२०० अब्ज लिटर्स पाण्याची बचत, महाराष्ट्र व राजस्थानात कृत्रिम शेततळी निर्माण करून साध्य केली किमया

Date:

२२ वर्षीय तरुणीने जल संवर्धनातून शेकडोंच्या जीवनामध्ये फुलविली आनंदाची बहार

पुणे-महाराष्ट्र व राजस्थान मधील विविध जिल्ह्यांमध्ये जल संवर्धनाच्या साध्यासोप्या पद्धतींचा अवलंब करून २०० अब्ज लिटरपेक्षा जास्त पाण्याचे संवर्धन केले गेले आहे. यामुळे आता शेकडो शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना उपजीविकेचे अधिक चांगले पर्याय उपलब्ध झाले आहेत.  अवानाच्या सीईओ मैथिली अप्पलवार यांनी गरजूंच्या मदतीसाठी जल संवर्धनाच्या अनोख्या पारंपरिक पद्धतींचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला.

 एम्बी इंडस्ट्रीज लिमिटेडचे एक स्ट्रॅटेजिक बिजनेस युनिट ‘अवाना’ च्या संस्थापक मैथिली अप्पलवार यांनी भारतातील शेतकऱ्यांना भूक व गरिबी या संकटांमधून बाहेर काढण्यासाठी परवडण्याजोगे उपाय शोधण्याचा निर्णय घेतला.  जलसंचय, अवानाचे प्रमुख उत्पादन, जगातील सर्वात जास्त किफायतशीर,सर्वसमावेशक जल संवर्धन उपाययोजना आहे.  जलसंचय ही अतिशय सहजसोपी आणि तरीही अतिशय उत्तम व प्रभावी संकल्पना आहे.  यामध्ये शेतात एक मोठा खड्डा खोदला जातो व त्यावर एक पॉलिमर अस्तर घातले जाते.  खड्ड्याचे अशाप्रकारे अस्तरीकरण झाल्यामुळे पाणी जमिनीमध्ये मुरून जात नाही.  अशाप्रकारे हे एक कृत्रिम शेततळे तयार होते, ज्यामध्ये पावसाचे पाणी, नदीमधून वाहून येणारे अतिरिक्त पाणी जमा करून ठेवले जाते.  जलसंचयसाठी दरवर्षी १ पैसा प्रति लिटर या दराने खर्च येतो.  ही रक्कम पाणी साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या याच आकाराच्या काँक्रीट टॅन्कच्या खर्चाच्या फक्त १/१० भागाइतकीच आहे.  म्हणूनच अगदी गरीब शेतकरीदेखील याचा लाभ घेऊ शकतात.  या उपाययोजनेमध्ये पुढे वाढविण्याची अत्याधिक क्षमता आहे – ३ वर्षांहूनही कमी काळात अवानाने ५००० शेतकऱ्यांसोबत भागीदारीमध्ये २०० अब्ज लिटर पाण्याची बचत केली आहे.

महाराष्ट्रात अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, सोलापूर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर,जळगाव, बुलढाणा, धुळे, वाशिम, हिंगोली आणि नाशिक तसेच राजस्थानातील जैसलमेर, बीकानेर, चुरु,श्रीगंगानगर, हनुमानगढ, नागौर आणि भीलवाडा याठिकाणी मिळून २०० अब्ज लिटर पाण्याचे यशस्वीपणे संवर्धन करण्यात आले आहे.

अवानाच्या सीईओ मैथिली अप्पलवार यांनी सांगितले, कमी खर्चात मोठ्या प्रमाणावर यशस्वी होण्याची क्षमता असलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पना मला प्रभावित करतात.  मी असे मानते कीहे समजून घेणे महत्त्वाचे आहे कीप्रत्येकवेळी नवीन तंत्रज्ञानासाठी खूप मोठी गुंतवणूक करणे आवश्यक नसते.  गंभीर समस्या सर्वात प्रभावी पद्धतीने सोडविल्या जाणे गरजेचे आहे.  अवानामध्ये आम्ही नेहमीच परवडण्याजोग्या खर्चात सहजसोप्या उपाययोजना देण्याचा प्रयत्न करतो.  आमच्या उपाययोजनांमध्ये सामाजिक परिवर्तन सगळ्यात महत्त्वाचे आहेजे समाजात मोठ्या प्रमाणात घडवून आणले जाऊ शकते.”

त्यांनी पुढे असेही सांगितले, सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याची जी शक्ती युवापिढीमध्ये आहे ती मला नेहमीच प्रभावित करते.  भारतातील शेतकऱ्यांना सबळ व समृद्ध करणे हे माझे स्वप्न आहे.  मला वाटते कीसामाजिक बदल घडवून आणण्यासाठी युवाउत्साही लोकांनी मोठ्या संख्येने पुढे आले पाहिजे.”

२०१८ साली नीती आयोगाने सादर केलेल्या एका अहवालात असे नमूद केले आहे की, भारत आपल्या इतिहासातील आजवरच्या सर्वाधिक गंभीर जलसंकटाचा सामना करत आहे.  देशातील ६०% पेक्षा जास्त भाग दुष्काळी आहे व देशातील एक तृतियांशपेक्षा जास्त जिल्ह्यांनी गेल्या दशकात चारपेक्षा जास्त वेळा दुष्काळ सहन केला आहे.  पण सर्वात वाईट स्थिती भविष्यात निर्माण होणार आहे.  २०३० सालापर्यंत भारतात पाण्याची मागणी पाण्याच्या उपलब्ध पुरवठ्यापेक्षा दुपटीने वाढलेली असेल.

यावरून हे स्पष्टपणे दिसून येते की, शेतकऱ्यांनी पाण्याची बचत, संवर्धन आणि पाण्याच्या भूस्तरामध्ये पुन्हा पुन्हा भर घालत राहणे आवश्य आहे कारण त्यांची उपजीविका सर्वात जास्त पाण्यावर अवलंबून आहे.  परंतु काँक्रीट टँकसारख्या पारंपरिक जल संवर्धन उपाययोजना वापरणे हे बहुसंख्य भारतीय शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे.  या समस्येवर तोडगा सुचवण्यासाठी अनेक स्टार्ट-अप्स व स्वयंसेवी संस्था पुढे आल्या, त्यामध्ये २२ वर्षीय मैथिली अप्पलवार देखील होत्या.  या जॉर्जिया टेक इंजिनिअर भारतात परतल्या त्या एक विचार आणि प्रेरणा घेऊन की, भारतातील पाणी समस्येवर सहजसोपा उपाय केला जाऊ शकतो.

मैथिली अप्पलवार यांनी जल संसाधन मंत्रालयाने नुकत्याच आयोजित केलेल्या एका सेमिनारमध्ये भाग घेतला होता.  या कार्यक्रमातील त्या सर्वात कमी वयाच्या वक्त्या होत्या.  त्यांनी यावेळी सांगितले की,कशाप्रकारे टेक्निकल टेक्स्टाईल्सचा उपयोग भारतातील शेतीसाठी सहजसोप्या, पुढे वाढवता येण्याजोग्या उपाययोजना बनवण्यासाठी केला जाऊ शकतो.

अवाना

एम्बीच्या रिटेल उपक्रमाच्या एका विशेष डिव्हिजनच्या रूपाने अवानाची सुरुवात झाली.  संपूर्ण जगभरातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला अनिश्चिततेपासून वाचविणे हा अवानाचा उद्देश आहे.  जेन झेड व मिलेनियल्सची बुद्धिमत्ता, कौशल्ये यांना कंपनीकडे आकर्षित करण्यासाठी नावीन्यावर लक्ष केंद्रित करणारे आधुनिक कार्यस्थळ निर्माण करणे हे या डिव्हिजनचे प्रमुख काम आहे.  गेल्या दोन वर्षात अवानाने संपूर्ण भारतात ५००४ तलाव बनवले, ज्यामध्ये २०० अब्ज पाणी साठवले गेले आणि जवळपास ३०,००० लोकांच्या जीवनावर त्याचा सकारात्मक प्रभाव पडत आहे.  या उपक्रमामुळे गेल्या दोन वर्षात १०,००० हेक्टरपेक्षाही जास्त भागात पिकांच्या सिंचनात मदत मिळाली आहे.

एम्बी इंडस्ट्रीज लिमिटेड

एम्बी इंडस्ट्रीज लिमिटेड (आधीची एम्बी पोलियर्न्स लिमिटेड) ही वुवन पॉलीथीन व पॉलिप्रॉपेलिन उत्पादने बनवणाऱ्या सर्वाधिक आघाडीच्या ब्रॅंड्सपैकी एक कंपनी आहे.  ही कंपनी एफआयबीसी (फ्लेक्सिबल इंटर्मीडिएट बल्क कंटेनर्स) आणि वुवन सॅक्स व कंटेनर लायनर्स, प्रोटेक्टिव्ह इरिगेशन सिस्टीम, कॅनॉल लायनर्स, फ्लॅक्सी टँक्स व कार कव्हर्स यासारख्या विविध पॉलिमर आधारित उत्पादनांची निर्मिती व विक्रीमध्ये कार्यरत आहे.  पहिल्या पिढीचे उद्योजक श्री. मकरंद अप्पलवार व श्रीमती रिंकू अप्पलवार यांनी नोव्हेंबर १९९४ मध्ये ही कंपनी स्थापन केली.

सुरुवातीपासून आजपर्यंत एम्बीने आपल्या क्षमता व प्रभाव वाढवत वुवन पॉलिमर उत्पादनांच्या क्षेत्रात आघाडीची कंपनी म्हणून ओळख निर्माण केली आहे.  जगभरातील प्रतिष्ठित ग्राहक एम्बीच्या उत्पादनांचा लाभ घेत आहेत.  या कंपनीला अनेक पुरस्कारांनी सम्मानित करण्यात आले आहे.  एम्बीची उत्पादन सुविधा गुजरातमधील सिल्वासा येथे आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जर्मनीतील शिक्षणा करीता मार्गदर्शन

पुणे, १३ मार्च २५ - सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल...

एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

पुणे दि. १३: समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती...

बंदिशींद्वारे भारतीय स्त्री शक्तीचा सन्मान

भक्तिसुधा फाऊंडेशनच्या वतीने उर्जा' : सन्मान भारतीय स्त्री आदर्शांचा...