पुणे- काही कार्यकर्ते निष्कलंक असतात , श्रीमंत नसतात पण समाज कार्याची भलतीच ओढ त्यांना असते. असेच समाज कार्याची भलतीच ओढ असलेले एक दांपत्य म्हणजे आरती आणि रवी सहाने … मनसे चे कट्टर कार्यकर्ते , अनेक कार्यक्रम ,आंदोलने , तुरुंगवास अशा कारणांनी आणि विविध लोकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सातत्याची धडपड यामुळे अनेकांच्या परिचयाचे बनलेले हे दांपत्य या निवडणुकीत मनसे ने उमेदवारी दिली नाही म्हणून अपक्ष लढत आहे .प्रभाग क्रमांक १८ ब गटातून महिला ओबीसी मधून लढणाऱ्या आरती रवी सहाने यांची निशाणी आहे ‘ टेबल …. रवी सहाने हे आरती बरोबर हातात स्पीकर घेवून प्रचार करताना अनेकांनी पाहिले असतील .. त्यांच्याबरोबर आता याच प्रभागातील मिलिंद परदेशी हे दुसरे अपक्ष उमेदवार देखील प्रचार करत आहेत .
सामाजिक कामाची आवड असणे ,मेहनतीने ती करणे, पक्षाशी निष्ठा राखूनही न्याय न मिळणे आणि नंतर आपली एकाकी अपक्ष लढाई सुरु करणे .. अशा वाटचालीवर असलेल्या या दाम्पत्यांची … उमेदवारांची सर्व भिस्त आता मतदार राजावारच आहे …