पुणे-आत्महत्या केलेल्या माजी सैनिक रामकिशन ग्रेवाल यांच्या परिवारास ताब्यात घेऊन मारहाण करणे आणि संविधानाच्या मार्गाने सत्तेवर आलेल्या दिल्ली सरकारच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पोलिसांनी ताब्यात घ्यावे ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे असे सांगत आज पुणे श्षर आम आदमी पार्टी ने भाजपच्या पुणे शहर कार्यालयासमोर मूक निदर्शने केली .
भारतीय सैनिक कोट्यावधी जनतेसाठी सीमेवर लढत आहेत आणि आज जर त्यांना या देशात आत्महत्या करावी लागत आहे ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. पंतप्रधान मोदी देशभर orop लागू केल्याचा डंका वाजवत आहेत , हे जर खरे असेल तर जवानांना आंदोलन का करावे लागते आहे , का आत्महत्या करावी लागते आहे ? एकी कडे सर्जिकल स्ट्राईक वर सैनिक लढत असताना भाजपा सरकारने मात्र डीसअबिलीटी पेन्शन मात्र कमी केले आहे. ज्या देशात सैनिक आणि शेतकरी यांना आत्महत्या करावी लागते आहे त्या देशाचे भवितव्य धोक्यात आहे असेच म्हणावे लागेल. या विषयावर भाजपा सरकारला जनतेच्या तीव्र भावना कळाव्या यासाठी आम आदमी पार्टीने पुण्यात मूक निदर्शने केली
आत्महत्या केलेल्या माजी सैनिक रामकिशन ग्रेवाल यांच्या परिवारास ताब्यात घेऊन मारहाण करणे आणि संविधानाच्या मार्गाने सत्तेवर आलेल्या दिल्ली सरकारच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पोलिसांनी ताब्यात घ्यावे ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे असे यावेळेस आप ने प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे .

