आजही पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 24 हजार 308

Date:

पुणे विभागातील 18 लाख 89 हजार 474 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 19 लाख 54 हजार 119 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे, दि. 05 : पुणे विभागातील 18 लाख 89 हजार 474 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 19 लाख 54 हजार 119 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 24 हजार 308 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 40 हजार 337 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.06 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.69 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 11 लाख 19 हजार 354 रुग्णांपैकी 10 लाख 90 हजार 769 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 9 हजार 964 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 621 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.66 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.45 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 41 हजार 458 रुग्णांपैकी 2 लाख 28 हजार 119 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 280 आहे. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 59 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 95 हजार 193 रुग्णांपैकी 1 लाख 87 हजार 401 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 937 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 855 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 93 हजार 669 रुग्णांपैकी 1 लाख 85 हजार 803 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 772 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 94 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 4 हजार 445 रुग्णांपैकी 1 लाख 97 हजार 382 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 355 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 708 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 2 हजार 49 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 921 , सातारा जिल्ह्यात 351, सोलापूर जिल्ह्यात 293, सांगली जिल्ह्यात 365 तर कोल्हापूर जिल्ह्यात 119 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 2 हजार 230 आहे. पुणे जिल्हयामध्ये 1100, सातारा जिल्हयामध्ये 159, सोलापूर जिल्हयामध्ये 293, सांगली जिल्हयामध्ये 459 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 131 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 56 लाख 13 हजार 523 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 19 लाख 54 हजार 119 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
(टिप :- दि. 4 सप्टेंबर 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पीएम सूर्यघर योजनेच्या जाचक अटीविरोधात महावितरण कार्यालयावर मोर्चा

ग्राहकहित व पर्यावरणासाठी सौरऊर्जेच्या जाचक अटीच्या निषेधार्थ महावितरणवर...

पंतप्रधान आवास योजनेतील सव्वाचार कोटीच्या घोटाळ्यावर मुनगुंटीवार आक्रमक

'तारीख पे तारीख' नको, थेट निलंबन करा! सुधीर मुनगंटीवारांचा...

हुंडाविरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी व जिल्हास्तरावर विशेष पथके तैनात करा- डॉ. गोऱ्हे

बुलढाणा-बाणेर येथील विवाहितांच्या आत्महत्या प्रकरणी सखोल चौकशी व कठोर...

१० लाख रुपयांची X रे मशीन ६१ लाखांना खरेदी केली-आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या काळात गैरव्यवहार :मनसे

मुंबई-महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी...