Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

आता डेबिट व क्रेडिट कार्डे स्विच ऑन व स्विच ऑफ करणे शक्य

Date:

भारतात पहिल्यांदाच, अॅटम टेक्नालॉजिज ट्रॅनवॉल यांनी जोखीम हाताळण्यासाठी व व्यवहारावर रिअल-टाइम नियंत्रण ठेवण्यासाठी दाखल केले ई-शिल्ड

 स्मार्ट फोन व नॉन-स्मार्ट फोन युजर या दोन्हींना वापरणे शक्य

​ ​बँकांना कार्डे व खात्याशी संबंधित घोटाळे कमी करण्यासाठी व त्यामुळे सुरक्षेसाठीचा खर्च कमी करण्यासाठी मदत

ग्राहकांना त्यांच्या कार्डाच्या वापरावर रिअल-टाइम नियंत्रण ठेवणे शक्य

सर्व प्रमुख बँकांशी सहयोग करण्याचे अॅटमचे उद्दिष्ट

 मुंबई: सरकारकडील आकडेवारीनुसार, भारतात डिसेंबर 21, 2017 पर्यंत, क्रेडिट व डेबिट कार्डे आणि इंटरनेट बँकिंगचा समावेश असलेल्या एकूण 179 कोटी रुपयांचा समावेश असलेल्या 25,800 घोटाळ्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या. सुरक्षेच्या भीतीने भारतातील असंख्य ग्राहक त्यांची कितीही इच्छा असली तरी डिजिटल पेमेंटचा अवलंब करण्यास घाबरत आहेत.

डिजिटल व्यवहारांच्या वाढीच्या बाबतीतील ही महत्त्वाची चिंता दूर करण्यासाठी, भारतात पहिल्यांदाच अॅटम टेक्नालॉजिज व ट्रॅनवॉल यांनी ई-शिल्ड नावाचे नवे तंत्रज्ञान आणले आहे व त्यामुळे जोखीम हाताळण्यासाठी व व्यवहारावर रिअल-टाइम नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होणार आहे. ग्राहकांना अतिशय सोयीस्करपणे त्यांची डेबिट व क्रेडिट कार्डे ऑनऑफकरता येतील.

 स्मार्टफोन अॅपचा वापर करून किंवा आर्टिफिशिअल इंटलिजन्स एनेबल्ड बॉट सेवांचा वापर करून व्हॉइस व चॅट यासाठी ही सेवा सुरू करून, ग्राहकांना इंटरनेट (ई-कॉमर्स), एटीएम, पीओएस टर्मिनल किंवा परकीय व्यवहार याद्वारे केल्या जाणाऱ्या पेमेंट कार्डांचे व्यवहार स्विच ‘ऑन’ व ‘ऑफ’ करता येऊ शकतात. कोणत्या व्यवहारांना परवानगी द्यायची व कोणत्या नाही, त्यानुसार ग्राहकांना रिअल-टाइममध्ये त्यांची कार्डे/नेटबँकिंग सेट करता येऊ शकते व त्यामुळे त्यांच्या पैशांचा वापर करू शकतील अशांवर त्यांना पूर्णतः नियंत्रण मिळवता येऊ शकते.

ग्राहकांना रिअल-टाइम पद्धतीने कार्डे व खाती यांची सद्यस्थिती तपासता येते, बॅलन्स तपासता येतो व अन्यही फायदे मिळवता येतात. स्मार्ट फोन युजर त्यांच्या बँकेच्या मोबाइल बँकिंग अॅपद्वारे प्रगत स्तरातील नियंत्रण मिळवू शकतात, तर नॉन-स्मार्ट फोन युजर एसएमएस व यूएसएसडी याद्वारे त्यांच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवू शकतात, जेणे करून सर्व ग्राहकांना संरक्षण देणे शक्य होते.

या वेळी बोलताना, अॅटम टेक्नालॉजिजचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवांग नरेला म्हणाले, आम्हाला ट्रॅनवॉलच्या मदतीने हे अत्यंत उपयुक्त तंत्रज्ञान भारतात दाखल करताना अतिशय आनंद होत आहे. घोटाळे रोखणारे हे नवे साधन एकीकडे ग्राहकांना त्यांच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम करते, तर दुसरीकडे ते बँकांना सुरक्षेसाठी व त्यांच्या जबाबदारीच्या रक्षणासाठी करावा लागणारा खर्च कमी करण्यासाठी मदत करते – त्यामुळे ग्राहक व बँका या दोन्हींच्या दृष्टीने ते फायदेशीर ठरते. विविध प्रदेशांतील अनेक बँकांमध्ये हे तंत्रज्ञान यशस्वीपणे राबवणारी ट्रॅनवॉल ही प्रवर्तक कंपनी आहे आणि आता तिने अॅटमच्या मदतीने भारतावर लक्ष केंद्रित केले आहे. भारतीय बाजाराविषयी अॅटमला असलेल्या सखोल आकलनामुळे हे उत्पादन भारतात लवकरच लोकप्रिय होईल, असा विश्वास आहे.

 अॅटम टेक्नालॉजिज ही देशातील एक आघाडीची डिजिटल पेमेंट सेवा देणारी कंपनी बँका, रिटेलर, शैक्षणिक संस्था, ई-कॉमर्स कंपन्या अशा विविध प्रकारच्या ग्राहकांबरोबर काम करते. या नव्या व्हाइट लेबल उत्पादनाद्वारे येत्या दोन तिमाहींमध्ये देशातील आघाडीच्या सर्व बँकांशी सहयोग करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

ट्रॅनवॉलचे सह-मुख्य कार्यकारी अदिकारी ग्रेग हेन्स म्हणाले, डिजिटल व्यवहार प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतातील सरकारने हाती घेतलेले फेसलेस, पेपरलेस व कॅशलेस अभियान आम्ही जाणतो. देशात 900 दशलक्ष पेमेंट कार्डांच्या वापराला चालना देण्याचेही सरकारचे उद्दिष्ट आहे. ग्राहकांना त्यांच्या आर्थिक बाबींचे नियंत्रण उपलब्ध करून आणि त्यांच्या पेमेंट कार्डांवरून किंवा खात्यांवरून कोणत्या व्यवहारांना परवानगी द्यायची व कोणत्या व्यवहारांना द्यायची नाही, हे ठरवण्याचे स्वातंत्र्य देऊन  आमच्या उत्पादनांनी अधिक सुरक्षितता देऊ केली आहे आणि ग्राहकांना नॉन-कॅश पेमेंट्सच्या बाबतीतील गरजेचा असलेला आत्मविश्वास निर्माण केला आहे आणि यामुळे पेमेंट करण्यासाठी कार्डांचा वापर वाढवण्याच्या दृष्टीने मदत होणार असल्याचे दिसून आले आहे. डिजिटल वैशिष्ट्ये सुरक्षितता व सोय देत असल्याने, मोबाइल बँकिंगच्या वैशिष्ट्यांच्या मदतीने ग्राहकांकडून मागणी वाढते आहे आणि डिजिटल पेमेंटचा अवलंब व वापर यांना चालना देण्याच्या भारत सरकारच्या प्राधान्याला सहकार्य करण्यासाठी आमची व्यवहारावर नियंत्रण देणारी सेवा अतिशय उपयुक्त आहे.

 अॅटम टेक्नालॉजिजविषयी

अॅटम टेक्नालॉजिज लि. ही मुंबईमध्ये मुख्यालय असलेली पेमेंट सर्व्हिस देणारी आघाडीची कंपनी असून तिचा भर ऑनलाइन व ऑफलाइन सुविधांद्वारे इंटरनेट, आयव्हीआर, मोबाइल व पॉइंट-ऑफ-सेलद्वारे एंड-टू-एंड पेमेंट सुविधा निर्माण करण्यावर आहे. सन 2006 मध्ये स्थापन झालेली कंपनी सध्या ई-टेल, रिटेल, सरकार, युटिलिटी, बीएफएसआय, डीटीएच, शिक्षण, मनोरंजन, प्रवास व पर्यटन, दूरसंचार अशा क्षेत्रांतील विविध ग्राहकांना सेवा देते. कंपनी आजपर्यंत 30,000 मर्चंटच्या मदतीने 3 अब्ज डॉलरहून अधिक मूल्याच्या 55 दशलक्षहून अधिक व्यवहारांवर प्रक्रिया करते.

 ट्रॅनवॉल लि.विषयी:

ट्रॅनवॉल लिमिटेड ही ऑस्ट्रेलियामध्ये मुख्यालय असलेली तंत्रज्ञान कंपनी असून, ती मध्य पूर्व, आफ्रिका व आशिया पॅसिफिक अशा विविध प्रदेशांत पेमेंट तंत्रज्ञान व सर्व्हिस यांचा विकास व वापर करण्यासाठी कार्यरत आहे. ग्राहकांचा सहभाग व त्यांच्याशी संवाद वाढवण्याची क्षमता, मोबाइल फोन व अन्य उपकरणांच्या मदतीने ग्राहकांची स्वयंसेवा, व्यवहारांवर नियंत्रण, सुरक्षा व सोय यामध्ये वाढ याद्वारे वित्तीय संस्थांना नावीन्य व स्पर्धेत टिकण्याची क्षमता यामार्फत मदत करण्याच्या दृष्टीने ट्रॅनवॉलच्या व्यवहार नियंत्रण सेवेची आखणी केली आहे. बँकांमध्ये ट्रॅनवॉलचे तंत्रज्ञान वापरल्याने जोखीम व कार्यपद्धती यासाठीचा खर्च कमी झाला आहे, ग्राहक टिकून ठेवण्यामध्ये व नवे ग्राहक मिळवण्यामध्ये वाढ झाली आहे .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जलतरण स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलचा डंका,एकूण १० कांस्य पदके जिंकली.

पुणे, ५ डिसेंबर ः नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या...

पार्क मेदी वर्ल्ड लिमिटेडची 920 कोटी रु. ची प्राथमिक समभाग विक्री 10 डिसेंबर पासून

      प्रत्येकी 2 रु. दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 154  रुपये ते 162  रुपये...

पुणेकर दीपाली अमृतकर-तांदळे ठरल्या’मिसेस गोल्ड हेरिटेज इंटरनॅशनल युनिव्हर्स’

पिंपरी-चिंचवडच्या दीपाली अमृतकर-तांदळे यांना'मिसेस गोल्ड हेरिटेज इंटरनॅशनल युनिव्हर्स' किताबसमृद्ध...