पुणे- सीबीआयच्या बळावर मोदी सरकारला देशात आम आदमी पक्षाची वाढती लोकप्रियता रोखायची आहे. पंजाबच्या विजयानंतर देशभरातील लोक अरविंद केजरीवाल यांना विरोधकांचा मजबूत चेहरा म्हणून स्वीकारू लागले आहेत.त्यात जगातील सर्वात शक्तिशाली देश असलेल्या अमेरिकेतील सर्वात मोठे वृत्तपत्र “द न्यूयॉर्क टाईम्स” ने पहिल्या पानावर मनीष सिसोदियांचा चा फोटो टाकून दिल्ली शिक्षण मॉडेलचे कौतुक केले आहे. यामुळे मोदी सरकार घाबरले असून सीबीआय व इडीचा वापर करून आपच्या मंत्र्यांवर ती दबावतंत्र वापरत आहेत असा आरोप करत आप ने नाशिक फाट्यावर मोदी सरकार विरोधात आंदोलन केले. पिंपरी चिंचवड शहर संपर्क प्रमुख वैजनाथ शिरसाट यांनी हि माहिती दिली .
शिरसाठ म्हणाले,’ मला मोदीजींना सांगायचे आहे की भारताला नंबर वन बनवण्यासाठी देशातील 130 कोटी जनता केजरीवाल यांच्यासोबत येत आहे. सीबीआयला जिथे न्यायचे असेल तिथे तुरुंगात नेवू द्या, आम्ही आंदोलनातून घडलो आहोत, आंदोलन करू. देशात सुरू असलेली हुकूमशाही उलथून टाकण्याचे काम आम्ही करू व भारताला जगातील पहिल्या क्रमांकाचा देश आम्ही बनवल्या शिवाय राहणार नाहीत असे आपचे प्रवक्ते प्रकाश हगवणे यांनी म्हटले..
चिंचवड संपर्कप्रमुख गोविंद माळी यांनी आपण एक चूक केली एक चौकीदार म्हणून मी देशाचा कारभार पाहिल असे म्हणणाऱ्याला पंतप्रधान केले पण त्यांनी देशाला संकटाच्या खा ईत लोटले आहे महागाईमुळे सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत झालेले आहे असे मत यांनी मांडले..
त्याचप्रमाणे यल्लाप्पा वालदर यांनी चांगल्या लोकांना या देशांमध्ये किंमत नाही ज्याप्रमाणे इंग्रजांनी स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या देशभक्तांना प्रामाणिक काम करत असताना आपली खरी बाजू मांडत असताना त्यांना जेलमध्ये टाकले अत्याचार केले त्याचीच पुनरावर्ती आज देशभरात भाजपा सरकार इडी सीबीआय इन्कम टॅक्स या सरकारी यंत्रणाचा गैरवापर करताना दिसत आहे असे मत व्यक्त केले
प्रकाश हागवणे म्हणाले,’पंजाब राज्याच्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीला टक्कर आणि सक्षम पर्याय आम आदमी पार्टी च्या रूपान अरविंद केजरीवाल यांच्या रूपाने देशाला मिळालेला आहे देशाच्या कानाकोपऱ्यात आम आदमी पार्टीने दिल्ली सरकारचं मॉडेल शिक्षण व आरोग्य या क्षेत्रात क्रांती घडून आणली त्याचा डंका देशातच नव्हे तर जगामध्ये वाजला आहे त्यामुळे त्यांना विनाकारण बदनाम करण्यासाठी त्यांच्यावर सकाळीच सीबीआय ची धाड टाकवली
या वेळी भोसरी विधानसभेचे कार्याध्यक्ष मंगेश आंबेकर, पिंपरी विधानसभा अध्यक्ष नंदू नारंग ब्रह्मानंद जाधव, यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली.आप कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.आंदोलनास जावळे मामा,यशवंत कांबळे ,स्मिता पवार , कुणाल वक्ते , अजय सिंह ,इम्रान खान ,सुरेश भिसे ,अखिल शेख ,चांद मुलांनी, शशिकांत कांबळे,संतोष बागाव , स्वप्नील जेवळे ,नाजणींन मेनन ,जोती शिंदे,मिलन पांडे,निलेश राऊत, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

