स्ट्रेट लाईन एंटरटेन्मेंट तर्फे
येत्या 13 तारखेला आयोजन
पुणे: शास्त्रीय कला जोपासणाऱ्या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, स्ट्रेट लाईन एंटरटेन्मेंटतर्फे ‘आराधना’ मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 13 तारखेला टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी 5 वाजता ही मैफल रंगेल.
प्रसिद्ध गायिका विदुषी डॉ. आश्विनी भिडे-देशपांडे यांची सुरेल गायकी आणि पं. मनीषा साठे यांचा नृत्याविष्कार एकाच व्यासपीठावर अनुभवण्याची संधी ‘आराधना’च्या माध्यमातून रसिकांना लाभणार आहे. आपल्या गायकीने रसिक प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या गायिका विदुषी डॉ. आश्विनी भिडे-देशपांडे यांच्या सुरेल सादरीकरणाने मैफलीची सुरुवात होईल. तर प्रसिद्ध कथक नृत्यांगना पं. मनीषा साठे यांच्या नृत्याने कार्यक्रमाची सांगता होईल. पं. अरविंदकुमार आजाद (तबला), श्री. राजीव तांबे, श्री. मिलींद कुलकर्णी (संवादिनी) , श्री. सुनील अवचट (बासरी)त्यांना साथसंगत करतील. प्रसिद्ध निवेदक श्री. आनंद देशमुख कार्यक्रमाचे निवेदन करतील.
गायन , नृत्य आणि वादनाच्या अनोख्या मिलाफातून रंगणारी ही मैफल रसिक पुणेकरांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.