- अधिक क्षमतेचा मोफत रॅम व अप्लिकेशन्सचा कमी केलेला आकार यामुळे या किमतीच्या अन्य स्मार्टफोनच्या तुलनेत 50 टक्क्यांपर्यंत जलद काम करण्याची क्षमता
- यूट्युब गोसारख्या गुगल अप्सचा अगोदर समावेश केल्याने ग्राहकांना डेटा वापरावर नियंत्रण ठेवत, व्हीडिओ डाउनलोड करणे, पाहणे व शेअर करणे शक्य
- रिअर व फ्रंट कॅमेऱ्यामध्ये बोकेह मोड
- दणकट व ओरखड्यांपासून सुरक्षित कॉर्निंग गोरिला ग्लास
- 2 वर्षांची वॉरंटी
नवी दिल्ली: लाव्हा इंटरनॅशनल लिमिटेड या मोबाइल हँडसेट क्षेत्रातील आघाडीच्या भारतीय बहुराष्ट्रीय कंपनीने अँड्रॉइड ओरिओवर चालणाऱ्या पहिल्या काही स्मार्टफोनपैकी लाव्हा झेड50 दाखल केल्याची घोषणा आज केली (गो एडिशन). प्रामुख्याने पहिल्यांदा स्मार्टफोन वापरणाऱ्यांना उत्तम अनुभव मिळावा या दृष्टीने झेड50 तयार केला आहे. हा स्मार्टफोन मार्च 2018च्या मध्यापासून अंदाजे 100,000 रिटेल स्टोअर्समध्ये ब्लॅक व गोल्ड या दोन रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे.
डिझाइन ते उत्पादन अशा संपूर्ण साखळीवर कंपनीचे पूर्णतः नियंत्रण असून त्यातूनच लाव्हा 2 सीरिजमध्ये उठून दिसणाऱ्या झेड50ची निर्मिती झाली आहे. पहिल्यांदा स्मार्टफोन वापरणाऱ्यांचा विचार करून त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने हा स्मार्टफोन तयार करण्यात आला आहे व त्याला अँड्रॉइड ओरिओचे (गो एडिशन) पाठबळ आहे. ग्राहकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी लाव्हा झेड50 सुसज्ज आहे – डाउनलोड करण्यासाठी व अप्लिकेशन स्टोअर करण्यासाठी कमी जागा, मोबाइल अप्लिकेशन उघडण्यासाठी अधिक वेळ लागणे, युजर इंटरफेस व कंटेट स्थानिक भाषेत नसणे, हार्डवेअरची गुणवत्ता चांगली नसणे व थर्ड पार्टी अप्लिकेशन्सचे प्रमाण अधिक असणे.
लाव्हा इंटरनॅशनलचे उत्पादन विभागाचे प्रमुख गौरव निगम यांनी सांगितले, “लाव्हा झेड50ला अँड्रॉइड ओरिओचे (गो एडिशन) पाठबळ असून, आम्ही पहिल्यांदाच नॉन-अँड्रॉइड ओरिओ (गो एडिशन) फोन्सशी तुलना करता, वेगाने प्रोसेसिंग, अधिक मेमरी असलेले, तसेच युजर्सना डेटा नियंत्रित करणे शक्य होण्यासाठी यूट्युब गो यामार्फत हवा तो कंटेंट मिळण्याची संधी देणारे स्मार्टफोन देत आहोत. कॅमऱ्यामध्ये ड्युएल बोकेह अनुभव व रात्रीच्या वेळी व्हीडिओ कॉलिंग करण्यासाठी एलईडी फ्लॅशचा समावेश आहे. ग्राहक व ब्रँड या दोन्हींसाठी ही निश्चितच उत्तम संधी आहे”.
अँड्रॉइडचे उत्पादन विभागाचे प्रमुख सागर कामदार यांनी सांगितले, “प्रत्येकाला गणनक्षमता देणे हे अँड्रॉइडचे नेहमी उद्दिष्ट राहिले आहे आणि विविध उपकरणे वापरताना चांगला अनुभव देणे हा त्याचा भाग आहे. मर्यादित मेमरी व प्रोसेसिंग क्षमता असलेल्या स्मार्टफोनमध्ये गुगल व अँड्रॉइड यांची वैशिष्ट्ये समाविष्ट करण्याच्या हेतूने अँड्रॉइड ओरिओची निर्मिती केली आहे. लाव्हा झेड50 दाखल करून हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकण्यासाठी लाव्हाबरोबर सहयोग करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.”
डिस्प्ले स्क्रीन दणकट व ओरखडेमुक्त असण्यासाठी लाव्हा झेड50मध्ये 2.5डी कर्व्ह्ड कॉर्निंग गोरिला ग्लाससह 4.5 इंची डिस्प्ले आहे. त्यास 1.1 जीएचझेड क्वाड-कोअरसह मीडियाटेक प्रोसेसरचे (MT6737m) बळ आहे व त्यामध्ये 8जीबी इंटर्नल स्पेस, 1जीबी रॅम आहे. स्मार्टफोनमध्ये 5.5जीबी वाढीव स्टोअरेज स्पेसही आहे (या तुलनेत, 8जीबी आरओएम उपकरणांमध्ये ती 3 जीबी असते). त्यामुळे उपकरणाची काम करण्याची क्षमता 50% पर्यंत वाढण्यास मदत होते व त्यामुळे अप्लिकेशन उघडण्यासाठी तुलनेने अतिशय कमी वेळ लागतो.
लाव्हा झेड50 मध्ये 5 मेगापिक्सल रिअर व फ्रंट कॅमेरा असून त्यामध्ये फ्लॅश असल्याने इमेजेस सुस्पष्ट व ठळक येतात. स्मार्टफोनच्या फ्रंट व रिअर या दोन्ही कॅमेऱ्यांमध्ये बोकेह मोड असल्याने क्षण अचूक टिपले जातात व जे टिपायचे आहे ते स्पष्टपणे उठून दिसते.
भारतातील मोबाइल वापरणाऱ्या व्यक्तींच्या गरजा विचारात घेऊन, या स्मार्टफोनमध्ये भारतातील 10 प्रमुख भाषांचा (हिंदीसह) समावेश करण्यात आला आहे. तसेच, यामध्ये इमेजेस, हवामान शोधता येते.
स्मार्टफोनला 2 वर्षांची वॉरंटी असून त्यामुळे संशोधन व विकास आणि उत्पादनाची निर्मिती यामध्ये मोठी गुंतवणूक करून कंपनी उत्पादनाच्या गुणवत्तेवर व विश्वासार्हतेवर किती भर देते ते स्पष्ट होते. याचबरोबर, स्मार्टफोनवर एअरटेलतर्फे 2000 रुपयांची आकर्षक कॅशबॅक ऑफरही आहे.
लाव्हा झेड50 दाखल करत असताना, खरेदीच्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत स्क्रीन फुटल्यास ती एकदा मोफत बदलून देण्याची सवलत जाहीर करण्यात आली आहे.