हिरे, रत्ने व दागिने यांचा कस ठरविणारी जागतिक स्तरावरील मान्यताप्राप्त संस्था, आयजीआय हिने नामवंत सराफांशी केली भागिदारी, ग्राहकांचा विश्वास व निष्ठा यांची जपणूक करण्याचा उद्देश
हिऱ्यांच्या संदर्भात कट, कलर, क्लॅरिटी, कॅरट या चार वैशिष्ट्यांबरोबर आता पाचवे ‘कॉन्फिडन्स’हे वैशिष्ट्य ‘आयजीआय’कडून लागू
‘आयजीआय’चे प्रमाणपत्र म्हणजे खरेदी केलेला प्रत्येक हिरा हा अब्जावधी वर्षे जुना असा निसर्गाचा आविष्कार असल्याची पावतीच
पुणे-यंदा सणासुदींच्या काळात केवळ प्रमाणित केलेले नैसर्गिक हिरेच ग्राहकांनी खरेदी करावेत, असे आवाहन द इंटरनॅशनल जेमॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (आयजीआय) या जागतिक स्तरावरील सर्वात मोठ्या स्वायत्त अशा रत्नपारखी व प्रमाणपत्र देणाऱ्या संस्थेने केले आहे. ‘आयजीआय’ने या करीता देशभरातील 24शहरांमधील अनेक नामवंत सराफांशी सहयोगी करार केला आहे. या करारान्वये,’ अब्जावधी वर्षे जुने हिरे खरेदी करा’, असे घोषवाक्य असणारी मोहीम 5 नोव्हेंबर 2018 पर्यंत आयोजित करण्यात आली आहे. नवरात्री, दसरा, दुर्गाष्टमी, एकादशी, शरद पौर्णिमा, करवा चौथ, धनत्रयोदशी आणि दिवाळी अशा सणांना ही मोहीम लागू असेल.
हिऱ्यांबाबत असलेला ग्राहकांचा विश्वास व त्यांची निष्ठा ही पुनर्प्रस्थापित व्हावी आणि नैसर्गिक हिऱ्यांचा वारसा पुन्हा उजळून निघावा, यासाठी ‘आयजीआय’ने मोहीम सुरू केली आहे. अब्जावधी वर्षांपासून उच्च तापमान व उच्च दाब यांखाली असलेले कार्बनचे कण एकत्र येऊन एक हिरा तयार होतो. त्याची गुणवत्ता उच्च कोटीची असते. हे त्याचे मूल्य ग्राहकांना व्यवस्थित माहीत व्हावे व त्यांना हिऱ्याची महती कळावी, यासाठी आयजीआय व तिचे सहयोगी सराफ सदस्य प्रयत्नशील आहेत. पृथ्वीवर जीव निर्माण होण्यापूर्वीपासून येथे हिरा अस्तित्वात होता. तो अजूनही त्याच अवस्थेत आपल्याला उपलब्ध होतो, हा निसर्गाचा चमत्कारच म्हणायला हवा.
‘आयजीआय इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक तेहमास्प प्रिंटर म्हणाले, ‘’नैसर्गिक हिऱ्याचे मूल्य हे त्याच्या मूळ उगमापासून सिध्द होते. हिऱ्याच्या या अब्जावधी वर्षांच्या या प्रवासाची आम्ही ‘आयजीआय’मध्ये दखल घेतो. नैसर्गिक हिऱ्याच्या वारशाला पर्याय नाही. त्यामुळेच आम्ही त्याचे हे थोरपण जगभरात प्रसारीत करीत आहोत.सणासुदीच्या काळात निसर्गाच्या या चमत्काराच्या वारशाचीच खरेदी करा, असा संदेश आम्ही देत आहोत. आयजीआय ही हिऱे, रत्ने व दागिने यांची पारख करणारी व त्यांच्या अस्सलपणाचे प्रमाणपत्र देणारी जागतिक स्तरावरील अधिकारी संस्था आहे. तिचे प्रमाणपत्र हे विश्वासाचे व खरेपणाचे प्रतिक असते. ‘आयजीआय’च्या रिपोर्टमधून व प्रमाणपत्रातून ग्राहकांना हा विश्वास मिळतो की त्यांनी खरेदी केलेला हिरा हा खरोखरच अब्जावधी वर्षांपासून पृथ्वीच्या अंतरंगात दडून राहिलेला निसर्गाचा चमत्कार आहे. या हिऱ्याचा उत्खननापासून बाजारपेठेपर्यंतचा प्रवास आयजीआयमध्ये नोंदविलेला असतो.’’
दागिन्याच्या कोंदणातील हिरा हा नीट पारखून घेतलेला आणि प्रमाणित केलेला असला, तरच त्या दागिन्याचे डिझाईन पूर्ण झाले असे म्हणता येते. कोणत्याही हिऱ्याची वैशिष्ट्ये ही चार निकषांवर मांडली जातात.. कट, क्लॅरिटी, कलर आणि कॅरट. या क अक्षरापासून सुरू होणाऱ्या चार वैशिष्ट्यांमध्ये आता आणखी एका वैशिष्ट्याची भर घातली जात आहे .. कॉन्फिडन्स. आपण परिधान करीत असलेला हिरा हा खराच अस्सल आहे, याचा आत्मविश्वास ग्राहकाला असायला हवा, यासाठी या वैशिष्ट्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळेच ग्राहकांनी खरेदी करताना आयजीआय प्रमाणित हिऱ्याचीच मागणी करायला हवी, असे ‘आयजीआय’चे आवाहन आहे.
इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट (आयजीआय) विषयी ..
इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट (आयजीआय) ही संस्था अॅन्टवर्प येथे 1975 मध्ये स्थापन करण्यात आली. रत्नांचे प्रमाणीकरण आणि मूल्यमापन करणारी ही जगातील सर्वात मोठी स्वायत्त संस्था आहे. अॅन्टवर्प, न्यूयॉर्क, हॉंगकॉंग, भारत, बॅंकॉक, टोकयो, दुबई, तेल अविव, कॅव्हेलीज, टोरंटो, लॉस एन्जेलीस आणि शांघाय येथे या संस्थेची कार्यालये आहेत. भारतात ‘आयजीआय’च्या मुंबईत तीन आणि कोलकता, नवी दिल्ली, त्रिसूर, सूरत, अहमदाबाद, हैदराबाद आणि जयपूरमध्ये प्रत्येकी एक इतक्या प्रयोगशाळा आहेत. आयजीआय ही चार देशांमध्ये ‘इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टॅन्डर्डायझेशन’ (आयएसओ – 9001-2000) प्रमाणित संस्था आहे. जगभरात कोठेही रत्ने, हिरे व दागिने खरेदी करताना ती आयजीआय प्रमाणित असतील, तर ती अस्सल मानता येतात. ग्राहकाच्या मानसिकतेचा विचार करण्यास कटिबध्द असल्याने ‘आयजीआय’ने रत्नांचे विश्लेषण करून त्यांची प्रमाणपत्रे तयार केली आहेत. ‘आयजीआय’चे हे प्रमाणपत्र म्हणजे हिऱ्याची पाच वैशिष्ट्ये अबाधित आहेत, याची ग्वाही असते. हिरे, रत्ने व दागिन्यांचे प्रमाणीकरण आणि मूल्यमापन करणारी जगातील सर्वात मोठी स्वायत्त संस्था असल्याने‘आयजीआय’वर जगभरातील व्यावसायिकांचा व ग्राहकांचा अतूट विश्वास असतो.