मुंबई- बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं दीर्घ आजारानं निधन झालं आहे. वयाच्या 79व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. कोकिळाबेन रुग्णालयात उपचारादरम्यान आज संध्याकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून ते आजारी असल्यानं कोकिळाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात करण कपूर, कुणाल कपूर आणि संजना कपूर ही तीन मुलं आहेत. शशी कपूर यांना 2014ला फुप्फुसामध्ये जंतुसंसर्ग झाला होता. त्याआधी त्यांची बायपास सर्जरी देखील करण्यात आली होती. त्यानंतरच त्यांची तब्येत खालावत राहिली.शशी कपूर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला आहे. शशी कपूर यांनी आतापर्यंत 160 चित्रपटांत काम केलंय. त्यात 148 हिंदी आणि 12 इंग्रजी चित्रपटांचा समावेश आहे. त्यांचा जन्म 18 मार्च 1938मध्ये कोलकातामध्ये झाला होता. 60 आणि 70च्या दशकात जब जब फूल खिले, कन्यादान, शर्मिली, आ गले लग जा, रोटी कपडा और मकान, चोर मचाए शोर, दीवार, फकिरा यांसारखे त्यांचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाले. शशी कपूर यांनी आजवर दीवार, सत्यम शिवम सुंदरम, कभी कभी यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. पण नव्वदीच्या दशकापासून त्यांनी सार्वजनिक ठिकाणी जाणे कमी केले होते.
948मध्ये पत्नी जेनिफर यांचा कर्करोगाच्या आजारानं मृत्यू झाल्यानंतर शशी कपूर काहीसे एकटे एकटेच राहायला लागले होते. त्याच दरम्यान त्यांची प्रकृती खालावली. आजारपणामुळे शशी कपूर हे चित्रपटसृष्टीपासून दूर राहिले. 2011मध्ये शशी कपूर यांना भारत सरकारनं पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. 2015मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता. कपूर परिवारातील ते असे तिसरे व्यक्ती होते की ज्यांनी एवढे पुरस्कार मिळवले होते.
शशी कपूर यांचा अल्पपरिचय…
–शशी कपूर यांचा जन्म 18 मार्च 1938 रोजी झाला. त्यांचे शिक्षण मुंबईत झाले. वयाच्या दहाव्या- बाराव्या वर्षापासूनच त्यांनी अभिनय करायला सुरुवात केली. 1948 साली आलेल्या ‘आग’ आणि 1951 साली आलेल्या ‘आवारा’ या चित्रपटांमध्ये त्यांनी राजकपूरच्या बालपणाच्या भूमिका केल्या.
– हा गोड दिसणारा, गोड हसणारा छोकरा पुढे त्यांच्या त्याच हास्यासाठी व अवखळपणासाठी प्रसिद्ध झाला. घरातूनच मिळालेला अभिनयाचा वारसा त्यांनीही जपला. मात्र, तरीही वडिल पृथ्वीराज कपूर यांच्यासह थिएटरमध्ये ते बरीच वर्ष रमले.
– तरुणपणी इतर कपूरांप्रमाणे त्यांनीही सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या कामाला सुरुवात केली.
– 1961 साली आलेल्या ‘धर्मपुत्र’ या चित्रपटात शशी कपूर पहिल्यांदा नायक म्हणून चमकले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी नायक म्हणून 116 चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. ‘जब जब फूल खिले’ या सिनेमातली नंदा आणि शशी कपूर यांची जोडी विशेष गाजली. कपूर यांच्या नावावर अनेक यशस्वी चित्रपट आहेत.
– जब जब फुल खिले, शर्मिली,कभी कभी, बसेरा, पिघलता आसमान, रोटी कपडा और मकान अशा एका हून एक विलक्षण चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत.
–त्यांचा ‘दिवार’ हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतला एक मैलाचा दगड ठरला. अमिताभ बच्चन आणि शशी कपूर या जोडीने तर बॉक्सऑफिसवर एकच धमाल उडवून दिली.
–दीवार, रोटी कपडा और मकान, त्रिशूल, दो और दो पाच, नमक हलाल, सिलसिला, शान, कभी कभी या हीट फिल्म्स या जोडीने दिल्या आणि प्रेक्षकांच मनोरंजन केलं.
– शशी कपूर यांच्या सत्यम् शिवम् सुंदरम्, जब जब फूल खिले या चित्रपटातील अभिनय खूपच गाजले.
–शशी कपूर हे देव आनंद व राजेश खन्नाप्रमाणे ‘रोमँटिक हीरो’ म्हणून स्त्री-चाहत्यांत आपले स्थान निर्माण करू शकले. ती त्याची मोठीच मिळकत.
> हिंदी चित्रपटांबरोबरच शशी कपूर यांनी दोन इंग्रजी चित्रपटांमध्येही भूमिका केल्या. आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये भूमिका करणारे शशी कपूर हे पहिले भारतीय अभिनेते ठरले.
>अनेक अमेरिकन व ब्रिटीश चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका केल्या. ‘फिल्मवालाज’ या त्यांच्या निर्मितीसंस्थेच्या वतीने त्यांनी जुनून व कलियुग 36 चौरंगी लेन अशा विविध चित्रपटांची निर्मिती केली.
–हिंदी रंगभूमीसाठी शशी कपूर यांनी दिलेले योगदानही महत्त्वाचे आहे.
– आपल्या वडिलांच्या पृथ्वी थिएटरचीची त्यांनी पुर्नउभारणी केली.
– शशी कपूर यांना 2011 मध्ये ‘पद्मभूषण’ या सर्वोच्च नागरी पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते.
– सिनेक्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी शशी कपूर यांना 2014 साठी दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.
–160 चित्रपटांत त्यांनी काम केले असून तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत.
शशि कपूर नव्हते खरे नाव…
शशि कपूर यांचे खरे नाव बलबीर राज कूपर होते. पृथ्वीराज कपूर यांच्या घरात जन्मलेल्या शशि यांनी अभिनयचाचे धडे नसते गिरवले तरच नवल. वडील आणि भावांप्रमाणे शशि यांचे देखील चित्रपट सृष्टीत पदार्पण झाले. 40च्या दशकात त्यांचे रुपेरी पडद्यावर आगमन झाले.
– मुंबईतील डॉन बॉस्को शाळेत शशि कपूर यांचे प्राथमिक शिक्षण झाले. शाळेच्या सुटीच्या काळात वडील पृथ्वीराज त्यांना स्टेजवर अॅक्टिंग करण्यासाठी प्रोत्साहित करायचे.
– पुढे मोठे बंधू राज कपूर यांनी त्यांची फिल्म आग (1948) मध्ये शशि यांना रोल दिला. यानंतर 1951 मध्ये राज कपूर यांच्याच ‘आवारा’मध्ये शशि दिसले होते.
आवारामध्ये त्यांनी राज कपूर यांच्या बालपणाचा रोल केला होता.
– वडिलांच्या सल्ल्याने शशि यांनी गोद्फ्रे कँडल यांचा थिएटर ग्रुप जॉइन केला होता. या ग्रुपसोबत जगभर भ्रमंती करतानाच गोद्फ्रे यांची मुलगी जेनिफरच्या ते प्रेमात पडले. अवघ्या 20व्या वर्षी त्यांनी जेनिफरसोबत लग्न केले होते.
– हिंदी चित्रपटांबरोबरच शशी कपूर यांनी दोन इंग्रजी चित्रपटांमध्येही भूमिका केल्या. आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये भूमिका करणारे शशी कपूर हे पहिले भारतीय अभिनेते ठरले. अनेक अमेरिकन व ब्रिटीश चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका केल्या.