कोची येथे रंगला महिंद्रा थार मालकांचा सर्वात मोठा मेळावा

Date:

मुंबई: महिंद्रा अँड महिंद्रा लि.ने (एमअँडएम) 10 मार्च 2019 रोजी कोची येथे थार फेस्टच्या तिसऱ्या आवृत्तीचा समारोप केला. महिंद्रा अॅडव्हेंचर ‘क्लब चॅलेंजच्या चौथ्या आवृत्तीमुळे थार फेस्टचा उत्साह आणखी वाढला. त्यामध्ये, ऑफ-रोडिंगमध्ये बाजी मारण्यासाठी देशभरातील आघाडीचे 11 ऑफ-रोडिंग क्लबनी चुरस दिली.

वैशिष्ट्यपूर्ण ‘थार’ ब्रँड साजरा करत असताना, ऑफ-रोडिंग समुदाय व 4 X 4 प्रेमी यांच्यातील  नातेही साजरे करणे, हे थार फेस्टचे उद्दिष्ट होते. दिवसभराच्या फेस्टिवलमध्ये, थरारक ऑफ-रोडिंग उपक्रम आणि थारशी संबंधित उपक्रम उपस्थितांना खिळवून ठेवले. प्रेक्षकांनी थार परेड, 4*4 एक्स्पिरिअन्स झोन, हेरिटेज महिंद्रा डिस्प्ले, कस्टमाइज्ड व्हेइकल डिस्प्ले व लाइव्ह म्युझिक परफॉर्मन्स अशा अन्य उपक्रमांचाही आनंद घेतला.

भारतभरातील 11 ऑफ-रोडिंग क्लबमधील सहभागींनी भारतातील बेस्ट ऑफरोडिंग क्लब हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जिंकण्यासाठी क्लब चॅलेंजमध्ये एकमेकांना चुरस दिली. परंतु, यातील अडथळ्यांमध्ये वैयक्तिक कामगिरीपेक्षा सांघिक कामगिरीवर अधिक भर देण्यात आला. मार्च 9, 2019 रोजी, सायंकाळी 6:30 वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत नाइट स्टेजने क्लब चॅलेंजची सुरुवात झाली. पुढील दिवशी, मार्च 10, 2019 रोजी सकाळी 10:00 ते सायंकाळी 6:00 या वेळेत डे स्टेज झाले.

काही अडथळे म्हणजे लोकप्रिय ‘डिमॉलिशन डर्बी होते. या उपक्रमात, ऑफ-रोडिंग वाहनांना जंक व्हेइकलच्या ढिगावरून मार्ग शोधायचा होता. आणखी एक मोठा अडथळा म्हणजे ‘पास बॅटन, यामध्ये सर्व श्रेणीतील वाहनांना रिले स्वरूपात गाडी चालवायची असते व बॅटन एका वाहनाकडून दुसऱ्या वाहनाकडे द्यायची असते व फिनिश लाइनपर्यंत पोहोचायचे असते.

दोन दिवस संघर्ष केल्यावर व 8 अडथळ्यांचा सामना केल्यावर, एकंदर विजेत्याचा चषक कन्नुर रायडर्स अँड ऑफरोडर्स क्लब (केआरओसी) यांना देण्यात आला. पहिले रनर-अप बक्षीस बेंगळुरू ऑफरोड ड्रायव्हर्स असोसिएशनने (बीओडीए) जिंकले, तर नॉर्दन इंडिया ऑफरोड क्लबने (एनआयओसी) दुसरे रनर-अप बक्षीस जिंकले. केआरओसी, बीओडीएबीओडीए यांव्यतिरिक्त, यंदा टीम इजमसा, एक्स्ट्रीम रायडर्स मोटरस्पोर्ट्स क्लब ऑफ मेघालय, केरळ अॅडव्हेंचर स्पोर्ट्स क्लब, आरअँडटी ऑटोकॅटलिस्ट, केटीएम जीपर्स आणि टीम फ्लायव्हील हे क्लब सहभागी झाले होते.

महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या ऑटो डिव्हिजनच्या सेल्स मार्केटिंगचे प्रमुख वीजय नाकरा यांच्या मते, “महिंद्रा थार हा वैशिष्ट्यपूर्ण ब्रँड आहे आणि ऑटोप्रेमींच्या मनात व ऑफ-रोडिंग क्षेत्रामध्ये त्याचे अतिशय खास स्थान आहे. हा महिंद्राच्या परंपरेचाच एक भाग आहे आणि त्यातून कंपनीच्या दणकट व राकट, कोठेही जाता येण्याच्या क्षमता अधोरेखित होतात. क्लब चॅलेंज थार फेस्ट याद्वारे आम्हाला ऑफ-रोडिंगप्रेमींमध्ये दिसणारी पॅशन पाहून आनंद वाटतो. अगोदरच्या वर्षांप्रमाणे, या वर्षीही थार फेस्टमध्ये अनेक 4×4 चाहते एकत्र आले आणि त्यांनी महिंद्रा वाहनांचा दणकट व राकट डीएनए साजरा केला. तसेच, क्लब चॅलेंजमध्ये, वैविध्यपूर्ण ऑफ-रोडिंग क्लबनी आव्हानात्मक भूभागावरून प्रवास करत, अवघड अडथळे पार करत, “बेस्ट ऑफ-रोडिंग क्लब” हा पुरस्कार मिळवण्यासाठी चुरस दिली.”

थार CRDe विषयी

2010 मध्ये दाखल करण्यात आलेली थार CRDe स्टायलिश ऑफ-रोडर आहे, महिंद्राच्या MM 540ची सुधारित आवृत्ती आहे. 2015 मध्ये, कंपनीने या श्रेणीतील सर्वोत्तम वैशिष्ट्ये समाविष्ट करत नवी थार CRDe दाखल केली – ऑटो एंगेजिंग डिफरन्शिअल लॉक. उत्कृष्ट ऑफ-रोडर असणारी नवी थार कोणत्याही भूप्रदेशामध्ये चालवता येऊ शकते आणि अन्य मॉडेलच्या तुलनेत या वाहनात महिंद्राचा दणकट व राकट डीएनए अधिक उठून दिसतो. आज, हे सर्वात पसंतीचे मनोरंजनपर 4×4 वाहन आहे. थार हा महिंद्रा अॅडव्हेंचर ऑफ-रोडिंग उपक्रमांचा गाभा आहे आणि इगतपुरी व मंगलोर येथे असणाऱ्या भारतातील ऑफ-रोड प्रशिक्षण अकादमींतील प्रशिक्षणाचे प्रमुख वाहन आहे.

गेल्या काही वर्षांत, भारतातील लाइफस्टाइल व्हेइल श्रेणीला आकार देण्यामध्ये लक्षणीय भूमिका बजावली आहे. त्यातील शक्तिशाली CRDe इंजिन ताकद व इकॉनॉमी दोन्ही देते. केबिनमध्ये सहा जण बसू शकतात, तर मागील दोन आसने फोल्ड करून ठेवू शकतात, जेणे करून सामानासाठी मोठी जागा उपलब्ध होईल.

हे वाहन BS IV प्रकारात उपलब्ध असून त्यामध्ये पॉवर स्टीअरिंगचा समावेश असल्याने वाहन आरामदायीपणे चालवता येऊ शकते. अस्सल अॅक्सेसरीज व कस्टमायझेशन पर्यायही उपलब्ध आहेत.

महिंद्रा अॅडव्हेंचरविषयी

महिंद्रा वाहनांतील दणकट व राकट डीएनए दाखवणयासाठीची खास संकल्पना असलेला, महिंद्रा अॅडव्हेंचर अम्ब्रेला ब्रँड म्हणून कार्यरत आहे आणि या ब्रँडअंतर्गत विविध साहसी व मोटरस्पोर्ट्स कार्यक्रम आयोजित केले जातात. सर्व साहसी उपक्रमांसाठी स्वतंत्र एंटीटी म्हणून, 2011 मध्ये अॅडव्हेंचर अॅक्टिविटीज चीफ विजय कुमार वाय. यांच्या नेतृत्वाखाली महिंद्रा अॅडव्हेंचरची निर्मिती करण्यात आली. विजय कुमार वाय. मोटरिंगप्रेमी आहेत आणि लोकप्रिय मोटरिंग मासिकाचे माजी संपादक आहेत.

महिंद्रा अॅडव्हेंचर कॅलेंडरमध्ये वर्षभरातील विविध प्रायोगिक मार्केटिंग कार्यक्रमांचा समावेश असतो – जसे की, लोकप्रिय ऑफ-रोडिंग कार्यक्रम ग्रेट एस्केप, विविध आव्हाने (आव्हाने सादर करण्याच्या कंपनीच्या आश्वासनानुसार स्पोर्टिंग उपक्रम), मल्टि-डे स्पेशल एस्केप – मॉनेस्ट्री एस्केप (10 दिवस), ट्रायनेशन एस्केप (10 दिवस), वन लॅप ऑफ इराण (9 दिवस), ऑथेंटिक मस्तंग (10 दिवस), हिमालयीन स्पिती एस्केप (10 दिवस), द स्नो एस्केप (7 दिवस) आणि समिट – एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत ड्राइव्ह (14 दिवस).

ऑफ-रोडिंगचा प्रसार करण्यासाठी, महिंद्रा अॅडव्हेंचरने मंगलोर येथे महिंद्रा अॅडव्हेंचर ऑफ-रोड ट्रेनिंग अकॅडमी सुरू केली आहे. इगतपुरीमध्ये सुरू केलेल्या पहिल्या महिंद्रा अॅडव्हेंचर ऑफ-रोड ट्रेनिंग अकॅडमीनंतरची ही दुसरी अकॅडमी आहे.

महिंद्रा अॅडव्हेंचर ऑफ-रोड ट्रेनिंग अकॅडमी 28 एकर क्षेत्रात विस्तारली आहे आणि महिंद्रा 4डब्लूडी वाहनांविषयी व ऑफ-रोडिंगविषयी सर्व शिकून घेण्यासाठीचे भारतातील पहिले व एकमेव ठिकाण आहे. यामार्फत, आम्ही कंपनीच्या ऑफ-रोड परंपरेचा लाभ घेऊ शकू, तसेच वाहनांच्या क्षमता दर्शवू शकू व वाहनांचा संपूर्णतः वापर करण्यासाठी सहभागींना आत्मविश्वास देऊ शकू. या प्रकल्पात प्रशिक्षणासाठी आवश्यक वाहने म्हणून महिंद्रा थारच्या ताफ्याचा विशेष करून वापर केला जातो. टीम महिंद्रा अॅडव्हेंचर निर्मितीपासून, रॅलीसाठी सज्ज सुपर XUV500 याद्वारे मोटरस्पोर्ट क्षेत्र गाजवत आहे. महिंद्राच्या चीत्यापासून प्रेरित XUV500 ने इंडियन नॅशनल रॅली चॅम्पिअनशिप (आयएनआरसी) 2017 मध्ये एकंदर चॅम्पिअनशिप जिंकली आहे.

महिंद्राविषयी

20.7 अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या या कंपन्यांच्या समूहाचा नेहमीच प्रयत्न असतो की, ग्रामीण भागात भरभराट झाली पाहिजे, शहरातील जीवनशैली सुधारली पाहिजे आणि व्यवसायाची कार्यक्षमता वाढली पाहिजे. त्यामुळे लोकांना चालना मिळून त्यांचा विकास होईल. समूह भारतात युटिलिटी व्हेइकल्स, माहिती तंत्रज्ञान, वित्तीय सेवा व व्हेकेशन ओनरशिप यामध्ये आघाडीच्या स्थानी आहे व व्हॉल्युमच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपनी आहे. कृषिव्यवसाय, एअरोस्पेस, कम्पोनंट्स, सल्ला सेवा, संरक्षण, ऊर्जा, औद्योगिक उपकरणे, लॉजिस्टिक्स, रिअल इस्टेट, स्टील, रिटेल, व्यावसायिक वाहने व दुचाकी व्यवसायांतही अग्रेसर आहे. मुंबईत मुख्यालय असलेल्या महिंद्रामध्ये 100 देशांत अंदाजे 240,000 कर्मचारी आहेत

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...