Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सिग्ना टीटीके हेल्थ इन्शुरन्सने मणिपालसिग्ना हेल्थ इन्शुरन्स असे केले कंपनीचे नामकरण

Date:

मुंबई  – सिग्ना टीटीके हेल्थ इन्शुरन्स या अमेरिकेतील जागतिक आरोग्यसेवा कंपनी सिग्ना कॉर्पोरेशन (NYSE:CI) आणि भारतातील समूह टीटीके समूह व मणिपाल समूह यांची संयुक्त भागीदारी असणाऱ्या कंपनीने आवश्यक त्या सर्व मंजुरी मिळाल्यानंतर, आपले नामकरण मणिपालसिग्ना हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड असे केले आहे. नव्या संरचनेनुसार, सिग्ना कॉर्पोरेशनचा हिस्सा 49 टक्के कायम राहणार आहे, तर मणिपाल समूहाचा हिस्सा 51 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे व टीटीके समूहाने इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडियाकडून (“आयआरडीएआय”) आवश्यक ती नियामक मंजुरी मिळाल्यावर या संयुक्त भागीदारीतून बाहेर पडण्याचे ठरवले आहे.

नावातील बदलाप्रमाणेच, कंपनीने नवी कॉर्पोरेट ओळखही अवलंबली आहे. त्यामध्ये नव्या लोगोचा व या वेबसाइटचा समावेश असून, ही माहिती www.manipalcigna.com येथे मिळेल. बदल तातडीने लागू होतील आणि भविष्यातील सर्व व्यवसाय कंपनीच्या नव्या नावाअंतर्गत केले जातील.

सिग्ना इंटरनॅशनल मार्केट्सचे अध्यक्ष जेसन सॅडलर यांनी सांगितले, “भारतातील विमा क्षेत्रामध्ये वाढीची प्रचंड क्षमता आहे – हे क्षेत्र झपाट्याने विकसित होत आहे, आणि सिग्नासाठी ही महत्त्वाची बाजारपेठ आहे. गेल्या पाच वर्षांत, आम्ही या वाढत्या बाजारपेठेत लक्षणीय प्रगती केली. भारतातील आमचे स्थान सक्षम होण्यासाठी टीटीके समूहाने बजावलेली भूमिका उल्लेखनीय आहे. मणिपाल समूहाबरोबरच्या आमच्या नव्या संयुक्त भागीदारीमुळे आम्हाला आता सध्याचे नाते अधिक सक्षम करता येईल, नव्या बाजारांचा वेध घेता येईल आणि आमचे ग्राहक, कर्मचारी, क्लाएंट व भागीदार यांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी नावीन्यपूर्ण क्षमता व सेवांना चालना देता येईल.”

मणिपाल एज्यु अँड मेडिकल ग्रुपचे अध्यक्ष डॉ. रंजन पै यांनी सांगितले, “मणिपाल समूहाचे एकात्मिक आरोग्यसेवा कौशल्य व मल्टि-स्पेशालिटी रुग्णालयांचे जाळे आणि सिग्नाचे आरोग्य व वेलनेस यातील जागतिक कौशल्य यांची सांगड घातली गेल्याने मणिपालसिग्ना हेल्थ इन्शुरन्स कंपनीला भारतातील लोकांना खऱ्या अर्थाने वैविध्यपूर्ण सेवा देणे शक्य होणार आहे. दोन्ही कंपन्या एकमेकांना साजेशा आहेत आणि दोन्ही कंपन्यांच्या क्षमता एकत्र केल्यास आम्हाला भारतातील लोकांना सहजपणे व आयुष्यभर दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करता येणार आहेत. तसेच, भविष्यातील वाढीसाठी मार्ग आखता येणार आहे.”

ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मणिपाल समूहाकडे वैविध्यपूर्ण व प्रस्थापित बिझनेस मॉडेल आहे. यामध्ये जागतिक दर्जाची रुग्णालये बांधणे, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा प्रक्रियांना चालना देणे व शैक्षणिक संस्थांद्वारे सर्वोत्तम वैद्यकीय फॅकल्टी जोपासणे, यांचा समावेश आहे. 200 वर्षांहून अधिक अनुभव असणारी सिग्ना कॉर्पोरेशन 30 देशांत व कार्यकक्षांमध्ये कार्यरत आहे आणि जगभर 16 कोटींहून अधिक ग्राहक आहेत.  कंपनीने भागीदारीच्या अनुषंगाने, तसेच भारतात आरोग्यसेवांची उपलब्धता व आरोग्यसेवा फायनान्सिंग यातील तफावत भरून काढण्याच्या दृष्टीने नवे नाव स्वीकारले आहे.

 मणिपालसिग्ना हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसुन सिकदर यांनी सांगितले, “आमच्या कंपनीचे नाव बदलले असले तरी कंपनीचे मूलभूत घटक तसेच कायम राहणार आहेत. आम्ही ज्या ग्राहकांना सेवा देतो त्यांचे आरोग्य, कल्याण व मनःशांती यामध्ये वाढ करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मणिपाल समूहाबरोबरच्या या नव्या संयुक्त भागीदारीमुळे आम्हाला स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्याच्या हेतूने ग्राहकांना दर्जेदार अनुभव देण्यासाठी व भारतातील लाखो ग्राहकांना उत्कृष्ट आरोग्यसेवा देण्याच्या हेतूने विस्तार करण्यासाठी मदत होणार आहे.”

रिब्रँडिंग व नावातील बदल यामुळे कंपनीचे सध्याचे बिझनेस मॉडेल, एजंट, बँकाश्युरन्स भागीदारी किंवा ग्राहकांच्या सध्याच्या हेल्थ इन्शुरन्स योजना यावर परिणाम होणार नाही. कंपनीचे व्यवस्थापन व कर्मचारीवर्ग कायम राहणार आहे.

मणिपालसिग्ना हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडविषयी

मणिपालसिग्ना हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (पूर्वीचे नाव सिग्नाटीटीके  हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड) ही भारतीय समूह टीटीके समूह, भारतातील आरोग्यसेवा व उच्च शिक्षण क्षेत्रातील आघाडीचा मणिपाल समूह आणि 200 वर्षांहून अधिक अनुभव असणारी जागतिक आरोग्य सेवा कंपनी सिग्ना कॉर्पोरेशन यांची संयुक्त भागीदारी कंपनी आहे. मणिपालसिग्नाचे मुख्यालय मुंबई येथे आहे आणि महत्त्वाच्या शहरांत व महानगरांत 28 हून अधिक शाखा आहेत. कंपनीने 20,000 हून अधिक एजंट, 250+ प्रमुख ब्रोकर यांचे जाळे निर्माण केले आहे आणि या वितरण जाळ्याद्वारे कंपनी देशभरातील 7,000 हून अधिक पॉइंट ऑफ सेल्स ठिकाणी कार्यरत आहे. मणिपालसिग्नाने हेल्थ इन्शुरन्स उत्पादनांच्या विक्रीसाठी 17 आघाडीच्या बँका, एनबीएफसी व एमएफआय यांच्याशी सहयोगही केला आहे आणि कंपनीकडे भारतातील टिअर 2 व 3 शहरांत 6500 हून अधिक विश्वासार्ह रुग्णालयांचे जाळे आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज आहे – प्रशांत जगताप

पुणे- होणार… होणार.. म्हणता म्हणता पुणे महानगरपालिकेची निवडणूक अखेर...

महायुतीतून पुण्या पिंपरीत अजितदादा कशासाठी बाहेर ? मविआला धोबीपछाड करण्यासाठी ?

पुणे- महापालिका निवडणुका जाहीर होताच आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र...

पुणे महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या समन्वय समिती प्रमुखपदी रमेश बागवे

पुणे- येथील महानगरपालिका निवडणुकीसाठी समन्वय समिती गठीत...

इनव्हेलियर इंडिया व राष्ट्रवादी कामगार युनियनमध्ये वेतन करार

पुणे — रांजणगाव येथील इनव्हेलियर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि...