सर्व धर्मीय बांधवांची उपस्थिती ,एकमेकांना दिल्या जाणाऱ्या ‘ईद मुबारक ‘ च्या शुभेच्छा ,सुफी संगीताची साथ आणि रुचकर पदार्थांच्या समवेत शनिवारची संध्याकाळ संस्मरणीय ठरली !
निमित्त होते आझम कॅम्पस ‘ चे सर्व शैक्षणिक ट्रस्ट आणि ,’अवामी महाज ‘ ही सामाजिक संघटना आयोजित ‘ईद मीलन ‘ कार्यक्रमाचे !
‘आझम कॅम्पस ‘आणि ‘अवामी महाज’, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ईद मिलन’ कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी १ जुलै रोजी सायंकाळी आझम कॅम्पस,पुणे कॅम्प येथे करण्यात आले होते या कार्यक्रमादरम्यान ‘ पवन नाईक आणि पार्टी ‘ यांच्या सुफी संगीताच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते .
ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य ,डॉ . कुमार सप्तर्षी ,माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी ,खासदार एड . वंदना चव्हाण ,माजी मंत्री रमेश बागवे ,माजी महापौर प्रशांत जगताप ,अंकुश काकडे ,रवींद्र माळवदकर ,रवी चौधरी ,विशाखा खैरे ,तंत्र शिक्षण सह संचालक नंदनवार ,आरती कोंढरे ,मारुती तुपे ,गफूर पठाण हे नगरसेवक ,कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष अतुल गायकवाड या मान्यवरांनी ईद मीलन कार्य्रक्रमाला उपस्थित राहून मुस्लिम बांधवाना ईद निमित्त शुभेच्छा दिल्या .
मान्यवरांचे स्वागत डॉ . पी.ए.इनामदार (‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष), आबेदा इनामदार (‘महाराष्ट्र मेडिकल एज्यूकेशन अॅण्ड रिसर्च सेंटर’ च्या अध्यक्ष), लतीफ मगदूम (महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे सचिव ),झुबेर शेख (‘हाजी गुलाम मोहम्मद आझम एज्यूकेशन ट्रस्ट’चे सचिव), बी.एच. इनामदार (गोल्डन ज्युबिली एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष), वाहिद बियाबानी (सचिव, ‘अवामी महाज’), अस्लम बागवान ,मुमताझ पीरभॉय (‘डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट’च्या उपाध्यक्ष), मुमताझ सय्यद (मुस्लिम को-ऑप बँकेच्या उपाध्यक्ष),वाहिद शेख यांनी केले .


