पुणे: महिंद्रा अँड महिंद्रा लि.ने एसएईइंडिया या प्रोफेशनल सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनीअर्सच्या सहयोगाने, बाहा सीरिजच्या 12व्या आवृत्तीला सुरुवात होत असल्याचे जाहीर केले आहे. अंतिम फेरी 24 ते 27 जानेवारी, 2019 या कालावधीत, इंदोरनजिकच्या पिठमपूर येथील एनएटीआरआयपी येथे होणार आहे व त्यानंतर 8 ते 10 मार्च 2019 या कालावधीत चंडीगडजवळील आयआयटी रोपर येथे होणार आहे.
बाहा एसएईइंडिया 2019 साठी 363 प्रवेशिका आल्या. त्यातील 201 संघांची निवड पारंपरिक एम-बाहासाठी करण्यात आली, तर 50 संघांची निवड व्हर्च्युअल फेरीतून ई-बाहासाठी करण्यात आली.
बाहा एसएईइंडिया 4 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी, विद्यार्थ्यांना सिंगल-सीटर, चारचाकी ऑल-टिरेन व्हेइकलचे (एटीव्ही) डिझाइन, बांधणी, चाचणी करण्यास सांगते. या कार्यक्रमामध्ये, टेक्निकल इन्स्पेक्शन; डिझाइन, कॉस्ट व सेल्स प्रेझेंटेशन असे स्टॅटिक इव्हॅल्युएशन आणि अॅक्सिलरेशन, स्लेज पुल, मॅन्युव्हरेबिलिटी असे डायनॅमिक इव्हेंट यांचा समावेश असेल. सस्पेन्शन व ट्रॅक्शन, यानंतर 4 दिवसांचा एंड्युरन्स इव्हेंट असेल.
दरवर्षी नवी मध्यवर्ती संकल्पना स्वीकारणे, हे बाहा एसएईइंडियाचे खास वैशिष्ट्य आहे. या वर्षी, बाहा 2019 साठी मध्यवर्ती संकल्पना ‘अॅडव्हेंचर रीलोडेड’ ही असून, त्यामध्ये उदयोन्मुख इंजिनीअर्सची पॅशन, परिश्रम व चिकाटी यांची, तसेच आव्हाने घेण्याची ईर्ष्या व जास्तीत जास्त प्रयत्न करण्याची क्षमता यांची दखल घेतली जाणार आहे.
बाहा एसएईइंडियाने भारतातील इलेक्ट्रिक मोबिलिटीचे पर्व सुरू झाल्याचा लाभ घेण्यासाठी 2015 मध्ये ईबाहा सीरिज सुरू केली. पारंपरिक बाहा वाहने सर्व 201 एमबागा संघांसाठी सामायिक असलेल्या 10 एचपी ब्रिग्स अँड स्ट्रॅटन गॅसोलिन इंजिनावर चालतात, तर ईबाहा वाहने 6 kW सर्वोच्च इलेक्ट्रिक पॉवर असणारा व रिचार्जेबल लिथिअम-इयॉन बॅटरी पॅक असणाऱ्या इलेक्ट्रिक मोटरवर चालणार आहेत. येथे, विद्यार्थ्यांना मोटर, कंट्रोलर व बॅटरी संपादित करता येईल आणि स्वतःची बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम तयार करता येईल. या वर्षी, इलेक्ट्रिक वाहनांसाठी मनुष्यबळाची गरज विचारात घेऊन, या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंग क्षेत्रातील अधिक विद्यार्थ्यांना उत्तेजन दिले आहे.
बाहा 2019 साठी, महाराष्ट्रातून अंतिम फेरीसाठी निवडण्यात आलेल्या 70 प्रवेशिकांमध्ये पुण्यातील 24 महाविद्यालयांचा समावेश आहे. बाहा सीरिजच्या शेवटच्या काही आवृत्तींमध्ये, महाराष्ट्रातून निवडण्यात आलेल्या प्रवेशिकांमध्ये पुण्यातील प्रवेशिकांची संख्या जास्तीत जास्त होती. गेल्या काही वर्षांत, पुण्यातील महाविद्यालयांनी अंतिम फेरीमध्ये सर्वाधिक पुरस्कार जिंकले आहेत.
इंदोरमधील पिठमपूर येथे आयोजित केल्या गेलेल्या बाहा 2018च्या पहिल्या भागामध्ये, पुण्यातील श्रीम. काशीबाई नवले कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगने ईबाहासाठी विजेतेपद पटकावले, तर पुण्यातील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगला एमबाहासाठी संयुक्त विजेतेपद मिळाले. पंजाबमधील आयआयटी रोपर येथे 8 ते 11 मार्च 2018 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बाहा 2018च्या दुसऱ्या भागामध्ये, कोईम्बतरूमधील गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग कॉलेजने विजेतेपदाचा मान मिळवला.
बाहा अंतिम फेरीसाठी, देशभरातील इंजिनीअरिंग कॉलेजांमधून आलेल्या प्रवेशिकांचे मूल्यमापन जुलै 2018 मध्ये पंजाबमधील चित्कारा विद्यापीठात झालेल्या व्हर्च्युअल राउंडमध्ये करण्यात आले. अंतिम फेरीमध्ये डिझाइन तयार करण्याची इच्छा असलेल्या बाहा बग्गी वाहनाचे डिझाइन त्यांनी त्यामध्ये सादर केले.
कॅड डिझाइन, सीएई विश्लेषण आणि रोल केज, सस्पेन्शन, स्टीअरिंग व ब्रेक्स यांचे बारकाईने विश्लेषण, तसेच त्यांना देण्यात आलेल्या विषयांवरील रुल बुक व्हायव्हा सेशन व मूल्यमापन यानुसार पात्र संघांची निवड करण्यात आली. व्हर्च्युअल बाहामध्ये सादर करण्यात आलेल्या प्रवेशिका म्हणजे मॉक-अप्स होते, ज्यांची निर्मिती सहभागींनी नमूद केलेल्या अचूक बाबींनुसार केली जाऊ शकते. अंतिम फेरीत पोहोचलेले संघ ऑटोमोबाइलमधील कौशल्य, आकलन व पॅशन दाखवणार आहेत, तसेच स्वतःची बग्गी रेस कारही तयार करणार आहेत.
यानिमित्त बोलताना, एसएईइंडियाचे अध्यक्ष डॉ. बाला भारद्वाज म्हणाले, “एसएईइंडियामध्ये, 2007 मध्ये सुरुवात झाल्यापासून आम्ही बाहा एसएईइंडियामध्ये अधिकाधिक सुधारणा करत आहोत. गेल्या काही वर्षांत, आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजांमध्ये ऑटोमोटिव्ह इंजिनीअरिंगविषयी उत्साह निर्माण करू शकलो आहे. एक कंपनी म्हणून, ऑटोमोटिव्ह इंजिनीअरिंगविषयी प्रेम निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्यासाठी बाहा एसएईइंडियापेक्षा चांगले व्यासपीठ कुठले असणार.”
उमेश शहा, सीनिअर व्हीपी व सीओओ (सीव्हीआरबीयू), गॅब्रिएल इंडिया लि., समन्वयक – बाहा एसएईइंडिया 2019, पिठमपूर, म्हणाले, “बाहा एसएईइंडिया गेल्या 11 आवृत्त्यांमार्फत, उद्योग व शिक्षणक्षेत्र यांना एकत्र आणून, ऑटोमोटिव्ह इंजिनीअरिंगचे भविष्य घडवण्यासाठी विशेष संधी उपलब्ध करत आहे. या उपक्रमाची रचना विचारात घेता, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून त्याचा उपयोग त्यांना सांघिक कार्य व स्पर्धात्मकता ही व्यावसायिक यशाच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी कौशल्ये शिकण्यासाठी होणार आहे. कंपन्यांमध्ये सर्वोत्तम मनुष्यबळाचा समावेश करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या संभाव्य एम्प्लॉयरसाठी हे आदर्श व्यासपीठ आहे.”