पुणे-भारतात पहिल्यांदाच, तनिष्क या दागिन्यांच्या सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक लोकप्रिय ब्रॅंडने आणली आहे एक अशी योजना जी सोनेप्रेमींसाठी खरोखरच सुवर्णसंधी आहे. २२कॅरेट शुद्धतेच्या जुन्या सोन्याच्या मोबदल्यात नवीन सोने,तेही शून्य टक्के घट काढून, आणि प्रत्येक १०ग्रॅम सोन्याच्या बदल्यात*(अटी लागू) मिळवा रू.३३६० पर्यंत जास्त. ही योजना तनिष्कच्या सर्व शोरूम्समध्ये उपलब्ध आहे आणि अत्यंत योग्य वेळी जाहीर झाली आहे, जेव्हा ग्राहक सणासुदीसाठी आणि इतर शुभकार्यांच्या निमित्ताने सोने खरेदी करतात. तनिष्कबरोबरच्या सोन्याच्या व्यवहारातले फायदे खालीलप्रमाणे:
तनिष्कबरोबर जुन्या सोन्याची अदलाबदल करण्यात तुमचे ५ फायदे आहेत:
- अत्यंत अद्ययावत अशा कॅरेटमीटरवर तुमच्या सोन्याची शुद्धता तपासली जाते.
- तनिष्कचा सोने खरेदी भाव त्यांच्या विक्रीच्या भावाइतकाच असतो.
- तनिष्कमध्ये तुमचे सोने तुमच्या समोर वितळवून त्याचे वजन केले जाते.
- कुठलेही जुने दागिने येथे विकले जात नाहीत. ते वितळवून त्यांचे नवे दागिने घडवले जातात.
- तुम्हाला खड्यांची किंमत सोन्याच्या भावात कधीच द्यावी लागत नाही.
दीपिका सभरवाल तिवारी, सहकारी उपाध्यक्ष, मार्केटिंग, ज्वेलरी विभाग, टायटन कंपनी लिमिटेड, या योजनेविषयी त्यांचे विचार मांडताना म्हणाल्या “तनिष्कचा तत्वनिष्ठ आणि चोख व्यवहार ग्राहकांना गेली वर्षानुवर्षे संतुष्ट करत आला आहे. ही योजना म्हणजे या विश्वासाचेच फलित आहे. या योजनेद्वारे चोख व्यवहार तर होतोच पण ग्राहकांच्या आवडीनिवडीचाही मान राखला जातो. योजनाबद्ध आणि पूर्वनियोजितसोने खरेदीसाठी ओळखले जाणारे भारतीय ग्राहक या योजनेद्वारे त्यांच्या जुन्या सोन्याच्या बदल्यात नवे दागिने नक्कीच घेतील.
तनिष्कविषयी:
तनिष्क या टाटा समूहाच्या सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक लोकप्रिय दागिन्यांच्याब्रॅंडने त्यांच्या अद्वितीय कारागिरीमुळे, खास डिझाइन्समुळे आणि चोख व्यवहारामुळे गेल्या दोन दशकांमध्ये ग्राहकांच्या मनात आदराचे स्थान मिळवले आहे. भारतीय स्त्रीचे अंतरंग समजून घेणारा आणि तिला तिच्या आवडीप्रमाणे कधी परंपरागत तर कधी आजच्या युगाचे दागिने पुरवणारा एकमेव ब्रॅंडम्हणूनतनिष्क प्रसिद्ध आहे. याच लौकिकाला साजेसा ‘ भारतातलासर्वाधिक विश्वासार्ह दागिनेब्रॅंड’ हा पुरस्कार तनिष्कला‘ट्रस्ट रिसर्चऍडव्हायजरी’ यांच्यातर्फे २०१७मध्ये मिळाला आहे. त्यांच्या याच लौकिकाला अधोरेखित करणारी तनिष्क शोरूम्स अद्ययावत अशाकॅरेटमीटरने सुसज्ज आहेत. यामुळे ग्राहकांना त्यांच्या सोन्याची शुद्धता सर्वाधिक खात्रीलायक पद्धतीने पडताळता येते.सोनेआणि हिऱ्यांच्या ५००० हुन जास्त डिझाइन्सचे भारतीय, पाश्चात्य आणि या दोन्हींचा मेळ घालणारे दागिने तनिष्क तुम्हाला पुरवतात. त्यांचेअद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा कारखान्यांमध्ये तयार झालेले दागिने म्हणजे कलेचा सर्वोच्च अविष्कार असतात. तनिष्कच्या रिटेल साखळीत१२१ शहरांमधल्या २१० खास शोरूम्स आणि बुटीक्स गुंफलेल्या आहेत.