कोची ब्लू स्पायकर्स आणि यू मुम्बा व्हॉली यांच्यातील सामन्याद्वारे रुपे प्रो व्हॉलीबॉल लीगचा प्रारंभ

Date:

मुंबई  – नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे प्रमुख उत्पादन असलेल्या रुपेने भारतातील नवा फ्रँचाईझी आधारित स्पोर्ट्स लीग – प्रो व्हॉलीबॉल लीगच्या शीर्षक प्रायोजकत्वाचे हक्क संपादन केले असून ही लीग २ फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे भारतातील सर्व बँका आणि आर्थिक संस्थांना देशांतर्गत कार्ड पेमेंट यंत्रणा उभारून देण्याचा विचार पूर्णत्वाला नेण्यासाठी स्थापन करण्यात आलेली रुपे सहा वेगळ्या शहरांत होत असलेल्या सहा फ्रँचाईझीच्या या लीगची शीर्षक प्रायोजक असेल.

 बेसलाइन व्हेंचर्स आणि व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांचा उपक्रम असलेली ही लीग आता पहिल्या सीझनमध्ये रुपे प्रो व्हॉलीबॉल लीग या नावाने ओळखली जाईल. या सहकार्याविषयी आनंद व्यक्त करत एनपीसीआयच्या विपणन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. कुणाल कलावातिया म्हणाले, ‘रुपे हे ६० कोटी भारतीयांसाठी पसंतीचे कार्ड आहे आणि ११०० बँक्स आज रुपे कार्ढचे वितरण करतात. व्हॉलीबॉल हा उत्तम सांघिक खेळ आहे आणि देशभरात सर्वत्र खेळला जातो. ज्याप्रमाणे रुपे डिजिटल पेमेंट उपक्रम सक्षम करत आहे, त्याप्रमाणे प्रो व्हॉलीबॉल लीग हा खेळ पुढे आणि देशाला समान खेळभावनेसह जोडेल असे आम्हाला वाटते. रुपे प्रो व्हॉलीबॉल लीगसह आम्हाला तरुण आणि निरोगी भारताची ताकद साजरी करायची आहे.’

या घडामोडीविषयी तुहिन मिश्रा, सह- संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक, बेसलाइन व्हेंचर्स म्हणाले, ‘शीर्षक प्रायोजक म्हणून रुपेचे सहकार्य मिळाल्याने आम्ही आनंदित झालो आहोत. वेगवान, थरारक आणि आपल्या तरुण व दमदार देशाला साजेशा खेळामध्ये रुपेने गुंतवणूक केल्याचे पाहाणे आश्वासक आहे. ज्याप्रमाणे रुपे डिजिटल भारताची क्रांती घडवून आणत आहे, त्याप्रमाणे प्रो व्हॉलीबॉल लीगद्वारे व्हॉलीबॉल क्रांती घडवण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रयत्नांत मदत करण्यासाठी रुपेइतका चांगला जोडीदार मिळाला नसता.  ’

रुपेचे स्वागत करत भारताचे पूर्वीचे आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सध्याचे सचिव श्री. रामावतार सिंग जाखर म्हणाले, ‘पीव्हीएलच्या संघात आम्ही रुपेचे मनापासून स्वागत करत आहोत. असा प्रतिष्ठित आणि देशाचा अभिमान असलेला ब्रँड व्हॉलीबॉलसारख्या तळागाळातील खेळाडूंच्या आवडत्या खेळाला पाठिंबा देत असल्याचे पाहाणे भारावणारे आहे. आमचे सहकार्य दमदार असेल याची खात्री वाटते.’

लीगची उद्घाटनपर आवृत्ती दोन फेब्रुवारी रोजी राजीव गांधी मैदान, कोची येथे कोची ब्लू स्पायकर्स आणि यू मुम्बा व्हॉली यांच्यातील सामन्याद्वारे होईल. नोव्हेंबर २०१८ मध्ये जाहीर करण्यात आलेले सहा संघ पहिल्या सीझनमध्ये राउंड रॉबिन फॉरमॅटमध्ये एकमेकांविरोधात खेळणार असून यात एकूण १८ सामने होणार आहेत. अहमदाबाद डिफेंडर्सची मालकी बॉनहोमी स्पोर्ट्स इव्हेंट्स मॅनेजमेंट लि.,कडे आहे, तर केरला कालीकत हिरोची मालकी बीकन स्पोर्ट्सकडे आणि चेन्नई स्पार्टन्सची मालकी चेन्नई स्पार्टन्स प्रा. लि. कडे आहे. यू मुम्बा व्हॉलीची मालकी यू स्पोर्ट्सकडे असून कबड्डी लीगमधील एक संघही त्यांच्या मालकीचा आहे. ब्लॅक हॉक्स हैद्राबादची मालकी अजाइल एंटरटेनमेंट प्रा. लि.कडे आणि कोची ब्लू स्पायकर्स नावाने ओळखल्या जाणाऱ्या कोची फ्रंचाईझीची मालकी थॉमस मुथ्थुटकडे आहे. दोन फेब्रुवारीपासून सुरू होत असलेले सर्व सामने सोनी सिक्स आणि सोनी टेन ३ वर थेट प्रसारित होणार असून सोनी लिव्हवरही ते लाइव्ह स्ट्रीम केले जातील.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

केंद्रीय  अर्थसंकल्प लोकाभिमुख, विकासाभिमुख व प्रगतीशीलअर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताचा पाया – प्रकाश जावडेकर

पुणे-‘यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकाभिमुख असून देशाला वेगाने पंतप्रधान...

राहुल गांधींना लोकसभेत बोलू न देणे मोदी सरकारची हुकूमशाही, चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, बिश्नोई गँग,...