- उत्कृष्ट फोटो टिपण्यासाठी नव्या Z81 मध्ये आर्टिफिशिअल इंटलिजन्सच्या (एआय) वापराने स्टुडिओ फोटोग्राफीचा समावेश
- Z81 ने डीएसएलआरमधील स्प्लॅश मोड हा पर्याय स्मार्टफोनमध्ये समाविष्ट करून स्मार्टफोन फोटोग्राफीमध्ये आणली क्रांती
- फ्रंट व रिअर कॅमेरा या दोन्हींमध्ये स्टुडिओ मोड – 13 मेगापिक्सल फ्रंट व 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा
- सर्वसाधारण वापर केल्यास 1.5 दिवस चालणारी शक्तिशाली 3000 mAh लि-पॉलिमर बॅटरी*
नवी दिल्ली – यंदा सणासुदीला लाव्हा Z81 स्मार्टफोनमुळे स्वतःचे वेगळेपण दाखवून द्या. लाव्हा इंटरनॅशनलने, अप्रतिम इमेज टिपण्यासाठी तयार केलेल्या स्टुडिओ मोड फोटोग्राफीचा समावेश असलेला Z81 आज दाखल केला. अचूक इमेज काढण्याच्या दृष्टीने डेप्थ-ऑफ-फिल्ड परिणाम देण्यासाठी स्टुडिओ मोडमध्ये आर्टिफिशिअल इंटलिजन्सचा वापर केला जातो. हे उत्कृष्ट कॅमेरा वैशिष्ट्य असलेला, परवडणाऱ्या स्मार्टफोन श्रेणीतील Z81 हा एकमेव स्मार्टफोन आहे.
ग्राहकांना आता इमेजला सहा आकर्षक, स्टुडिओ दर्जाचे लायटिंग इफेक्ट देण्यासाठी आता स्टुडिओ मोड हे वैशिष्ट्य वापरता येऊ शकते.
- स्प्लॅश – सब्जेट रंगीत राहील व सुंदर बोकेह बॅकग्राउंड दिसेल, असा फोटो काढला जातो.
- स्टेज लाइट – सब्जेट रंगीत राहील व बॅकग्राउंड पूर्णपणे काळी दिसेल, असा फोटो काढला जातो.
- स्टेज लाइट मोनो – सब्जेट मोनोक्रोममध्ये व काळी बॅकग्राउंड, असा उत्तम व आकर्षक इफेक्ट पिक्चरला दिला जातो.
- नॅचरल – सब्जेक्टचा स्किन टोन नैसर्गिक दिसतो व बोकेह बॅकग्राउंड दिसते.
- व्हायब्रंट – सब्जेक्टला ग्लोइंग इफेक्ट देण्यासाठी फेशिअल फीचर्स ब्राइट केले जातात.
- काँटूर – बोकेह बॅकग्राउंड आणि फेशिअल फीचर्स उठून दिसण्यासाठी डायरेक्शनल लायटिंग उपलब्ध आहे.
Z81च्या 13 मेगापिक्सल रिअर कॅमेऱ्यामध्ये (फ्लॅशलह) नॅचरल, व्हायब्रंट, काँटूर व स्प्लॅश मोड यांचा समावेश आहे, तर 13 मेगामिक्सल फ्रंट कॅमेऱ्यामध्ये (फ्लॅशलह) सर्व सहाचा समावेश आहे.
नवा लाव्हा Z81 दोन प्रकारांत मिळेल – 2GB व 3GB. 3GB प्रकाराची किंमत 9499 रुपये आहे आणि तो ब्लॅक व गोल्डर कलर या पर्यायांत देशभर रिटेल आउटलेटमध्ये व फ्लिपकार्ट, अॅमेझॉन व स्नॅपडील या प्रमुख ई-कॉमर्स वेबसाइटवर मिळेल. कंपनी 2GB प्रकार लवकरच दाखल करणार आहे.
याविषयी बोलताना, लाव्हा इंटरनॅशनलचे अध्यक्ष सुनील रैना यांनी सांगितले, “आमच्या ग्राहकांसाठी लाव्हाकडून आणखी एक पहिलेवहिले वैशिष्ट्य सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे – अत्यंत आकर्षक व शक्तिशाली Z81. प्रचंड आवाज व गर्दीच्या काळात, सर्वांपासून आपले वेगळेपण दाखवणे गरजेचे आहे; आणि आमचा Z81 स्टुडिओ मोडद्वारे नेमके हेच करतो. आमच्या ग्राहकांना हे वैशिष्ट्य अतिशय उपयुक्त वाटेल व त्यांना आधुनिक स्मार्टफोन फोटोग्राफीचा अनुभव घेता येईल. Z81 हे उपयुक्त तंत्रज्ञान उपलब्ध करण्याच्या आमच्या उद्दिष्टाचे प्रतिक आहे”.
लाव्हा Z81 अँड्रॉइड 8.1 + स्टार OS 5.0 यावर चालेल व त्यास 3GB RAM व 32GB ROM यांचे पाठबळ आहे – ग्राहकांना स्मार्टफोनचा उत्तम अनुभव मिळेल आमि म्युझिक, व्हीडिओ, पिक्चर्स, अॅप्लिकेशन व अन्य डाटासाठी भरपूर स्टोअरेज मिळेल.
केवळ 7.99 मिमी थिक, लाव्हा Z81 मध्ये 5.7” HD+ IPS (कॉर्निंग गोरिला ग्लास 3चे संरक्षण) स्क्रीन असून, त्यामुळे अखंडित व उत्तम पद्धतीने फोटो-व्हीडिओ पाहता येतात. त्यास 2.0 GHz क्वाड कोर हेलिओ A22 चिपसेटचे पाठबळ असून, हा या श्रेणीतील सर्वात वेगवान व सर्वात कार्यक्षम प्रोसेसर आहे. त्यामुळे Z81 युजरना एआय तंत्रज्ञानाचा वापर करता येतो – त्यामध्ये या श्रेणीतील सर्वोत्तम कॅमेरा व सेफ्टी फीचर्स, सिम्प्लिफाइड व सोयीचे ब्राउजिंग व जास्तीत जास्त बॅटरी लाइफ आहे.
3000 mAh बॅटरी एकदा चार्ज केल्यावर 1.5 दिवसांपर्यंत टिकते. बॅटरीला एआय तंत्रज्ञानाचे पाठबळ आहे – यामुळे फोन बॅटरीच्या वापराची पाहणी केली जातेच, शिवाय युजरने बराच वेळ न वापरलेले व बॅकग्राउंडला सुरू असलेले अॅप आपोआप बंद केले जातात. तसेच, त्यामध्ये बॅटरीची कामगिरी उंचावण्यासाठी पॉवर सेव्हर मोड, सुपरपॉवर सेव्हर मोड, अॅप इंटलिजंट पॉवर सेव्हर मोड व स्मार्ट क्लीन फीचर अशी शक्तिशाली वैशिष्ट्ये आहेत.
हा स्मार्टफोन युजरना 15 भारतीय भाषांमध्ये एसएमएस वाचण्याचा पर्यायही देतो.
लाव्हाने Z81 कीबोर्ड अॅप अपग्रेड करून स्विफ्टकी कीबोर्ड देण्यासाठी मायक्रोसॉफ्टशी भागीदारी केली आहे. युजरना पर्सनल वर्ड प्रेडिक्शन व करेक्शन सुविधा देण्यासाठी मायक्रोसॉफ्टच्या स्विफ्टकीमध्ये आर्टिफिशिअल इंटलिजन्सचा वापर केला जातो. तसेच, स्विफ्टकीमुळे युजरना कीबोर्ड सेटिंग न बदलता, एकाच वेळी पाचपर्यंत भाषांमध्ये टाइप करता येते आणि स्थानिक भारतीय लिपी एकत्र करता येतात.
स्मार्टफोनबरोबर मोफत वन-टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट ही विशेष लाँच ऑफर दिली जाणार आहे. ही ऑफर जानेवारी 31, 2019 पर्यंत खरेदी करण्यात येणाऱ्या लाव्हा Z81 साठी लागू आहे.
*इंटर्नल टेस्ट रिझल्ट