पुणे– व्हॅस्कॉन इंजिनियर्स लि. (बीएसई स्क्रिप आयडी व्हॅस्कॉनक्यू) या पुण्यातील आघाडीच्या स्थावर मालमत्ता डेव्हलपरने सार्वजनिक कामकाज विभाग 3, रायपूर, छत्तीसगढ यांच्याकडून न्यू रायपूर, छत्तीसगढ येथे राजभवन, माननीय मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान, माननीय मंत्र्यांसाठी निवासस्थान आणि उच्च अधिकारी निवासस्थान बांधण्यासाठी 505.54 कोटी रुपयांचे कंत्राट मिळवले आहे. विक्रमी वेळेत दर्जेदार बांधकामासह कार्यक्षम वितरणासाठी प्रसिद्ध असलेले व्हॅस्कॉन या करारावर सही केल्यानंतर 24 महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण करणार आहेत.
यावर्षी व्हॅस्कॉनला महाराष्ट्र राज्य पोलिस हाउसिंग अँड वेल्फेयर कॉर्पोरेशन लि. (महाराष्ट्र सरकारचे अंडरटेकिंग) यांच्याकडूनही मुंबईत कर्मचाऱ्यांसाठी बहुपयोगी सभागृहासह घरे बांधण्यासाठीचे 465 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. या प्रकल्पाचे वितरण निविदेची पावती आल्यापासून 36 महिन्यांत द्यायचे आहे.
या कंत्राटांविषयी व्हॅस्कॉन इंजिनियर्स लि. चे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संतोष सुंदरराजन म्हणाले ‘दोन मोठ्या प्रकल्पांचे काम मिळाल्याचा आम्हाला अतिशय आऩंद आहे आणि परिणामी चालू आर्थिक वर्षात आमची ईपीसी कंत्राटे दुप्पट झाली आहेत. महाराष्ट्र आणि छत्तीसगढ सरकारकडून मिळालेल्या या दोन ईपीसी कंत्राटांमुळे उत्पन्न दृश्यमानता लक्षणीयरीत्या वाढली आहे. पुढे जाऊन आम्हाला क्षमता वापर सुधारण्यासाठी संधी मिळेल व त्यातूनच अधिक चांगले कार्यकारी मार्जिन साध्य करता येईल. ही कंत्राटे व्हॅस्कॉनच्या दर्जेदार बांधकामाची पावती देणारी आणि आम्ही ग्राहकांसाठी जे काम करतो, त्यावर असलेल्या भागधारकांच्या विश्वासाचा पुनरूच्चार करणारी आहेत.’
नुकत्याच मिळालेल्या कंत्राटांमुळे व्हॅस्कॉनची एकूण कंत्राटे चालू आर्थिक वर्ष 1245 कोटी रुपयांवर गेली असून बाह्य कंत्राटांचे एकूण मूल्य अंदाजे 1900 कोटी रुपयांवर गेले आहे.