~पहिल्यांदाच ‘मोशन चेअर’ हे खास उत्पादन दाखल~
पुणे: गोदरेज इंटेरिओ या संस्थात्मक श्रेणीतल्या आणि डिझाइन, उत्पादन व रिटेल यातील शाश्वतता व उत्कृष्टतेविषयक केंद्रे यांसाठी कसोशीने प्रयत्नशील असलेल्या भारतातील आघाडीच्या फर्निचर ब्रँडने पुणे येथे ‘मोशन चेअर’ हे विशेष उत्पादन दाखल केले.
इंटेरिओ विभागाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर अनिल माथुर यांच्या हस्ते उत्पादनाचे अनावरण करण्यात आले. या नावीन्यपूर्ण उत्पादनाच्या मदतीने या रिटेल ब्रँडचे पुण्यामध्ये आरोग्य व वेलनेस श्रेणीला चालना देण्याचे व त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्याचे उद्दिष्ट आहे.
दशक किंवा त्याहून अधिक काळाशी तुलना करता, आजकाल कामासाठी ऑफिसमध्ये अधिक तास घालवले जातात. तसेच, ऑफिसमध्ये घालवल्या जाणाऱ्या इतक्या तासांपैकी बराचसा कालावधी कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर व्यतित केला जातो. कामाच्या ठिकाणी बराच वेळ बसून काम करत असताना, ऑफिसला जाणाऱ्यांना बराच वेळ अतिशय अवघडलेल्या स्थितीत बसावे लागते व म्हणूनच अशा व्यक्तींसाठी हे उत्पादन अतिशय उपयुक्त ठरणार आहे.
इंटेरिओ डिव्हिजनचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर अनिल माथुर यांनी सांगितले, “आरोग्य व वेलनेस उत्पादनांची लोकप्रियता वाढत असल्याने आधुनिक ऑफिस फर्निचरसाठी मागणी वाढली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात संधी असल्याने आम्ही आरोग्य व वेलनेस श्रेणीतील फर्निचरच्या उत्पादनामध्ये 20 कोटी रुपयांची गुंतवणूक करायचे ठरवले. एकूण संघटित ऑफिस फर्निचर उद्योगामध्ये 16% हिस्सा असलेल्या गोदरेज इंटेरिओच्या एकूण उत्पन्नात पुण्यासह पश्चिम बाजाराचे 26% योगदान आहे. सध्या, महाराष्ट्रातील ऑफिस फर्निचर क्षेत्राचे ब्रँडच्या एकंदर ऑफिस फर्निचर उद्योगाच्या एकूण वार्षिक उत्पन्नामध्ये योगदान 7% आहे.”
भारतात ‘मोशन चेअर’ दाखल करण्यासाठी ठिकाण ठरवण्याबद्दल माथूर यांनी सांगितले, “आमच्यासाठी पुणे ही देशातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. इतक्या उत्तम व वाढत्या बाजारात नवे उत्पादन दाखल करण्यास आमची पसंती असते. तसेच, पुण्यातील ऑफिस फर्निचर श्रेणीमध्ये लक्षणीय व परिवर्तनशील ट्रेंड दिसून येत आहेत. ऑफिस फर्निचर या संकल्पनेचा कल सौंदर्याकडून ह्युमन इंजिनीअरिंगकडे वळला आहे आणि पुण्यातील जाणकार ग्राहकांना हे परिवर्तन पसंत पडले आहे.”
गोदरेज इंटेरिओ या वेलनेस पोर्टफोलिओमध्ये अनेक उत्पादने असून ती वेलनेसच्या पसंतीनुसार विविध गरजा व आवडी पूर्ण करतात. ‘मोशन चेअर’ विशेष संकल्पनेवर आधारित असून, जेथे उत्पादन युजरच्या बसण्याच्या स्थितीच्या नैसर्गिक गरजेनुसार असेल व युजरचे एकंदर वेलनेस व कार्यक्षमता यासाठी बसणे व शारीरिक हालचाली सहज शक्य होतील.