पुणे: आज पुण्यामध्ये केंद्र सरकारच्या लघु उद्योग आणि नव-उद्योजकांच्या सहाय्यार्थ प्रारंभ केलेली योजना मोदी सरकारचा लघु उद्योगांना करत असलेल्या प्रोत्साहनाचा एक भाग असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री हंसराज अहिर यांनी केले. ते पुढे म्हणाले की, या योजनेमुळे व्यापार आणि उद्योगांना मोठी चालना आणि विश्वास प्राप्त होणार आहे. राज्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात बँक ऑफ महाराष्ट्राने लघु उद्योजकांना केलेय आर्थिक मदतीचा विशेष उल्लेख करून सांगितले बँकेने या क्षेत्रात केलेले काम स्पृहरणीय आहे.
गणेश क्रीडा मंडळ येथे आयोजित या कार्यक्रमामध्ये खासदार श्री अनिल शितोळे, जिल्हाधिकारी श्री नवल किशोर राम यांच्यासह बँक ऑफ महाराष्ट्रचे सरव्यवस्थापक यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे जाहीर प्रक्षेपणाची जिल्ह्याची अग्रणी बँक, बँक ऑफ महाराष्ट्राने इतर बँकांच्या सहकार्याने आयोजिली होती. यावेळी सदानंद दाते, आय पी एस एम एच – सह सचिव, एस डी लोकेश जे डी विदेश व्यापार हे देखील उपस्थित होते.
बँक ऑफ महाराष्ट्रचे सरव्यवस्थापक श्री दत्ता डोके यांनी या योजनेचे पोर्टल www.psbloansin59minutes.com बाबत माहिती दिली आणि त्याचे महत्व विशद केले. पोर्टलच्या माध्यमातून केल्या जाणार्या नोंदणी, सादरीकरण, अवधि आणि वैधता यासह शासनाने घेतलेल्या पुढाकाराबाबत सविस्तर माहिती दिली. नवोद्योजकांना बँकेच्या योजना, संबंधित योजना आणि आर्थिक सहाय्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. शासनाच्या पीएमइजीपी, स्टँड अप इंडिया तसेच पीएमएमवाय योजनांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राने घेतलेल्या पुढाकाराची माहिती दिली.
यावेळी लघु उद्योगांना केलेल्या सहाय्याची तसेच विविध नवोद्योजकांसाठीच्या योजनांची माहितीचे सादरीकरण केले गेले. या राष्ट्रीय कार्यक्रमास उत्तेजन देण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्राने जोमदार पुढाकार घेतला असून कर्ज प्रकरणे मंजूर केली असल्याची माहिती दिली गेली.
एमएसएमई यांच्या सहाय्यर्थ असलेल्या योजनांची माहिती इतर बँका तसेच डीजीएफटी, बीआयएस यांनी दिली. या कार्यक्रमाचे उद्दीष्ट लघु उद्योजकांना प्रगतिच्या जलद गतीचा मार्ग निर्माण करणे हा आहे.
या योजनेचा मुख्य कार्यक्रम दिल्ली येथील विज्ञान भवन येथे आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेकडो नवोद्योजकांना मार्गदर्शनाने झाला. कार्यक्रमास देतील अनेक बँकांचे प्रतींनिधी, हितचिंतक यांच्या उपस्थितीत झाला आणि त्याचे प्रक्षेपण 80 विविध जिल्ह्यात झाले.