तामिळनाडू प्रीमियर लीगमधील बीकेटीच्या पर्यावरणीय मोहिमेमध्ये आंतरराष्ट्रीय आणि भारतीय नामवंत क्रिकेटपटू सहभागी

Date:

स्कॉट स्टायरिस, शेन वॉटसन, हेमांग बदानी, रविचंद्रन अश्विन, विजय शंकर, वॉशिंग्टन सुंदर, नारायण जगदीसन यांच्या हस्ते दिंडीगुल आणि चेपाक येथे वृक्षारोपण

सोमवार, 21 ऑगस्ट 2019 : भारतीय अष्टपैलू रविचंद्रन अश्विन यांच्यासह माजी भारतीय खेळाडू हेमांग बदानी आणि भारतीय अष्टपैलू विजय शंकर आणि वॉशिंग्टन सुंदर, दिंडीगुल ड्रॅगन्सचा कर्णधार नारायण जगदीसन यांनी बालकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड (बीकेटी) या टायर उत्पादक कंपनीने आयोजित केलेल्या वृक्षारोपण मोहिमेचे नेतृत्व केले. न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू स्कॉट स्टायरिस आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार शेन वॉटसन हेही या मोहिमेत सामील झाले.

सध्या सुरू असलेल्या शंकर सिमेंट तमिळनाडू ट्वेंटी-२० प्रीमियर लीग (टीएनपीएल) दरम्यान क्रिकेटमधील कौशल्य आणि निसर्गाचे संवर्धन यांचा सुरेख मिलाप बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेडने (बीकेटी) साधला.

मिड विकेट आणि लाँगऑन दरम्यानच्या सीमेपासून काही मीटर अंतरावर असलेल्या प्रचंड आकाराच्या बीकेटी टायरच्या दिशेने फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजांच्या वतीने, लीगच्या सहयोगी प्रायोजकांनी हजारो रोपट्यांची लागवड करण्याचा निर्णय घेतला होता. हा उपक्रम सद्गुरूशी संबंधित ईशा फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने घेण्यात आला.

बीकेटी टायर्सचे सहव्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार यांनी टीएनपीएलच्या उपक्रमातून 50 हजार रोपे लावण्याची आशा बाळगली आहे. ते म्हणाले, “ईशा फाऊंडेशन या सद्गुरूशी संबंधित स्वयंसेवी संस्थेशी आम्ही हातमिळवणी केली आहे. टीएनपीएलच्या माध्यमातून आम्ही तमिळनाडूमध्ये सुमारे 50 हजार रोपांची लागवड करू, अशी आमची अपेक्षा आहे.”

प्लेऑफमध्ये, जर बीकेटी टायरला चेंडू लागला तर 10,000 रोपांची लागवड केली जाईल आणि अंतिम फेरीत 20,000 रोपे लावली जातील.

फलंदाजांनी सामन्यादरम्यान बीकेटी टायरला अधिक वेळा फटकवावे, जेणेकरून जास्त रोपे लावता येतील, अशी इच्छा वॉटसन यांनी व्यक्त केली. “तामिळनाडू राज्यात सर्वत्र अधिक झाडे लावणे हा एक चांगला उपक्रम बीकेटीने सुरू केला आहे. आपल्या सर्वांना वृक्षारोपणाचे असे उपक्रम सुरूच ठेवावे लागणार आहेत, कारण केवळ भारतातच नव्हे तर जगभरात बरीच झाडे तोडली जात आहेत. मला आशा आहे की षटकार मारल्यानंतर जमिनीवर पडणाऱ्या चेंडूंपैकी काही चेंडू टायरला भिडतील आणि जास्तीत जास्त झाडे लावता येतील, असे वॉटसन यांनी म्हटले.

टीएनपीएलशी युती करणे आणि वृक्षारोपणासारखा उपक्रम राबविणे यातून बीकेटीची पर्यावरणाबद्दल असलेली चिंता अधोरेखीत होते, असे मत पोद्दार यांनी व्यक्त केले. “आम्ही एक कंपनी म्हणून आपल्या पर्यावरणाबद्दल खूप जागरूक आहोत. ही आमची जागरुकता सध्याचीच नव्हे तर गेल्या अनेक दहा वर्षांपासूनची आहे. उत्तर भारतातील आमच्या दोन कारखान्यांना लागणाऱ्या विजेपैकी जवळपास 50 टक्के वीज ही पवनचक्क्यांद्वारे उत्पादित केली जाते. हे 2004 पासून सुरू आहे. ऊर्जा संवर्धन आणि त्याचे शाश्वत प्रयत्न यासाठी राष्ट्रपतींकडून आम्हाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. आम्हाला दोन वर्षे हा पुरस्कार मिळाला आहे आणि पुन्हा तो मिळावा, अशी आमची इच्छा आहे. पर्यावरण रक्षणाच्या कामात आम्ही मोठी गुंतवणूक केली आहे. आम्ही एक लाखापेक्षा अधिक जास्त झाडे लावली आहेत. या आमच्या कामगिरीबद्दल आम्ही खूप जागरूक आहोत, ” असे पोद्दार म्हणाले.

जगातील अनेक क्रीडा स्पर्धांमध्ये बीकेटी टायर्सची पूर्वीपासून उपस्थिती आहे. परंतु क्रीडा स्पर्धा आणि पर्यावरणविषयक कृती असा एकत्रित उपक्रम घेण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे पोद्दार यांनी सांगितले. “जागतिक स्तरावर आम्ही फ्रान्स आणि इटलीमधील फुटबॉलशी संबंधित आहोत. अमेरिकेत आमचे टायर वापरले जातात, या कारणामुळेही अनेकदा आम्ही विविध स्पर्धांशी जोडले जातो. ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश क्रिकेट लीगशीही आमचा संबंध आहे. भारतात आम्ही प्रो-कबड्डी आणि आता टीएनपीएलशी व्यापकपणे संबंधित आहोत. आम्ही भारत सुपर लीग कबड्डीदेखील प्रायोजित केली. या स्पर्धेच्या चार सत्रांपैकी एक तामिळनाडूतील कोईंमतूरमध्ये आयोजित करण्यात आले होते, असे पोद्दार यांनी नमूद केले.

तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव आर. आय पलानी म्हणाले, की बीकेटीचा हा वृक्षारोपणाचा उपक्रम आता खूपच व्यापक झाला आहे आणि निसर्गाच्या संरक्षणासाठी जनजागृती करण्यात लीगमध्ये या उपक्रमाने बरीच प्रगती गाठली आहे. ते म्हणाले, “बीकेटीची ही मैदानावरील आणि मैदानाबाहेरील कृती ही संघांमधील चर्चेचा विषय ठरली आहे. क्रिकेटपटूंनी रोपांची लागवड केल्याने हे सिद्ध होते की भविष्यातील हिरव्यागार प्रयावरणासाठीदेखील ते फलंदाजी करण्यास उत्सुक आहेत.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...