यांसाठी प्रशिक्षित करतो. मसई स्कूल उच्च शिक्षणासाठी नवीन मॉडेल सादर करत असून, त्यामध्ये विद्यार्थ्यांनी शाळेत गुंतवणूक करण्याऐवजी शाळा विद्यार्थ्यांसाठी गुंतवणूक करते. आम्ही विद्यार्थ्यांना केवळ प्रशिक्षित करत नाही, तर त्यांच्यामध्ये गुंतवणूक करतो आणि म्हणूनच विद्यार्थ्यांबरोबरच इतर प्रत्येकासाठी हे फायद्याचे ठरते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक धनकवडे उद्या करणार भाजपात प्रवेश

पुणे-केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार भीमराव तापकीर यांच्या...

पुणे, पिंपरीत भाजपचा महापौर होईल,भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील-मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे -आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील,...

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...