पुणे- मोक्काची कारवाई करण्यात आलेल्या दीप्ती काळे या महिला वकील असलेल्या आरोपीने ससून रुग्णालयाच्या 8 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला , ती पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पडली असावी असा अंदाज पोलीस वर्तविला आहे. आहेत. परंतु, या प्रकरणाने शहर पोलीस दलासह शहरात खळबळ उडाली आहे.
दीप्ती सरोज काळे असे मृत्यू झालेल्या महिला आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीप्ती काळे आणि निलेश शेलार यांच्यावर एका सराफ व्यवसायिकाच्या आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. तिची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात ती पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. तर कालच तिच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. बांधकाम व्यावसायिकाला बलात्काराच्या गुन्हा दाखल करण्याची धमकी देत 46 गुंठे जागा नावावर करून घेत आणखी 56 गुंठे जागा द्यावी यासाठी धमकावत असे अशी तक्रार आली होती. त्यानुसार गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, आजच पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आजच या टोळीवर मोक्काची कारवाई केली होती. या टोळीची प्रमुख दीप्ती काळे ही होती. दरम्यान, रुग्णालयाच्या बाथरूम मधून खाली उडी मारली असल्याचे सांगितले जात आहे. यात गंभीररित्या जखमी झाल्याने काळे हिचा जागीच मृत्यू झाला आहे.
दीप्ती काळे हिचा ससून रुग्णालयातील ८ व्या मजल्यावरुन पडून मृत्यु झाला. ही घटना आज (मंगळवार) दुपारी 4 वाजण्याच्या पूर्वी घडली. ससून रुग्णालयात दीप्तीवर उपचार करण्यात येत होते. त्यावेळी ती बाथरुममध्ये गेली होती. त्यानंतर ती ससूनच्या आवारात ती मृतावस्थेत आढळून आली. ती ज्या बाथरुममध्ये गेली होती त्या बाथरुमच्या खिडक्यांच्या काचा काढून ठेवलेल्या आढळून आल्या आहेत. तेथून बाहेर पडण्यासाठी अरुंद बोळातील पाईपावरुन खाली उतरताना पडून तिचा मृत्यु झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे़, असे सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांनी सांगितले.

