Mercedes Benz-त्रीपॉइंटेड स्टार्सची भारतात 25 वर्ष यशस्वीपणे पूर्ण, 25 विक्रीपश्चात उपक्रमांसह यशसाजरे

Date:

 ग्राहकांसाठी खास तयार केलेल्या विविध ग्राहकाभिमुख योजना
या उपक्रमांमध्ये कुशल मनुष्यबळासाठी तयार करण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचाही समावेश, या उपक्रमाचा फायदा संपूर्ण वाहन उद्योगाला

 

पुणे – भारतातील सर्वात मोठी लक्झरी कार उत्पादक कंपनी मर्सिडीझ- बेंझ देशातील कामकाजाची 25 वर्ष साजरी करत असून त्यानिमित्ताने कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रकारचे उपक्रम खास तयार केले आहेत.

25 वर्षपूर्तीच्या निमित्ताने मर्सिडीझ- बेंझने आठ ग्राहकाभिमुख सेवा उपक्रम आखले असून ते ग्राहकाचा गाडीखरेदीचा अनुभव आणखी उंचावतील. या उपक्रमांची माहिती पुढीलप्रमाणे –

प्रीमियर एक्सप्रेस प्राइम – आता ग्राहकांना त्यांच्या कारचे सर्व्हिसिंग होऊन ती केवळ तीन तासांत तयार होईपर्यंत निवांत आराम करत येणार आहे. तसे न झाल्यास, ही सेवा मोफत आहे असे समजा. डिसेंबर 2019 मध्ये सुरू होणार असलेली ही सेवा बेंगळुरू येथे लाँच झाल्यानंतर दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आणि हैद्राबाद अशा वेगवेगळ्या शहरांत प्रवास करणार आहे.

फास्ट लेन बॉडी आणि पेंट – ही सेवा ग्राहकांना त्यांच्या गाडीचे अपघातात झालेले किरकोळ नुकसान कामाच्या केवळ 25 तासांच दुरुस्त करून देणार आहे. सध्या ही योजना अहमदाबाद, मुंबई आणि पुणे या शहरांतच मिळणार असून डिसेंबर 2019 पासून तिची सुरुवात होईल.

मर्सिडीझ- बेंझ कार केयर किट्स – मर्सिडीझ- बेंझ ब्रँडेड कार केयर किट्स डिसेंबर 2019 या एका महिन्याभरासाठी 25 टक्के सवलतीत उपलब्ध केले जाणार आहेत. हे किट्स गेल्या काही काळात ग्राहकांमध्ये अतिशय लोकप्रिय झाले आहेत.

ऑनलाइन सर्व्हिस एस्टीमेट आणि ऑनलाइन सर्व्हिस अपॉइटमेंट आरक्षण – मर्सिडीझ- बेंझद्वारे ग्राहकांना आता सर्व्हिसच्या खर्चाचा अंदाज ऑनलाइन दिला जाणार आहे. त्याशिवाय डिसेंबर 2019 या महिन्यात जे ग्राहक पहिली ऑनलाइन अपॉइंटमेंट आरक्षित करतील त्यांना 25 टक्के सवलत दिली जाणार आहे.

मर्सिडीझ- बेंझ एएमजी तेल – केवळ काही महिन्यांपूर्वीच लाँच करण्यात आलेली मर्सिडीझ- बेंझची उच्च कामगिरी करणारी एएमजी तेल उत्पादने डिसेंबर 2019 या पूर्ण महिन्याभरात कार सर्व्हिसिंगदरम्यान 25 टक्के सवलतीत उपलब्ध केली जातील.

एएमजीसाठी मर्सिडीझ- बेंझ प्रमाणित टायर्स – एएमजी गाड्यांसाठी मर्सिडीझ प्रमाणित टायर्सची श्रेणी ग्राहकांना 15 डिसेंबर 2019 ते या महिन्याअखेरपर्यंत गाडीच्या सर्व्हिसिंगदरम्यान 25 टक्के सवलतीत उपलब्ध केल जाणार आहेत.

अनियमित सर्व्हिसिंगचा इतिहास असलेल्यांसाठीही प्रमाणित अश्युरन्स – या उपक्रमाद्वारे अनियमित सर्व्हिसिंगचा इतिहास असलेल्या ग्राहकांनाही वॉरंटी मिळवता येणार आहे.

ग्राहक सेवा वेबपेजेसचे नूतनीकरण – ऑनलाइन ग्राहकांचा प्रवास सोपा आणि सोयीस्कर व्हावा यासाठी संकेतस्थळावरील ग्राहक सेवा वेबपेजेसचे नूतनीकरण करण्यात आले आहे.

मर्सिडीझ- बेंझचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन शेवेंक म्हणाले, भारतात 25 वर्षपूर्तीबद्दल मी ग्राहकांचे आभार मानतो. ग्राहकांनी मर्सिडीझ- बेंझ या ब्रँडला दिलेला पाठिंबा, निष्ठा आणि विश्वास आमच्यासाठी मौल्यवान आहेत. ग्राहकांचे म्हणणे आम्ही कायम ऐकून घेतो आणि आमच्या मते ते सर्वोत्तम शिक्षक असतात. हे वैशिष्ट्यपूर्ण विक्रीपश्चात उपक्रम ग्राहकांच्या गरजा विशेषतः दैनंदिन आयुष्यातली त्यांची व्यग्रता लक्षात घेऊन बनवण्यात आले आहेत. हे उपक्रम थ्री- पॉइंटेड स्टारचे मालक असण्याचा अनुभव आणखी उंचावतील व मर्सिडीझ बेंझ ब्रँड व ग्राहकांचे नाते दृढ करतील. ग्राहकांना या उपक्रमांचा चांगला फायदा होईल असा आम्हाला विश्वास वाटतो.

ग्राहकाभिमुख सेवेसाठी ओळखली जाणारी मर्सिडीझ- बेंझ इंडिया ही या क्षेत्रातील मापदंड मानल्या जाणाऱ्या जेडी पॉवरच्या ग्राहक समाधान सर्वेक्षणात गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने उच्च स्थान मिळवत आहे.

आज जाहीर करण्यात आलेल्या आठ नव्या उपक्रमांखेरीज मर्सिडीझ बेंझने आणखीही काही उपक्रम आखले आहेत.

कारची देखभाल तुमच्या दरवाजापाशी – या उपक्रमाचा एक भाग म्हणून ग्राहकांना मर्सिडीझ- बेंझ कार केयर सेवेचा लाभ घरबसल्या घेता येणार आहे. 25 वर्षपूर्तीच्या निमित्ताने मर्सिडीझ- बेंझद्वारे ग्राहकांना ही सेवा केवळ 2500 रुपयांपासून पुढे देण्यात येणार आहे.

मर्सिडीझ- बेंझ स्टुडिओ – मर्सिडीझ- बेंझ कार्ससाठी सर्वसमावेशक सुशोभिकरण सेवा आखली जात आहे. आमच्या ग्राहकांना त्यांची कार रंगवून कस्टमाइझ करता येईल. यासाठी इतर तपशीलवार योजनाही उपलब्ध केल्या जाणार आहेत.

व्हेइकल रिसेप्शन यंत्रणा – हा प्रकल्प सेवेच्या डिजिटायझेशनचा अनुभव वैयक्तिक सेवा आणि रियल ट्रॅकिंग सेवेसह उच्च पातळीवर नेईल.

सर्व्हिस कनेक्ट – ही सेवा ग्राहकांना सर्व्हिसिंगदरम्यान त्यांचे वितरक व कर्मचारी वर्गाशी वेगवेगळ्या माध्यमातून संवाद साधण्याची संधी देईल.

पुढील उपक्रम मर्सिडीझ बेंझने यापूर्वीच सुरू केले आहेत –

  • मर्सिडीझ मी अडॅप्टर – 1 ऑक्टोबर 2019 रोजी मर्सिडीझ मी कनेक्टचा एक भाग म्हणून हा उपक्रम लाँच करण्यात आला होता. 25 वर्षपूर्तीच्या निमित्ताने आम्ही 30 नोव्हेंबर 2019 रोजी एमबी एडॅप्टर दिन साजरा करणार आहोत. ग्राहकांना या दिवशी मोफत अडॅप्टर्स दिले जाणार आहेत.
  • सर्व्हिस ऑन व्हील्स – मर्सिडीझ- बेंझचा हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे, ज्याज ग्राहकांना सेवा नेटवर्कपासून दूर असलेल्या ठिकाणी वाहन देखभाल सेवा पुरवली जाते.
  • मर्सिडीझ- बेंझ कार डिटेलिंग सोल्यूशन्स – मर्सिडीझ- बेंझ ब्रँड पुढच्या काळातही नव्यासारख राहावी यासाठी हा खास उपक्रम तयार करण्यात आला आहे.
  • मर्सिडीझ- बेंझच्या विश्वासार्ह सुट्या भागांची सहज उपलब्धता – वॉरंटी असलेले विश्वासार्ह सुटे भाग आता काउंटरवर उपलब्ध करण्यात आले आहेत.
  • कंपासचे लाँच – मर्सिडीझ मी कनेक्ट सर्व्हिसेसच्या सर्व कनेक्टेड कार्ससाठी नवा कस्टामाइज्ड अनुभव आणि गाडी नादुरुस्त झाल्यास सहाय्य सेवा या अंतर्गत दिली जाते. आम्हाला खात्री आहे, की कंपासमुळे ग्राहकांचा अनुभव एका नव्या पातळीवर घेऊन जाईल.
  • तांत्रिक प्रशिक्षण संस्थांशी सहकार्य – बदलत्या गरजांनुसार कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी
  • मर्सिडीझ- बेंझ कलेक्शन वस्तूंवर वॉरंटी – ग्राहकांना आता मर्सिडीझ- बेंझ लाइफस्टाइल कलेक्शन वस्तूंवर दोन वर्षांची वॉरंटी मिळणार आहे.
  • अडव्हान्स अशुरन्स आणि विस्तारित वॉरंटी प्रोग्रॅम किंमती सर्वसाधारण – गाड्यांवर तिच्या मूल्याच्या केवळ 1.5 टक्के इतक्या कमी किंमतीत विस्तारित वॉरंटी उपलब्ध केली जाणार आहे.
  • सुट्या भागांची जलद सेवा – कर्नाटक आणि गुजरातमधील ग्राहकांना सुटे भाग 55 टक्के जलद गतीने मिळणार आहेत.
  • सेवा क्लिनिक्स – असा एक अभिनव उपक्रम ज्यामध्ये ग्राहकांना मर्सिडीझ- बेंझच्या तंत्रज्ञांशी संवाद साधता येणार आहे.
  • कठीण काळात ग्राहकांच्या साथीला

o    मोबिलो : ऑन रोड सहाय्य सेवा

o    पूरग्रस्त भागातील ग्राहकांना विविध सेवांद्वारे मदत

  • मर्सिडीझ- बेंझ प्रशिक्षण संस्था – अडव्हान्स्ड डिप्लोमा इन ऑटोमोटिव्ह मेकाट्रॉनिक्स (एडीएएम) आणि अडव्हान्स ऑटोमोटिव्ह बॉडी रिपेयर ट्रेनिंग (एएबीआर) अशा प्रशिक्षण अभ्यासक्रमांद्वारे आतापर्यंत 900 जणांना प्रशिक्षइत करण्यात आले असून त्यासाठी भारत सरकारच्या कौशल्य भारत या उपक्रमाशी सहकार्य करण्यात आले आहे.
  • मर्सिडीझ- बेंझ अकॅडमीच्या या विस्तारित प्रशिक्षण उपक्रमाद्वारे आतापर्यंत रिटेल नेटवर्कमधील 2840 जणांना प्रशिक्षण देण्यात आले असून त्यात आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणाचाही समावेश आहे. त्यासाठी 73,720 मानवी कामकाज तास खर्च करण्यात आले आहेत.
  • उन्हाळी शिबिरे – निवडक सुट्या भागांवर 25 टक्के सपोर्ट
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्याचे वैभव वाघ शिंदेंच्या शिवसेनेचे प्रभारी राज्य निवडणूक समन्वयक पदी…

पुणे- शिवसेनेचे उप-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार,शिवसेनेच्या ...

अमोल बालवडकर मित्र परिवाराच्या वतीने आयोजित स्नेहमेळावा हजारो नागरीकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न

पुणे-नूतन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर अमोल बालवडकर मित्र परिवाराच्या वतीने...

कोकाटेंसाठी 6 तास, 40 आमदारांवर अजून निर्णय नाही:संजय राऊतांची सुप्रीम कोर्टावर नाराजी

मुंबई- शिवसेना नाव आणि चिन्हाच्या प्रकरणावरून त्यांनी सर्वोच्च न्यायालयालाही...

रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पाठींबा.

पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी रिपब्लिकन...