‘खोदाई आणि अंधार ‘अधिका-यांवर कारवाई करणार -महापालिका आयुक्तांचा इशारा

Date:

पिंपरी, २७ जुलै २०२१ :- शहरातील रस्त्यांच्या वारंवार खोदाईबाबत नागरिक बाधित होत असून लोकप्रतिनिधीच्या तक्रारी येत आहेत याबाबत स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा आदी विभागांनी एकमेकांशी समन्वय साधून त्याबाबतीत नियोजन करून त्यानंतरच खोदाई करावी अन्यथा जबाबदार अधिका-यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा आयुक्त राजेश पाटील यांनी दिला.अनेक ठिकाणी दिवे असून अंधार अशी परिस्थिती तातडीने दूर करत राहिले पाहिजे अन्यथा अशा संबधित अधिकाऱ्यांवरही कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

महानगरपालिकेच्या अ क्षेत्रीय कार्यालयात आयुक्त राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग क्र. १५ व १९ मधील समस्यांबाबत नगरसदस्य आणि अधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत त्यांनी उपस्थित अधिका-यांना आदेश दिले.

यावेळी अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसदस्य अमित गावडे, शैलेश मोरे, नगरसदस्या शैलजा मोरे, जयश्री गावडे, कोमल मेवाणी, प्रभाग अधिकारी सुचेता पानसरे, स्थापत्य, अतिक्रमण, विद्युत, नगररचना, पाणीपुरवठा, उद्यान, आरोग्य, वैद्यकीय आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीस उपस्थित नगरसदस्यांनी विविध समस्या आयुक्त राजेश पाटील यांचेसमोर नमूद केल्या. रस्त्यावरील दिव्यांच्या खांबांखाली झाडांच्या फांद्यांमुळे रस्त्यावरील दिव्यांचा प्रकाश रस्त्यावर पडत नाही, गणेश तलाव येथे मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. एल.आय.सी. कॉलनीतील पालिकेच्या दवाखान्यात पाणी साचल्याने समस्या निर्माण झाली. दवाखान्यांस जागा जागा अपुरी पडत असल्याने दवाखाना अन्यत्र स्थलांतरित करावा, पाणीपुरवठा अनियमितता, भाटनगर, आनंदनगर, पत्राशेड भागात ड्रेनेज समस्या नगरसदस्यांनी यावेळी मांडल्या. तसेच महात्मा बसवेश्वर चौक व अग्रसेन मंदिराजवळ जंगल वाढले आहे. हेडगेवार भवनाजवळ वॉर्ड ऐवजी संपूर्ण क्षेत्रीय कार्यालयांच्या कच-याच्या गाड्यांचे वाहनतळ झाले आहे. पे अॅंड पार्कची समस्या नागरिकांना भेडसावत आहे, असे मुद्देही नगरसदस्यांनी उपस्थित केले.

आयुक्त राजेश पाटील म्हणाले, नगरसदस्यांनी उपस्थित केलेल्या समस्यांची दखल घेण्यात आलेली आहे. रस्ते खोदाई करण्यापूर्वी संबधित विभाग संलग्न विभागाशी समन्वय साधून मगच खोदाई करेल. यामुळे वारंवार होणा-या खोदाईचा त्रास नागरिकांना होणार नाही. उद्यान विभागाने तातडीने रस्त्यावरील दिव्यांच्या खांबाखालील झाडांचा विस्तार कमी करावा. रस्त्यावर पुरेसा उजेड असला पाहिजे. मोकाट कुत्र्यांबाबतीत थोड्याच दिवसांत उपाययोजना करण्यात येणार आहे. गणेश तलावातील गाळ काढण्याचा आदेश दिलेला आहे. त्याची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी. नवीन बदली झालेल्या अधिका-यांनी क्षेत्राची पाहणी करावी व कामकाज समजून त्याबाबत नगरसदस्यांना वेळोवेळी अवगत करावे. कच-याच्या समस्येबाबत लोक सहभागातून व्यवस्थापन करण्यात येणार आहे. याबाबत जनजागृती करण्यात येईल तसेच कचरा संकलन करणा-या गाड्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे असे स्पष्ट करून आयुक्त पाटील यांनी सर्व अधिका-यांना कामामध्ये तत्पर राहण्याबाबतचे आदेश दिले.बैठकीचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल पुराणिक यांनी केले तर आभार क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे यांनी मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महिला सक्षमीकरणाचा ‘पुणे पॅटर्न’: परिवर्तनाची सक्षम वाटचाल

महिला दिन विशेष महिला सक्षमीकरण हा केवळ घोषणांचा विषय नाही;...

12 तास काम केल्यावरही मिळेना महिलांना साडेनऊ हजाराचा पगार

पुणे-इथे घराची सरासरी किंमत देखील तब्बल 78 लाख...

महिलांसाठी PMPML च्या दिवसभराच्या 6 सफरी ..चॉइस महिलांची,अवघ्या 500 रुपयांत एक सफर

पुणे-जागतिक महिला दिनानिमित्त पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे (पीएमपीएमएल) महिला...

जगावर वर्चस्व लादू पहाणाऱ्या डोनाल्ड ट्रम्पने बालिकेवर अत्याचार केल्याचा आरोप

डोनाल्ड ट्रम्पनी १५ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याचा आरोप, अमेरिका...