Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सॅमसंगने केली युनेस्को एमजीआयईपी आणि नवोदय विद्यालयांबरोबर माय ड्रीम प्रोजेक्टची घोषणा, आंध्र प्रदेशात 14 सॅमसंग स्मार्ट क्लासची घोषणा

Date:

  • विद्यार्थ्यांसाठी शिक्षण अधिक परिणामकारक कसे ठरू शकते व त्यांचा तणाव कसा कमी होऊ शकतो, हे शोधण्यासाठी माय ड्रीम हा दोन वर्षे कालावधीचा संशोधन अभ्यास
  • आंध्र प्रदेश सरकारबरोबरच्या भागीदारीमध्ये राज्यातील 14 बी.एड व डी.एड कॉलेजांचा समावेश

 

विशाखापटणम, भारत सॅमसंग इंडियाने भारतातील पूर्व-माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण अधिक परिणामकारक कसे ठरू शकते आणि विद्यार्थ्यांवरील ताण कसा कमी करता येऊ शकतो, हे शोधण्याच्या हेतूने, युनेस्को एमजीआयईपी (महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन फॉर पीस अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट) व नवोदय विद्यालय समिती यांच्या सहयोगाने माय ड्रीम प्रोजेक्ट या संशोधन अभ्यासाची घोषणा केली आहे.

आंध्र प्रदेश सरकारशी केलेल्या स्वतंत्र भागीदारीनुसार, सॅमसंगने आंध्र प्रदेशमधील बॅचलर्स ऑफ एज्युकेशन (बी.एड) व डिप्लोमा इन एज्युकेशन (डी.एड) कोर्सेस चालवणाऱ्या 17 सरकारी कॉलेजांमध्ये सॅमसंग स्मार्ट क्लास स्थापन करण्याचे जाहीर केले आहे.

14 सॅमसंग स्मार्ट क्लास 200 तासांचा अभ्यासक्रम शिकवणार असून, हा अभ्यासक्रम युनेस्को एमजीआयईपी उपक्रम असणाऱ्या ‘टीचिंग फॉर टेक्नालॉजी’ अंतर्गत, आंध्र प्रदेशसाठी तयार करण्यात आला आहे. हा कोर्स युनेस्को एमजीआयईपीने तयार केला आहे, जेणे करून भविष्यातील शिक्षकांना विद्यार्थ्यांना कसे शिकवावे, याचे प्रभावी प्रशिक्षण डिजिटल माध्यमांच्या मदतीने व नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून देता येऊ शकते.

माय ड्रीम प्रोजेक्टअंतर्गत, सॅमसंग आणि युनेस्को एमजीआयईपी हे भारतभरातील जवाहर नवोदय विद्यालय (जेएनव्ही) या शाळांमध्ये दोन वर्षे कालावधीच्या संशोधन अभ्यासाचे आयोजन करणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी जवाहर नवोदय विद्यालयाकडून मूल्यमापन केल्या जाणाऱ्या गणित व विज्ञानाच्या गुणांनी ठरवली जाणारी शिक्षणाची परिणामकारक वाढवण्यासाठी, तसेच विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी प्रोजेक्ट-बेस्ड आणि सोशो-इमोशनल लर्निंग (एसईएल) यांचा वापर कशा प्रकारे करता येऊ शकतो, हे समजून घेण्याच्या दृष्टीने या अभ्यासाची रचना करण्यात आली आहे.

माय ड्रीम प्रोजेक्ट या प्रकल्पाद्वारे, युनेस्को एमजीआयईपीला बौद्धिक व भावनिक बाबतीत सक्षम तरुण व्यक्ती घडवायच्या आहेत. शिक्षण हे धमाल व ताणमुक्त असावे, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. त्याचबरोबर, युवा वर्गाला जागृत, दयापूर्ण व सहानुभूतीमय बनवायचे आहे. या संशोधन प्रकल्पामुळे आम्हाला विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची परिणामकारकता कशी वाढवता येईल आणि त्यांचा ताण कसा कमी करता येईल, हे समजून घेण्यासाठी मदत होणार आहे. युनेस्को एमजीआयईपी, नवोदय विद्यालय समिती सॅमसंग यांच्यातील भागीदारी केवळ भारताच्या दृष्टीनेच नाही, तर जागतिक स्तरावर परिणाम करणारी ठरणार आहे,” असे युनेस्को एमजीआयईपीचे संचालक डॉ. अनंथा के. दुरईअप्पाह यांनी सांगितले.

अभ्यासासाठी, सॅमसंग आधीपासूनच सॅमसंग स्मार्ट क्लास चालवत असलेल्या 64 जवाहर नवोदय विद्यालय शाळांची निवड करण्यात आली आहे.

एमजीआयईपीसॅमसंग यांच्या सहयोगाने राबवल्या जाणाऱ्या माय ड्रीम प्रोजेक्टमुळे, भारतात शिक्षणामध्ये डिजिटल पद्धतीचा अवलंब करण्याच्या दृष्टीने व डिजिटल बाबतीतील स्पर्धात्मकता वाढवण्याच्या दृष्टीने चालना देण्यासाठी मदत होणार आहे. नवोदय विद्यालय ही निवासी व्यवस्था असल्याने, सॅमसंग स्मार्ट क्लास डिजिटल सुविधेमार्फत प्रोजेक्ट-बेस्ड आणि सोशो-इमोशनल लर्निंग (एसईएल) सुरू केल्याने विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्याच्या संदर्भात एक दिशा मिळणार आहे,” असे नवोदय विद्यालय समितीचे आयुक्त बी. के. सिंग म्हणाले.

 विद्यार्थ्यांना 21व्या शतकामध्ये टिकण्यासाठी गरजेची असणारी कौशल्ये बहाल करून, त्यांना सबल करण्याचा प्रयत्न करणारे अपूर्व संशोधन करण्यासाठी युनेस्को एमजीआयईपी नवोदय विद्यालय समिती यांच्याशी भागीदारी करताना सॅमसंगला अतिशय अभिमान वाटत आहे,” असे सॅमसंग इंडियाचे कॉर्पोरेट उपाध्यक्ष पीटर ऱ्ही यांनी नमूद केले.  

अभ्यासाच्या शेवटी, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे अंतिम अहवाल व शिफारसी सादर केल्या जाणार आहेत.

आंध्र प्रदेशातील 14 सरकारी बी.एड व डी.एड कॉलेजांमध्ये सॅमसंग स्मार्ट क्लास स्थापन करण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारशी केलेल्या भागीदारीमार्फत, डिजिटल तंत्रज्ञानामुळे उपलब्ध होईल अशी ट्रान्समिसिव्ह शिक्षणपद्धती अवलंबण्यासाठी आणि तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या नव्या शक्यतांची सांगड अभ्यासक्रमाशी व धड्यांशी घालण्यासाठी वर्तनात व दृष्टिकोनात बदल करण्यासाठी शिक्षकांना मदत केली जाणार आहे.

युनेस्को एमजीआयईपीने तयार केलेल्या 200 तासांच्या अभ्यासक्रमाच्या मदतीने, आंध्र प्रदेश सरकार बी.एड कोर्सचा भाग म्हणून डिजिटल इन्स्ट्रक्शन डिझाइन व प्रशिक्षण सुरू करणार आहे. ते प्रत्यक्षात साकारण्यासाठी, सॅमसंग सर्व सरकारी बी.एड व डी.एड कॉलेजमध्ये सॅमसंग स्मार्ट क्लास स्थापन करून सहकार्य करत आहे,” असे आंध्र प्रदेश सरकारचे शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुक्त सचिव आदित्यनाथ दास यांनी सांगितले.

सॅमसंग स्मार्ट क्लास सध्या 652 जवाहर नवोदय विद्यालय शाळांमध्ये, तामिळनाडूतील 28 सरकारी शाळांमध्ये आणि तीन दिल्ली पोलीस पब्लिक स्कूल्समध्ये उपलब्ध असून, भारतातील एकूण सॅमसंग स्मार्ट क्लासची संख्या 683 आहे.

सन 2013 मध्ये, नवोदय विद्यालय समितीच्या सहयोगाने पहिल्यांदा सॅमसंग स्मार्ट क्लास सुरू झाला व तेव्हापासून 2.5 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला आहे. याबरोबरच, 8,000 हून अधिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामध्ये त्यांना परिणामकारकपणे शिकवण्यासाठी, शिकवण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी व सरकारी शाळांमध्ये क्षमता विकास करण्यासाठी संवादात्मक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, हे सांगण्यात आले. या उपक्रमामुळे, विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची अधिकाधिक ओळख होत आहे आणि विद्यार्थ्यांना कठीण संकल्पना सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी मदत झाली आहे.

प्रत्येक सॅमसंग स्मार्ट क्लासमध्ये इंटरॅक्टिव्ह सॅमसंग स्मार्टबोर्ड्स, सॅमसंग टॅब्लेट्स, प्रिंटर, वायफाय कनेक्टिविटी व पॉवर बॅकअप आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज आहे – प्रशांत जगताप

पुणे- होणार… होणार.. म्हणता म्हणता पुणे महानगरपालिकेची निवडणूक अखेर...

महायुतीतून पुण्या पिंपरीत अजितदादा कशासाठी बाहेर ? मविआला धोबीपछाड करण्यासाठी ?

पुणे- महापालिका निवडणुका जाहीर होताच आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र...

पुणे महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या समन्वय समिती प्रमुखपदी रमेश बागवे

पुणे- येथील महानगरपालिका निवडणुकीसाठी समन्वय समिती गठीत...

इनव्हेलियर इंडिया व राष्ट्रवादी कामगार युनियनमध्ये वेतन करार

पुणे — रांजणगाव येथील इनव्हेलियर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि...