मुंबई : सिस्का वायर्सने आपल्या नव्या उत्पादनाचे अनावरण करण्यासाठी, सेलिब्रेटी ब्रँड अम्बेसेडर अमिताभ बच्चन यांचा समावेश असलेली ‘सिस्का… वायर लेस नहीं… वायर मोअर!’ ही नवी टीव्हीसी जाहीर केली आहे. पहिली जाहिरात 10 ऑक्टोबर 2018 रोजी टेलिव्हिजनवर दाखवली जाणार आहे. वायर्स या श्रेणीमध्ये नावीन्य आणतील अशी सिस्काने भारतीय बाजारात दाखल केलेल्या नव्या उत्पादनांची विशेष वैशिष्ट्ये या कॅम्पेनद्वारे अधोरेखित केली जाणार आहेत. लवकरच, अशी जाहिरात अन्य जीईसीवर व न्यूज चॅनलवरही दाखवली जाणार आहे. सिस्काने जुलै 2018 मध्ये केबल व वायर याविषयीचा टीझर जाहीर केला.
आयबीडी इंडियाने तयार केलेल्या अॅड फिल्मचा समावेश असलेली ही कॅम्पेन या श्रेणीविषयी जागृती करण्याचा प्रयत्न करते. आजवर, या श्रेणीतील उत्पादनांच्या खरेदीविषयीचे निर्णय ग्राहक फार विचार न करता घेत आले आहेत. या नावीन्यपूर्ण जाहिरातीद्वारे, सिस्का वायर्सने ग्राहकांना जुन्या सवयी सोडून देण्याचे आणि विश्वासू व आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणाऱ्या या उत्पादनाकडून अधिक अपेक्षा करण्याचे आवाहन केले आहे. सिस्का वायर्स या नव्या उत्पादनांची खरेदी करत असताना, निर्णयप्रक्रियेमध्ये सक्रिय सहभागी होण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. हा विचार, सिस्का… वायर लेस नहीं… वायर मोअर या स्लोगनमध्ये मांडला आहे.
नवी टीव्हीसी दाखल केल्याबद्दल सिस्का ग्रुपचे चीफ मार्केटिंग ऑफिसर अमित सेठिया यांनी सांगितले, “सिस्काने नावीन्यपूर्ण व विश्वासू असा एक आघाडीचा ब्रँड म्हणून स्थान निर्माण केले आहे. बाजारात वायर श्रेणीमध्ये अनेक ब्रँड उपलब्ध असले तरी त्यांच्यामध्ये फारच कमी तफावत आहे किंवा सगळे ब्रँड सारखेच आहेत आणि म्हणूनच आम्ही या श्रेणीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. सिस्का वायर विशेषतः ROHS3 कम्प्लायंट आहेत – या श्रेणीतील हे सर्वोत्तम वैशिष्ट्य असून त्यामुळे ईयू कमिशनच्या सूचनेनुसार उत्पादनामध्ये परवानगीयोग्य मर्यादेमध्ये 4 घातक घटकांच्या समावेशाच्या बाबतीत अधिक सुरक्षिततेची खात्री दिली जाते. “वायर लेस नहीं… वायर मोअर” या टीव्हीसीमध्ये अमिताभ बच्चन ही अतिशय सभ्य, आत्मविश्वासपूर्ण, टेक्नालॉजी-सॅव्ही व्यक्ती दाखवली असून ती आधुनिक तंत्रज्ञान जाणते व सिस्का वायर्सची आवश्यकता अधोरेखित करते. ही टीव्हीसी आमच्या ग्राहकांना नक्की पसंत पडेल, असा विश्वास आहे. या टीव्हीसीमध्ये सिस्का वायर्सच्या दोन महत्त्वाच्या मूल्यांवर भर देण्यात आला आहे – फायर-प्रूफिंग व विजेची बचत.”
वायर ही श्रेणी एलईडी दिवे किंवा वैयक्तिक ग्रूमिंग अॅक्सेसरीज याइतकी अधोरेखित होत नसून, ग्राहकांना वायरच्या बाबतीत फायर-प्रूफिंग व विजेच्या वापरावर होणारा परिणाम, हे मुद्दे महत्त्वाचे वाटत असल्याचे सिस्काच्या निदर्शनात आले. या उद्योगातील आघाडीची कंपनी म्हणून, आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करेल, असा विश्वासू ब्रँड ग्राहकांनी वापरावा, यासाठी त्यांना जागृत करणे गरजेचे असल्याचे सिस्काला आढळले. ही जाहिरात सिस्का वायर्सच्या दोन मुख्य फायद्यांवर व विशिष्ट वैशिष्ट्यांवरही भर देण्याचा प्रयत्न करते – फायर-प्रूफिंग (आधुनिक पीव्हीसी) व विजेची बचत (99.95% हून अधिक शुद्ध तांबे).
या सेग्मेंटअंतर्गत, 0.75 चौरस मिमी ते 6.0 चौरस मिमी आकार असलेल्या, 90,180 व 300 मीटर कॉइल लांबीच्या सिस्का फ्लेम रिटार्डंट (एफआर) व फ्लेम रिटार्डंट लो स्मोक (एफआरएलएस) वायर्स दाखल केल्या जाणार आहे. या वायर्स पर्यावरणपूरक (लीड व हॅलोजन गॅसमुक्त), RoHS कम्प्लायंट आहेत, शॉकपासून सुरक्षित राहण्यासाठी व एकसमान वीजपुरवठ्यासाठी त्यामध्ये इंडो-युरोपीय तंत्रज्ञान वापरले आहे, या वायरमध्ये 99.95% अधिक बेअर कॉपर कंडक्टर, ऊर्जाबचत करणाऱ्या, हाय हीट रेझिस्टन्स, करंट वाहण्याची उच्च क्षमता, अँटी-टर्माइट व अँटी-रोडंट ही वैशिष्ट्ये आहेत.
सिस्का ग्रुपविषयी:
महाराष्ट्रात टी-सीरिज ऑडिओ कॅसेट, सीडी व ऑडिओ व्हीडिओ सिस्टीमचे वितरण करणाऱ्या गुरू नानक मार्केटिंग यापासून सुरुवात करणाऱ्या सिस्का ग्रुपचे एकमेव उद्दिष्ट होते: प्रगती. सिस्का ग्रुपने प्रगतीमध्ये सातत्य ठेवल्याने व देशांतर्गत कंपन्यांमध्ये आघाडी घेतल्याने, आता जगभरातील देशांमध्ये विस्तार करून जागतिक प्रगतीवर लक्ष केंद्रित केले आहे. मोठे उद्दिष्ट असलेल्या सिस्का ग्रुपने एलईडी, पर्सनल केअर अप्लायन्सेस, मोबाइल अक्सेसरीज, होम अप्लायन्सेस, वायर व केबल अशा विविध श्रेणींमध्ये वैविध्य आणली व प्रगती केली आणि हा समूह या श्रेणींमध्ये वाटचाल करत आहे व प्रभुत्व गाजवत आहे.