बंगळुरू, – सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने बेंगळुरू या भारतातील टेक कॅपिटलमध्ये आज जगातील सर्वात मोठे मोबाइल एक्स्पिरिअन्स सेंटर सुरू केल्याची घोषणा केली आहे. कंपनीचे सर्वात मोठे मोबाइल एक्स्पिरिअन्स सेंटर जेथे असणार आहे त्या ब्रिगेड रोडवरील वौशिष्ट्यपूर्ण ऑपेरा हाउसचे नूतनीकरण करण्यात आले आहे व आर्किटेक्चरचा एक भव्य नमुना म्हणून जतन करण्यात आले आहे. सॅमसंग ऑपेरा हाउस लोकांना विशेष अनुभव देण्यासाठी तंत्रज्ञान, जीवनशैली व नावीन्य एकत्र आणणार आहे.
देशातील पहिल्यावहिल्या असलेल्या सॅमसंग ऑपेरा हाउसमध्ये, सॅमसंगच्या #DiscoverTomorrowToday या विचारसरणीवर आधारित असलेल्या वैविध्यपूर्ण उत्पादनांचे दर्शन घडवले जाईल. उत्पादनांचे हे अनुभव सॅमसंग जगभर प्रवर्तक असलेल्या व्हर्च्युअल रिअलिटी (व्हीआर), आर्टिफिशिअल इंटलिजन्स (एआय) व इंटनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) या परिवर्तनशील तंत्रज्ञानांवर आधारित असतील.
तंत्रज्ञानाशी संबंधित असलेले विविध अनुभव व मनोरंजन यांचा आनंद घेण्यासाठी इच्छुक असलेल्या शहरातील तरुणांसाठी सॅमसंग ऑपेरा हाउस हे हक्काचे ठिकाण असणार आहे. तेथे 360 डिग्री त्रीमितीय हालचाली करणारे 4डी स्वे चेअर किंवा व्हिपलॅश पल्सर 4डी चेअर असे व्हीआर अनुभव घेता येतील. एखाद्याला फायटर पायलटच्या भूमिकेमध्ये जाऊन एअरक्राफ्ट स्टंट करता येऊ शकतात किंवा स्पेस बॅटल किंवा रोलर कोस्टर राइड अनुभवता येऊ शकते.
केकेइंग किंवा रोइंगचा थरार आवडणाऱ्यांसाठी व्हीआर अनुभव वाट बघत आहे. फिटनेसप्रेमींना मित्राबरोबर शर्यत लावत, अप्रतिम युरोपमध्ये सायकल चालवण्याचा आनंद घेता येऊ शकतो.
कुटुंबीयांबरोबर सिनेमा व शो पाहण्यासाठी ग्राहकांना सेंटरचे होम थिएटर अगोदर बुक करता येऊ शकते.
बेंगळुरूतील नावीन्य, जीवनशैली, मनोरंजन व संस्कृती यांचे केंद्र बनण्याचे सॅमसंग ऑपेरा हाउसचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी प्लाझा क्षेत्रामध्ये वर्षभर फिटनेस, फोटोग्राफी, गेमिंग, संगीत, सिनेमा, फूड, स्टँड-अप कॉमेडी, तंत्रज्ञान व स्टार्ट-प यासंबंधीचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.
सॅमसंगने शहरात नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणामध्ये आढळले की, भारतातील काम किंवा लिजर जीवन यामध्ये परिवर्तन आणेल अशी किमान एक तरी कल्पना आपल्याकडे असल्याचे बंगळूरूतील बहुसंख्य रहिवाशांनी (81%) सांगितले. परंतु, समविचारी व्यक्ती व मार्गदर्शक यांच्याशी संपर्क निर्माण करता येईल व आपल्या कल्पना जोपासता येतील, असे शहरातील एकही ठिकाण माहीत नसल्याचे तीनपैकी एकाने नमूद केले.
“आजच्या ग्राहकांना, विशेषतः तरुणांना, खास अनुभव अपेक्षित सतात. त्यांना ब्रँडशी संवाद साधायचा असतो, स्पर्श, अनुभव हवा असतो व ब्रँड निर्माण करायचा असतो. सॅमसंग ऑपेरा हाउसमध्ये हेच साकारले आहे. सर्व वयोगटांना आवडेल, असा अपूर्व अनुभव आम्ही देणार आहोत. ऑपेरा हाउस सॅमसंगचे नावीन्य व लोकांची पॅशन यांची सांगड घालत कार्यशाळा, उपक्रम व कार्यक्रम यांचे आयोजन करणार आहे. या जागेने आजवर पाहिलेले परिवर्तन अभिमानास्पद असे आहे,” असे सॅमसंग साउथवेस्ट आशियाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी एच. सी. होंग यांनी सांगितले.
सॅमसंगने या वर्षी जुलैमध्ये नोएडा येथे जगातील सर्वात मोठा मोबाइल कारखान्याचे उद्घाटन केल्यानंतर दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत भारतात जगातील सर्वात मोठे मोबाइल एक्स्पिरिअन्स सेंटर सुरू करण्यात आले आहे. यातून, कंपनीची भारताबद्दलची बांधिलकी अधोरेखित होते.
ब्रिटिशांच्या काळात नाटके व ऑपेरा यांचे आयोजन केलेल्या 33,000 फुटांच्या स्टँडअलोन मालमत्तेचे दोन वर्षांपूर्वी जतन करण्यात आले व त्याला मूळ रूपाप्रमाणे भव्य रंगरूप व थाट देण्यात आला आहे. आतील बाजूने, आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करून आधुनक प्रायोगिक जागा तयार करण्यात आली आहे.
सॅमसंग क्यूएलईडी टीव्ही, स्मार्ट टीव्ही, द फ्रेम, फॅमिली हब रेफ्रिजरेटर्स अशा प्रमुख कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांबरोबरच, एक्स्पिरिअन्स सेंटरमध्ये सर्व स्मार्टफोन व वेअरेबल डिव्हाइसेसही ठेवणार आहे. होम अप्लायन्सेस विभागामध्ये किचन सेट अप असेल व तेथे शेफ सॅमसंग स्मार्ट ओव्हन वापरून प्रत्यक्ष स्वयंपाकाची प्रात्यक्षिके देणार आहे.
सॅमसंगच्या जगातील सर्वात मोठ्या मोबाइल एक्स्पिरिअन्स सेंटरमध्ये 24 फुटांच्या भिंतीवर केसेससह अॅक्सेसरीजचे सर्वात मोठे प्रदर्शन असणार आहे. तेथे, ग्राहकांना अॅक्सेसरीजसाठी विशेष कस्टमायझेशन पर्याय उपलब्ध केले जातील, जसे स्क्रीनच्या संरक्षणासाठी मिलिटरी स्ट्रेंथ स्किन बसवणे व 360 डिग्री बॉडी प्रोटेक्शन. त्यांना मोबाइल कव्हरवर त्यांच्या आवडीचे कोणतेही डिझाइन किंवा मजकूर यांचे लेसर कोरीवकाम करून घेता येईल. तेथे विविध प्रकारची हर्मन कार्डन, जेबीएल व सॅमसंग ऑडिओ उत्पादनेही उपलब्ध असतील.
सॅमसंग ऑपेरा हाउसमध्ये पूर्णतः कार्यान्वित असलेले सेवा केंद्र असेल व त्यामध्ये वेगवान सार्वजनिक वाय-फाय असेल.
सॅमसंग लोकांना काय हवे आहे, याच्या सखोल आकलनाद्वारे उज्ज्वल भविष्याची निर्मिती करण्यासाठी आज तंत्रज्ञानाच्या मदतीने नावीन्य साधण्यासाठी प्रयत्नशील आहे. गेल्या वर्षी कंपनीने जगभर संशोधन व विकास करण्यासाठी 15 अब्ज डॉलर खर्च केले आणि आता लोकांच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी आयओटी, एआय व 5जी अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानावर कार्यरत आहे.
भारतात सॅमसंगचे दोन उत्पादन प्रकल्प, पाच संशोधन व विकास केंद्रे व एक डिझाइन सेंटर आहे. सॅमसंगचे पहिले संशोधन व विकास केंद्र सन 1996 मध्ये बंगळुरू येथे सुरू करण्यात आले. आज, सॅमसंग आरअँडडी इन्स्टिट्यूट, बंगळुरू (एसआरआय-बी) हे कंपनीचे कोरियाबाहेरचे जगातील सर्वात मोठे संशोधन व विकास केंद्र आहे. एसआरआय-बी हे सॅमसंगच्या ‘मेक फॉर इंडिया’ उपक्रमाच्या अंतर्गत, जागतिक उत्पादने व स्थानिक नावीन्य यामध्ये योगदान देत आहे.
180,000 रिटेल पार्टनर व 2,100 सॅमसंग ब्रँड स्टोअर असे सॅमसंगचे देशभर सर्वात मोठे रिटेल व वितरण जाळे आहे.