एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे सोबत १२ ते ६५ वर्ष वयोगटातील स्त्री-पुरुषांनी शिखरावर केली यशस्वी चढाई
अस्थमावर मात करत कळसुबाई शिखर सर करून १२ वर्षाच्या आर्यन दळवीने घडवला इतिहास
अभिनेत्री सारा खान यांची आई माला मनसुखानी (५८ वर्ष) यांनीही शिखर केले सर.
पुणे- एव्हरेस्टवीर आनंद बनसोडेसोबत गिर्यारोहक करन पंजाबी, निखिल यादव, निहाल बागवान, बालाजी जाधव, सुरेश नारायणकर यांनी स्थापन केलेल्या “360 एक्सप्लोरर्स” या ग्रुपद्वारे नुकतेच महाराष्ट्रातील ७० जणांनी १६४६ मीटर उंचीचे कळसुबाई शिखर सर्व करून एक नवा इतिहास घडवला. युनायटेड नेशन्स च्या “हिफॉरशी” व “लाईफ ऑन लॅंड“ या गोल्सना या मोहिमेद्वारे सपोर्ट देत ही मोहीम जागतिक पातळीवर उल्लेखली गेली आहे. युनायटेड नेशन्स (वूमन) च्या अध्यक्ष “फुम्झिले मालाम्बो-न्युकेका” यांनी या मोहिमेचे कौतुक करून याला शुभेच्छा दिल्या होत्या. १२ ते ६५ वयोगटातील ७० जणांनी कळसुबाई शिखर सर करून महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे.
“तुम्ही काहीही करत असा किंवा कोणत्याही अवस्थेत असा तुम्ही तुमच्या अंतर्गत शक्तीद्वारे तुमचे शिखर सर करू शकता” या एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुणे, मुंबई, सोलापूर, अहमदनगर, अंबेजोगाई, औरंगाबाद येथील महिला व पुरुष या मोहिमेत सहभागी झाले होते. ‘स्वतमधील अंतर्गत शक्तीची प्रत्येकाला जाणीव असली पाहिजे आणि या शक्तीद्वारे जगातील कोणतेही अवघड काम आपण करू शकतो हा विश्वास जागा करणे’ असा 360 एक्सप्लोरर्स च्या टीमचा उद्देश होता असे करण पंजाबी व निखिल यादव यांनी सांगितले. या मोहिमेत सेवासदन शाळेतील मुख्याध्यापक उषा हंचाटे व संगीता नगरकर, मानसी रोकडे, बिजनेसमन पुष्कराज गोयल, रेवती पवार, अहमदनगर येथील स्वाती ठाकूर, औरंगाबाद येथील शीतल बांग, पुणे येथील ओंकारेश्वर चीवर, सुहासिनी दराडे, अंबेजोगाई येथील विजय चाटे या सर्वांनी आपआपल्या शहरातून या मोहिमेसाठी संपर्कप्रमुखाचे काम केले. अभिनेत्री सारा खान यांची आई माला मनसुखानी याही खास मुंबईवरून या मोहिमेत सहभागी झाल्या होत्या. “कोणतीही गोष्ट करण्यासाठी वयाचे बंधन नसते हे आम्हाला या ट्रेकद्वारे कळले” असे त्या म्हणाल्या.
या मोहिमेत डॉ. शालिनी नायकोडी व डॉ.गणेश नायकोडी हे ओतूर(पुणे) येथील डॉक्टर जोडपे मेडिकल लीडर म्हणून सहभागी झाले होते. प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेत सर्वाना प्रेरित करत या डॉक्टर दांपत्यानेही महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर सर केले. यावेळी इतिहास व गड-किल्ल्यांचे अभ्यासक संगमनेर येथील श्रीकांत कासट यांनी कळसुबाई शिखराच्या आजूबाजूच्या परिसराच्या गड-किल्याच्या इतिहासाविषयी माहिती दिली.
१२ वर्षाच्या आर्यन दळवीची अस्थमाच्या भीतीवर मात-
एव्हरेस्टवीर आनंद बनसोडेसोबत काढलेल्या या मोहिमेत १२ वर्षाचा आर्यन दळवी हा मुलगाही सहभागी झाला होता. लहानपणापासूनच आर्यन दळवी ला अस्थमा चा त्रास होता. तो शारीरिक श्रम करू शकणार नाही असे अनेकांनी सांगितले होते. या भीतीवर मात करण्यासाठी एव्हरेस्टवीर आनंद ने आर्यन दळवी याला या मोहिमेत सहभागी करून घेतले होते. आर्यन दळवी याने रविवारी महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर सर करून इतिहास घडवला. “मला आधी भीती वाटत होती पण आता मी बरा झालो आहे हे मी माझ्या आईला सांगणार आहे” असे उद्गगार आर्यनने कळसुबाई शिखरावर काढले. सर्वंच स्तरातून आर्यन चे कौतुक होते असून कळसुबाई शिखरावरील एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी त्याची घेतलेली मुलाखत व्हायरल झाली आहे. मनातील भीतीवर मात करून सर्वोच्च शिखर सर केल्याबद्दल सर्वच स्तरातून आर्यनचे कौतुक होत आहे.
फुम्झिले मालाम्बो-न्युकेका (युनायटेड नेशन्स (वूमन) अध्यक्ष, अमेरिका)
“कळसुबाई शिखर सर करण्यासाठी गेलेल्या सर्वांचे मी अभिनंदन करते. सर्वांची धडपड खरेच कौतुकास्पद असून याद्वारे सर्व मुलींना व स्त्रियांना “आपण सर्व करू शकतो” असा विश्वास मिळेल. कळसुबाई शिखर “हिफोरशी” व “लाइफ ऑन लॅंड” या गोल्ससाठी सर करून तुम्ही सर्वांनी एक आदर्श घालून दिला आहे”
आनंद बनसोडे ( एव्हरेस्टवीर विश्वविक्रमवीर)
गिर्यारोहक करण पंजाबी, निखिल यादव, निहाल बागवान, बालाजी जाधव या सर्वानीच 360 एक्सप्लोरर्स द्वारे एक महत्वाचे पाऊल उचलून अनेकांना गिर्यारोहण क्षेत्राची ओळख करवून देत आहेत. या पुढेही आम्ही सर्व अश्याच मोहिमा आयोजित करून अनेकांना त्याच्या मनातील भीती दूर करून यशाचा मार्ग दाखवणार आहोत”

