मुंबई – टाटा स्काय या भारतातील आघाडीच्या सर्वसमावेशक व डीटीएच आणि ओटीटीद्वारे कंटेट वितरित करणाऱ्या कंपनीने आंतरराष्ट्रीय मनोरंजनातील क्षेत्रातील निवडक कंटेट लाँच केला आहे.
अरूण उन्नी, मुख्य कंटेट अधिकारी – टाटा स्काय म्हणाले, ‘टाटा स्काय वर्ल्ड स्क्रीनचे लाँच करून आम्ही सिनेमा आणि टीव्हीप्रेमींना ६५० तासांचे मिळून उत्तम दर्जाचे मनोरंजन उपलब्ध करत आहोत. त्यात केवळ हॉलिवूडच नव्हे, तर संपूर्ण जगभरातील सर्वोत्तम गोष्टींचा जाहिरातींशिवाय आनंद घेता येणार आहे. आमचे विश्लेषण असे सांगते, की मनोरंजनाचे प्रकारांची आवड बदलत आहे आणि प्रेक्षकांना आता जास्तीत जास्त उत्सुकतापूर्ण व वैविध्यपूर्ण आशय हवा असतो तसेच त्यांना भाषेचा अडसर जाणवत नाही. आमच्या निवडक यादीत जगभरातील काही अतिशय लोकप्रिय आणि समीक्षकांनी गौरवलेले आणि आतापर्यंत भारतातील टीव्हीवर कधी न दर्शवलेले सिनेमे व टीव्ही शोजचा समावेश आहे.’
टाटा स्कायने सुरू केलेल्या या आणखी एका अनोख्या उपक्रमाअंतर्गत पहिल्यांदाच एखाद्या डीटीएच व्यासपीठाद्वारे जाहिरात मुक्त सेवा दिली जाणार आहे, ज्यामध्ये नोंदणीदारांना २४x७ उपलब्ध असलेल्या, जगभरातील मालिका व सिनेमे पाहाता येतील. विशेष म्हणजे, यातील बहुतेक आशय यापूर्वी भारतातील टीव्हीवर दाखवण्यात आलेला नाही. हा आशय नोंदणीदारांना त्यांच्या टीव्ही सेटवर एसटीबी, टाटा स्काय मोबाइल अप आणि टाटा स्कायचे वेब अपद्वारे (watch.tatasky.com) पाहाता येईल.
कोणत्याही अतिरिक्त इंटरनेट जोडणीशिवाय टाटा स्काय वर्ल्ड स्क्रीन दरमहा केवळ ७५ रुपयांत नोंदणीदारांसाठी उपलब्ध होणार असल्यामुळे ग्राहकांना वाजवी दरांत अभिनव आशय पाहाता येईल. हा कंटेट मोठ्या पडद्यासोबतच मोबाइल किंवा लॅपटॉपवरही उपलब्ध होणार आहे.
टाटा स्काय वर्ल्ड स्क्रीन – कंटेट
टाटा स्काय वर्ल्ड स्क्रीनमध्ये वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांतील आणि भाषांतील (अरेबिक, रशियन, स्पॅनिश, बेल्जियम, इस्त्राएल, क्युबा, जर्मन, फ्रेंच, इटालियन, पोर्तुगीज, हिंदी, जपानी, चीनी आणि कोरियन) प्रमुख मनोरंजनाचा समावेश असेल. इंग्रजीमध्ये नसलेल्या कंटेटसाठी उपशीर्षके देण्यात येतील, तर काहींचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले जाईल.
सिनेमांमध्ये हॉलिवूडच्या काही आघाडीच्या स्टार्सचे सिनेमे, परिचित फ्रँचाईझी तसेच आंतरराष्ट्रीय भाषांतील निवडक भाषा, आशय आणि सिनेमॅटिक कौशल्यांसाठी प्रसिद्ध असलेले सिनेमे, अक्शनपट, कोरिओग्राफी आणि स्टंट्ससाठी प्रसिद्ध असलेले सिनेमे यांचा समावेश आहे.
ड्रामा सीरीजमध्ये समीक्षकांनी गौरवलेले ब्रिटिश, हिब्रू, स्पॅनिश, इटालियन आणि कॅनेडियन रहस्य, थ्रिलरपट तसेच नॉयरपट आणि काही आंतरराष्ट्रीय मालिकांचा समावेश आहे.
अशाप्रकारे वर्ल्ड स्क्रीन टाटा स्काय नोंदणीदारांना जगभरातील आशयसंपन्न सिनेमे आणि टीव्ही मालिका त्यांच्या सोयीनुसार, पाहिजे तेव्हा आणि टीव्ही, लॅपटॉप किंवा मोबाइलवर पाहाता येणार आहेत.
टीव्ही सीरीज बॉक्स सेट्स प्रीमियर्समध्ये प्रसिद्ध थ्रिलर्स वॉलांडर, हॅपी व्हॅली, कोड ३७, टीम चॉकलेट, प्रिझनर्स ऑफ वॉर आणि बेबीलॉन बर्लिन यांचा समावेश आहे. दरमहा जागतिक सिना क्षेत्रातील दोन प्रीमियर्सही पाहायला मिळतील. ऑपरेशन क्रोमाइट आणि डेसिआर्तो
अरूण उन्नी म्हणाले, ‘आता नोंदणीदारांना जगभरतील मनोरंजन, सर्वोत्तम कथांचा भाषेच्या अडथळ्याशिवाय मनसोक्त आनंद घेता येईल.’
टाटा स्कायबद्दल
टाटा स्काय लिमिटेड (टाटा स्काय) हे टाटा सन्स आणि ट्वेंटीफर्स्ट सेंच्युरी फॉक्स यांच्यातील संयुक्त भागिदारी आहे. २००१ मध्ये सुरू झालेले आणि २००६ मध्ये सेवा लाँच केलेले टाटा स्काय हे भारतातील आघाडीचे कंटेट वितरण व्यासपीठ असून ते पे टीव्ही आणि ओटीटी सुविधेद्वारे आपल्या सेवा देते. जगभरातील सर्वोत्तम आशय परवडणाऱ्या किंमतीत, कोठेही, कोणत्याही वेळेस आणि कोणत्याही स्क्रीनवर उपलब्ध करण्याच्या हेतूने लाँच करण्यात आलेले टाटा स्काय हे आपल्या विविध उत्पादनांसह देशातील नोंदणीदारांचा टीव्ही पाहाण्याचा अनुभव समृद्ध करणारे पहिले आहे. एचडी सेट टॉप बॉक्स क्षेत्रात प्रवर्तक ठरलेल्या टाटा स्कायने बाजारपेठेतील लक्षणीय हिस्सा मिळवला आहे. कंपनी सातत्याने आपल्या व्यासपीठावर वेगवेगळ्या प्रकारच्या आणि भाषांतील चॅनेल्सचा समावेश करून प्रेक्षकांसाठी नवा आशय पुरवत आहे. सध्या टाटा स्कायचा दोन लाख शहरांत विस्तार झाला असून देशभरात त्यांच्या १८ दशलक्ष जोडण्या आहेत.
काही आकर्षणे
वर्ल्ड ड्रामा सीरीज
टीम चॉकलेट – बेल्जियमची फ्लेमिशमध्ये असलेली ही हृदयस्पर्शी, भावनिक आणि प्रेरणादायी छोटी मालिका जेस्पर व्होलेमान्स नावाच्या डाउन सिंड्रोमने ग्रस्त असलेल्या सूत्रधाराची कहाणी आहे, जो एका बेल्जियन चॉकलेट फॅक्टरीमधल्या टीना दर्बानी नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो. बेकायदेशीर वास्तव्याच्या कारणावरून टीनाला कोसोवोला परत पाठवले जाते. मग जेस्पर आणि त्याचे सहकारी टीनाच्या शोधात निघतात. वाटेत त्यांना वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागतो, ज्यातून त्यांच्या कक्षा रूंदावतात. दरम्यान त्यांना कल्पनाही नसते, की त्यांची आवडीची जाग म्हणजे त्यांच्या नोकरीचे ठिकाण एका लोभी परदेशी गुंतवणुकदाराशी लढा देत आहे. पुरस्कार – विविध पुरस्कार – सर्वोत्तम काल्पनिक, नामांकन – सीरीज मॅनिया – पॅनोरमा इंटरनॅशनल
हॅपी व्हॅली – सर्वोत्तम ड्रामा विजेते, सर्वोत्तम अभिनेता, सर्वोत्तम लेखक असे बाफ्ता पुरस्कार मिळवणारा हॅपी व्हॅली हा प्रसिद्ध, सहा भागांचा ड्रामा आहे, ज्यामध्ये पूर्णपणे फसलेलं अपहरण नाट्य आणि वेळेशी स्पर्धा करत अन गलांगर या अपहृत, छोट्या मुलाला शोधण्याचे साहस करणारी तरुणी कॅथरिन पाहायला मिळते. या मालिकेनं रायडर्स गिल्ड ऑफ ग्रेट ब्रिटन (२०१४) पुरस्तकार, बेस्ट लाँग फॉर्म टीव्ही ड्रामा पुरस्कार तसेच सर्वोत्तम टीव्ही ड्रामासाठी क्राइम थ्रिलर पुरस्कार, युके (२०१४) मिळाला आहे.
कोड ३७ – इंग्रजी उपशीर्षके असलेली फ्लेमिशमधील ही बेल्जियन मालिका हॅना माइस नावाच्या स्त्री गुप्तहेरावर आधारित आहे. हॅना लैंगिक अत्याचाराचा छडा लावणाऱ्या एका पोलिस दलाचे नेतृत्व करत असते. कथेचा लहान पण महत्त्वाचा भाग म्हणजे, हॅनाचा स्वतःचा शोध आहे. ती खूप पूर्वी आपल्या घरात झालेली चोरी आणि आईवर झालेल्या बलात्काराचाही छडा लावत असते.
वॉलांडर – अतिशय प्रसिद्ध, सर्वोत्तम अभिनयाचा समावेश असलेली आणि ठाव घेणाऱ्या दृश्यांचा समावेश असलेली, हेनिंग मानकेल यांनी लिहिलेल्या स्वीडीश रहस्यकथेवर आधारित असलेली ही मालिका गुप्तहेर कर्ट वॉलांडरचा प्रवास दाखवते. दक्षिण स्वीडनमध्ये घडत असलेल्या विचित्र गुन्ह्यांची उकल करताना त्याला स्वतःच्याही काही समस्यांशी लढा द्यावा लागत असतो. ही मालिका चार वैशिष्ट्यपूर्ण फिल्म्सची बनलेली आहे – त्यातील प्रत्येक रहस्यमय प्रवासाचं खून, फसवणूक आणि चक्रावणाऱ्या गुन्ह्यात रुपांतर होत असतं. कर्ट वॉलांडर या निराश झालेल्या माणसाचा प्रवास जाणून घ्या, जो निसर्गरम्य दाक्षिणात्य स्वीडनच्या भवतीभवती वाढच्या हिंसेच्या विरोधात संघर्ष करतो. या मालिकेनं पुढील पुरस्कार जिंकलेले आहेत – बाफ्ता पुरस्कार (२००९) – सर्वोत्तम ड्रामा मालिका, सर्वोत्तम अस्सल टीव्ही संगीत, सर्वोत्तम निर्मिती रचना. ब्रॉडकास्टिंग प्रेस गिल्ड पुरस्कार (२००९) – सर्वोत्तम अभिनेता आणि बाफ्ता पुरस्कार (२०१०) सर्वोत्तम अभिनेता.
जागतिक सिनेमे
ऑपरेशन क्रोमाइट या २०१६ मध्ये आलेल्या दक्षिण कोरिया युद्धावर आधारित सिनेमाचं दिग्दर्शन जॉन. एच. ली. यांनी केलं असून तो इनचॉनच्या लढाईत घडलेल्या खऱ्या घटनांवर आधारित आहे. लियाम नीसन, जंग- जे ली, बिओम सु ली यांनी त्यात काम केलं आहे. अमेरिकी जनरल डग्लस मॅकआर्थर (लियान नीसन) कोरियन परवाना कार्यालयातून आठ सदस्यांची तुकडी एका गुप्त मिशनसाठी पाठवतो. दक्षिण कोरियन नेव्ही लेफ्टनंट (ली जंग- जे) याच्या नेतृत्वाखाली ही तुकडी ऑपरेशन एक्स- रे पार पाडण्यासाठी उत्तर कोरियाई सीमेपार जाते. मॅकआर्थरला खतरनाक इनचॉन लँडिंग ऑपरेशन करण्यासाठी हे प्रतिष्ठित मिशन यशस्वी होणं अतिशय आवश्यक असतं.
द फॉरबिडन किंग्डम हा सिनेमा रॉब मिन्कॉफ यांनी दिग्दर्शित केला असून त्यात जॅकी चॅन, जेट ली आणि मायकेल अँगारानो यांनी काम केलं आहे. ही अमेरिकी टीनएजरची गेष्ट आहे, ज्याला हाँगकाँग सिनेमा आणि कुंग फूचं वेड असतं. त्यातूनच त्याला चीनमधल्या एका जुन्यापुराण्या वस्तूंच्या दुकानात जबरदस्त वस्तू मिळते. ही वस्तू म्हणजे मंकी किंग नावाच्याएका चीनी राजाचं सस्त्र असते. कालौघात हरवलेली एक वस्तू हातात आल्यावर हा टीनएजर अनपेक्षितपणे जुन्या चीनमध्ये जाऊन मार्शल आर्ट्समध्ये पारंगत योद्धांच्या तुकडीमध्ये जाऊन पोहोचतो. ही तुकडी कैदेत झालेल्या मंकी किंगला मुक्त करणाच्या अतिशय धोकादायक कामगिरीवर जाणार असते.
ऑटोमाटा हा २०१४ मध्ये आलेला स्पॅनिश- बल्गेरियन, काल्पनिक विज्ञान कथेवर आधारित अक्शनपट असून त्यात अँतानिओ बँदेरास यांनी काम केलं आहे. सिनेमाचं दिग्दर्शन स्पॅनिश दिग्दर्शन गेब इब्नेझ यांनी केलं असून त्याचं लेखन इब्नेज तसेच इगॉर लेगारेट्टा व जॅव्हियर सँचेझ डोनेट यांनी एकत्रितपणे केलं आहे. बँदेरास यांसह सिनेमात बर्गेट सोरेन्सान, मेलनी ग्रिफित, डिलन मॅकडॉरमॉट, रॉबर्ट फ्रॉस्टर आणि टिम मॅतइनर्नी यांनी काम केलं आहे. जॅक व्हॅकन (अँतानिओ बँदेरास) हा आरओसी रोबोटिक्स कॉर्पोरेशनचा एक विमा एजंट असतो जो रोबोजनी स्वतःमध्ये बदल न करण्याचा नियमभंग करणाऱ्या रोबोट्सच्या केसेसचा तपास करत असतो. या तपासातून त्याला अशा गोष्टींचा शोध लागतो ज्यामुळे मानवजातीच्या भविष्यावर परिणाम होणार असतो.
डेसिअर्तो हा २०१५ मध्ये आलेला मेक्सिकन- फ्रेंच थ्रिलरपट आहे ज्याचं सहलेखन आणि दिग्दर्शन जोनास कुआरान यांनी केलं आहे. कुआरान यांनी आपले वडील अल्फान्सो आणि काका कार्लोस यांच्यासह सिनेमाची निर्मिती केली असून त्याचं वितरण एसटीएक्स फिल्म्सने केलं आहे. या सिनेमात गेल गार्सिया बर्नाल (कार्यकारी निर्माती) आणि जेफ्री डीन मॉर्गन यांनी काम केलं आहे. हा सिना २०१५ च्या टोरँटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्येही दाखवण्यात आला होता, जिथे त्याला खास सादरीकरणासाठी प्राइज ऑफ इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटिक्स (एफआयपीआरईएससीआय) मिळाले होते आणि ८९ व्या अकादमी पुरस्कारांमध्ये परकीय भाषेतील सर्वोत्तम सिनेमा विभागासाठी मेक्सिन प्रवेश म्हणून त्याची निवड करण्यात आली होती. मात्र, या सोहळ्यात सिनेमाला पुरस्कार मिळाला नाही.