पुणे: टॉरंट उद्योग समुहातील महेश गॅस लिमिटेड या उपकंपनीतर्फे ‘पुणे नॅचरल गॅस’ या ब्रँडच्या अंतर्गत पुणे जिल्ह्यात पाईपड् नॅचरल गॅस (पीएनजी) आणि कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) यांचा पुरवठा करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. याबाबतची घोषणा आज येथे करण्यात आली. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडला (एमएनजीएल) आधीपासूनच बहाल करण्यात आलेली क्षेत्रे वगळता पुणे जिल्ह्यातील सर्व औद्योगिक, व्यावसायिक आणि निवासी ग्राहकांना पुणे नॅचरल गॅसच्या वतीने नैसर्गिक वायू उपलब्ध होईल.
पुणे नैसर्गिक वायूला प्राधिकृत केलेल्या क्षेत्रांमध्ये पुणे जिल्ह्यातील रांजणगाव, बारामती, कुरकुंभ, इंदापूर, पिरंगुट, वाघोली, सासवड, सणसवाडी, खेड शहर, राजगुरुनगर, लोणावळा, तळेगाव फेज 2, शिरुर, शिक्रापूर, जेजुरी व इतर तालुक्यांचा समावेश आहे. यामध्ये 15 हजार चौ. किलोमीटर क्षेत्रफळात गॅसचे वितरण करण्यात येईल.
कंपनीने ‘पुणे नॅचरल गॅस’साठी सीएनजी स्थानके आणि पीएनजीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे काम सुरू केले आहे. रांजणगाव, लोणीकंद व कार्ला येथील तीन सीएनजी स्थानके कार्यान्वित करण्यात आली असून बारामती, शिवणे आणि पुणे-बंगळुरू महामार्गावर आणखी तीन सीएनजी स्थानके येत्या 3 महिन्यांत सुरू होण्याची शक्यता आहे. यातील पहिला टप्पा 31 मार्च 2021 पर्यंत सुरू होईल. या अंतर्गत, पुणे जिल्ह्यात सीएनजीची व्यापक उपलब्धता निश्चित करण्यासाठी 50 सीएनजी स्थानकांची उभारणी करण्याचा विचार करीत आहे. तसेच एक लाखाहून अधिक रहिवाशांना पीएनजीची कनेक्शन्स देण्यात येतील. पुणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांमधील उद्योगांना नैसर्गिक वायूचा पुरवठा या टप्प्यात करण्यात येईल आणि 1,800 इंच कि.मी. गॅस पाइपलाइनचे नेटवर्क उभारण्यात येईल.
सुरुवातीच्या टप्प्यात, वाघोली, लोणीकंद, शिक्रापूर, रांजणगाव, शिरूर, राजगुरूनगर आणि बारामती येथील निवासी ग्राहकांना पीएनजीची सेवा देण्याची कंपनीची योजना आहे. यासाठी इच्छुक ग्राहक www.punenaturalgas.com वर कनेक्शनसाठी नोंदणी करू शकतात. या परिक्षेत्रातील सर्व प्रमुख निवासी, औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना गॅस पुरवण्यासाठी 1,800 इंच कि.मी. पाईपलाईन टाकण्याचे काम यापूर्वीच सुरू करण्यात आलेले आहे. या प्रकल्पामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यातील ग्राहकांना पर्यावरणपूरक व किफायतशीर इंधन असलेल्या नैसर्गिक वायूचा लाभ घेता येणार आहे. हा लाभ आतापर्यंत केवळ पुणे शहरातील रहिवाश्यांसाठी मर्यादित होता.
पुणे जिल्ह्यात सीजीडी (सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशन) नेटवर्कच्या औपचारिक सादरीकरणाविषयी टिप्पणी करताना टॉरंट गॅस लिमिटेडचे संचालक दीपक दलाल म्हणाले, “ जागतिक पातळीवर प्राथमिक उर्जा मिश्रणात नैसर्गिक वायूचा अंदाजे 24 टक्के वाटा आहे. मात्र भारताच्या नैसर्गिक वायूचा हा वाटा केवळ 6 टक्के इतकाच आहे. हवामान बदलाची वाढती चिंता लक्षात घेता, येत्या काही वर्षांत नैसर्गिक वायूसारखे पर्यावरणासाठीचे स्वच्छ इंधन भारताच्या आर्थिक वाढीत प्रबळ भूमिका निभावेल, अशी अपेक्षा आहे. सन २०२० पर्यंत शहर गॅस वितरण 78 वरून 250शहरांपर्यंत वाढविण्याचे आणि 2025 पर्यंत उर्जेच्या मिश्रणामध्ये नैसर्गिक वायूचा वाटा १5टक्क्यांपर्यंत नेण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे. या लक्ष्यामध्ये आमचेही योगदान असावे, या हेतूने 7 राज्यांमधील 32 शहरांमध्ये जागतिक दर्जाचे सीजीडी नेटवर्क आम्ही तयार करीत आहोत. पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी पीएनजी आणि सीएनजी आणून आम्हाला आनंद होत आहे. आमच्या ग्राहकांना वाजवी किंमतीत चांगली सेवा देण्याचा आमचा मनापासून हेतू आहे.”
याप्रसंगी बोलताना महेश गॅस लिमिटेडचे कार्यकारी संचालक श्रीधर तांब्रपर्णी म्हणाले, “सध्या उपलब्ध असलेल्या इंधनांमध्ये पीएनजी आणि सीएनजी ही सर्वात स्वच्छ इंधने आहेत आणि देशाच्या वाढत्या उर्जा गरजा भागविण्यासाठी ती मदत करतील. पर्यावरणास अनुकूल असण्याव्यतिरिक्त पीएनजी आणि सीएनजी यांचे इतर इंधनांपेक्षा असंख्य फायदे आहेत. पीएनजीमुळे इंधनाचा अविरत पुरवठा, सोय आणि सुरक्षितता मिळते, तर सीएनजीमुळे कमी किंमतीचा लाभ, चांगली इंधन कार्यक्षमता, कमी देखभाल खर्च आणि त्याद्वारे कुटुंबांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत असे लाभ होतात. आम्हाला खात्री आहे की एकदा ग्राहकांनी ही इंधने स्वीकारल्यानंतर त्यांना त्यांचे दृश्यमान फायदे दिसतील.”
दिल्ली, मुंबई, पुणे (शहर), अहमदाबाद, सूरत इत्यादी मोठ्या शहरांमधील ग्राहकांनी यापूर्वीच नैसर्गिक वायूचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यास सुरुवात केली आहे.
महेश गॅस लिमिटेड (एमजीएल) बद्दल..
टॉरंट समुहाची सहयोगी कंपनी महेश गॅस लिमिटेडतर्फे (एमजीएल) पुणे नॅचरल गॅस उपलब्ध करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात एमएनजीएलला बहाल केलेली अधिकृत क्षेत्रे वगळता, इतरत्र सीजीडी नेटवर्क विकसित करण्यासाठी एमजीएल या कंपनीला पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने (पीएनजीआरबी) अधिकृत मान्यता दिली आहे.
टॉरंट समुहाबद्दल..
टॉरंट समुहाचा भारतात वीजनिर्मिती व औषधे या क्षेत्रांत मोठा दबदबा आहे. या समुहाचा महसूल २१,००० कोटी रुपये (3 अब्ज डॉलर्स) इतका आहे. टॉरेन्ट गॅस लिमिटेड या कंपनीला सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशन (सीजीडी) व्यवसायासाठी मान्यता मिळाली आहे. या समुहातील प्रमुख कंपनी टॉरंट फार्मा ही हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आणि मध्यवर्ती चेता संस्था या साठीची औषधे बनविते. 40 देशांमध्ये तिचे कामकाज विस्तारलेले आहे. टॉरंट पॉवर ही वीज निर्मिती, पारेषण व वितरण या उपक्रमात देशातील सर्वात मोठी खासगी कंपनी आहे. तिने 3721 मेगावॅट क्षमतेची उत्पादन क्षमता स्थापित केली आहे आणि 3 राज्यांमधील8 शहरांत 32 लाख ग्राहकांना ती वीज वितरण करते.
टॉरंट गॅसच्या माध्यमातून, टॉरंट समूहाने उर्जा क्षेत्रातील आणखी एक महत्त्वाची गरज सोडवण्यासाठी सीजीडी व्यवसायात प्रवेश केला आहे. पीएनजीआरबीच्या वतीने आयोजित तेराव्या आणि दहाव्या सीजीडीच्या निविदा फेऱ्यांमध्ये टॉरंट गॅसला भारतातील 7 राज्यातील 32 जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक वायूचे वितरण करण्याचे हक्के देण्यात आले. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि पंजाब या राज्यांमध्ये या उद्योगाचा विस्तार करण्याची कंपनीची आक्रमक योजना आहे.
पीएनजी (पाईपड नॅचरल गॅस) विषयी..
पीएनजीचे ज्वलन स्वच्छ आणि संपूर्ण प्रकारचे असते. हे इंधन स्वच्छ आणि हरीत म्हणून व्यापकपणे मानले गेले आहे. एलपीजीशी तुलना केली असता; पीएनजीचे ग्राहकांसाठी बरेच वेगळे फायदे आहेत – सिलिंडर्स साठविण्यासाठी जागेची कटकट नाही, आगाऊ नोंदणी करण्याची व सिलिंडर बदलून घेण्याची डोकेदुखी नाही आणि सुरक्षित व विश्वासार्ह पुरवठा होण्याची खात्री. याव्यतिरिक्त, पीएनजी आर्थिकदृष्ट्या परवडण्याजोगे आहे. पाईपमधून वाहणाऱ्या आणि मीटरने मोजल्या जाणाऱ्या या गॅसमुळे तणावमुक्त, स्वस्त आणि कार्यक्षम पर्याय ग्राहकांना मिळतो.
सीएनजी (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) विषयी..
सीएनजी हा इंधनाचा पर्याय आता स्मार्ट आणि पर्यावरणास जागरूक अशा वाहन मालकांच्या पसंतीस उतरला आहे. शिसे आणि गंधक मुक्त अशा वैशिष्ट्यांमुळे त्यास सामान्यतः हरीत इंधन म्हणून संबोधले जाते. सीएनजीमुळे घातक घटकांचे उत्सर्जन कमी होते आणि त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा प्रभाव कमी होतो. सीएनजी केवळ एक स्वच्छ इंधनच नाही, तर ते गंजविरोधकबी असल्यामुळे, ते वाहनाच्या इंजिनाच्या शक्तीवर कोणताही परिणाम करीत नाही. तसेच इंजिनाची इंधन कार्यक्षमताही वाढवते. त्यामुळे इंजिन दीर्घायुषी बनते. पेट्रोलपेक्षाही सीएनजी स्वस्त आहे आणि गाडी चालविण्याच्या पद्धतीनुसार, ग्राहक त्यांच्या मासिक इंधन खर्चावर सुमारे 35-40 टक्के बचतीची अपेक्षा करू शकतात.
सध्या कार, रिक्षा, बस आणि इतर सार्वजनिक वाहतूक वाहनांचे मोठे उत्पादक त्यांच्या कारखान्यांत बसविलेल्या सीएनजी इंजिनासह गाड्या सादर करीत आहेत. विद्यमान पेट्रोल कार मालकांसाठी सीएनजी किटचे अनेक स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड बाजारात उपलब्ध आहेत, ज्यामुळे पारंपारिक इंधनावर चालणारी वाहने सीएनजीवर चालू शकतात.