नवी दिल्ली- भारतातील सर्वांत मोठ्या डिजिटल वित्तीय सेवा मंचने आज त्यांच्या अॅपवर कधीही कुठेही क्रेडिट कार्ड बिल पेमेंट सुरू केल्याची घोषणा केली आहे. जारीकर्ता बॅंक कोणती आहे याचा विचार न करता सर्व व्हिसा क्रेडिट कार्ड धारकांसाठी मोबिक्विक हे पेमेंट देऊ करणार आहे. या नव्या ऑफरमुळे मोबिक्विकच्या 107 दशलक्षपेक्षा जास्त युजरना उत्तम यूजर अनुभव मिळणार आहे. भविष्यात इतर क्रेडिट कार्ड ब्रॅंडसाठीही मोबिक्विक या सेवेचा विस्तार करणार आहे.
मोबिक्विककडून येणाऱ्या नवीनतम ऑफरमुळे भारतातील वाढते क्रेडिट कार्ड मार्केट हस्तगत करण्यासाठी मोबिक्विक सक्षम बनणार आहे. शहरी भारतीय ग्राहकांमध्ये क्रेडिट कार्डचा वापर झपाट्याने वाढत आहे आणि त्यामुळे मोबिक्विकसाठी एक मोठी संधी निर्माण झाली आहे. मोबिक्विक अॅपच्या आधी पुरवलेल्या काही कृतींमध्ये या नव्या सेवेचाही समावेश होणार आहे.
मार्च 2017 आणि मार्च 2018 दरम्यान भारतात 7.68 दशलक्ष क्रेडिट कार्ड वाढले आहेत. क्रेडिट कार्ड उद्योगातील सुत्रांनुसार पुढील 4 वर्षांत 4 कोटी किंवा 40 दशलक्षपेक्षा जास्त नवे क्रेडिट कार्ड जारी केले जाणार आहेत. आरबीआयच्या माहितीनुसार भारतीय क्रेडिट कार्ड उद्योग हा दरवर्षी 25% नी वाढत आहे. सन 2017-18 या आर्थिक वर्षात 33 दशलक्ष क्रेडिट कार्डद्वारे रु. 45,000 कोटी खर्च करण्यात आले आहेत.
या घोषणेबाबत बोलताना, श्रीम. उपासना टाकू, सह–संस्थापक आणि संचालक, मोबिक्विक म्हणाल्या की, “आम्ही नाविन्य आणि सर्व प्रकारच्या कृतींसाठी ज्यामुळे यूजर डिजिटल पेमेंट पद्धत स्वीकारण्यास सक्षम होईल, यासाठी कटीबद्ध आहोत. मागील काही वर्षांत आम्ही विविध उत्पादने आणि सेवांची सुरुवात केली आहे ज्या भारतीय ग्राहकांसाठी विशेष, सोप्या आणि अतिशय समर्पक अशा आहेत. आमच्या कधीही कुठेही क्रेडिट कार्ड पेमेंट सेवा ही आजच्या युजरसाठी अतिशय सोयीची ठरेल जे त्यांचे क्रेडिट कार्ड बिल मोबिक्विक ॲपमार्फत अगदी त्वरित भरू शकतात तेही बँक किंवा क्रेडिट कार्ड कंपनीच्या वेबसाईटला भेट न देता. क्रेडिट कार्ड पेमेंटमध्ये भव्य संधी आहे आणि आम्ही क्रेडिट कार्ड मार्केटचे 3-5% मार्केट शेअर स्वतःच्या कक्षेत घेण्याचे ध्येय ठेवून आहोत ज्याची भव्यता वर्तमान आर्थिक वर्षाच्या समाप्तीपर्यंत ₹1,200- 2,000 कोटी इतकी असण्याची शक्यता आहे. आम्ही भागीदार म्हणून व्हिसासह ही श्रेणी सुरू करीत आहोत आणि नजीकच्या काळात अन्य क्रेडिट कार्ड ब्रँडनाही सामील करून घेण्यास प्रयत्नशील असू.”यावेळी श्री. मुरली नायर, व्यवसाय विकास प्रमुख, व्हिसा इंडिया म्हणाले, “मोबिक्विकसह असलेल्या आमच्या सहसंबंधामुळे व्हिसा ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवरून डिजिटल व्यवहारांची सुविधा आणि सहजता मिळण्यास मदत होईल. डिजिटल क्षेत्रात झपाट्याने होत असलेल्या वृद्धीमध्ये मोबिक्विक ग्राहकांना कधीही कुठेही त्यांचे व्हिसा क्रेडिट कार्ड बिल भरण्यास सक्षम बनविते.”
मोबिक्विकविषयी:
मोबिक्विक हे भारतातील सर्वात मोठा डिजिटल वित्तीय सेवा मंच, एक प्रमुख मोबाईल वॉलेट आणि आघाडीचे पेमेंट गेटवे आहे. मोबिक्विक ॲप हा सुमारे 3 दशलक्ष थेट व्यापारी आणि 260 दशलक्षपेक्षा अधिक युजरचे विस्तृत जाळे असलेले आघाडीचा मोबाईल पेमेंट मंच आहे. बिपिन प्रीत सिंह आणि उपासना टाकू यांनी सन 2009 मध्ये कंपनीची स्थापना केली असून कंपनीने सेक्वाया कॅपिटल, अमेरिकन एक्स्प्रेस, ट्री लाईन एशिया, मीडियाटेक, जीएमओ पेमेंट गेटवे, सिस्को इन्व्हेस्टमेंट्स नेट1 आणि बजाज फायनान्स यांकडून चार फेरींचा निधी उभारला आहे. कंपनीची नवी दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पुणे आणि कोलकाता येथे कार्यालये आहेत. मोबिक्विक भारतातल्या डिजिटल व्यवहाराचा सर्वात मोठा स्त्रोत बनण्याचे आणि सन 2022 पर्यंत अब्जावधी भारतीयांना डिजिटल पेमेंट, कर्ज, विमा आणि गुंतवणूकीसाठी एकच मंच उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवून आहे.