ध्वनीक्षेपकाबाबत कायद्यानुसार कार्यवाही करु-पुण्यातील मुस्लीम प्रतिनिधींचा सूर

Date:

मुस्लीम संघटना, मशिदींच्या प्रतिनिधींच्या बैठकीतील सूर
पुणे :धार्मिक स्थळांवर ध्वनीक्षेपक लावण्याबाबत , आवाजाच्या मर्यादेबाबत कायद्याच्या तरतुदीनुसार कार्यवाही केली जाईल. सर्व धर्माच्या धार्मिक स्थळांना याबाबतच्या अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन- मदत करण्याची आमची भूमिका आहे, असा सूर मुस्लीम संघटना, मशिदींच्या प्रतिनिधींची बैठकीत उमटला.अवामी महाझ ‘ सामाजिक संघटनेने ही बैठक बोलवली होती.
आझम कॅम्पस येथे ही बैठक २१ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता झाली. अध्यक्षस्थानी अवामी महाजचे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार होते.
रिपब्लिकन पक्षाचे अॅड. अयूब शेख,नुरुद्दीन सोमजी, अॅड. शेरकर, अवामी महाझ सामाजिक संघटनेचे सचिव वाहिद बियाबानी यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
इक्बाल शेख,मशकूर शेख, इक्बाल अन्सारी, मुश्ताक पठाण,अंजुम इनामदार, इक्बाल तांबोळी,असलम बागवान यांच्यासह अनेक प्रतिनिधी सभागृहात उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात जनसंपर्क अधिकाऱ्याकडे हे अर्ज देण्याची सुविधा आहे. वक्फ बोर्डाचे प्रमाणपत्र जोडावे, असे अॅड. अयूब शेख यांनी सांगितले.आवाजाची मर्यादा प्रमाणात ठेवण्याबाबत कायद्याच्या तरतूदी प्रमाण मानल्या जातील, असे अनेक प्रतिनिधींनी सांगीतले.डॉ.पी. ए. इनामदार म्हणाले, ‘ पुण्यातील ५०० मशिदींना आम्ही ध्वनीक्षेपक परवानगी संबंधी अर्ज पाठवले आहेत. त्यातील अनेक ठिकाणी परवानगी आहे. मशिदींचे व्यवस्थापन करणाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची व्यवस्था केली जात आहे. इतर धर्माच्या धर्म स्थळांना देखील ध्वनीक्षेपक परवानगीसाठी कायदेशीर प्रक्रियेत मदत करू. निवडणूका असल्या मुळे त्या पार्श्वभूमीवर काही मुद्दे पुढे आणले जात असले शांतता, सुव्यवस्था राखली जावी, अशी आमची भूमिका आहे.तीच सर्वांची भूमिका असली पाहिजे. पुणे शहर, महाराष्ट्र राज्य शांतताप्रिय आहे आणि राहील.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...